॥€6)0 1 ४॥॥॥॥-॥॥४ 1-८ 30096 (४-४
1८8006४४७5 _)२८॥४९/-८६०
(॥५॥४/८॥२७/१|_ (13२, रँ
0[)_ 194616
२०) 7१०० हि. ॥४७0/॥५]
(0()0?--881--5-8-74--15,000 0५91१14111. एपा971]२५1१₹ 1.101२१.417२१ (31) ॥४०. भै र 2- /९९९5510॥ /४0०, ?60. (| ह, ७ 57 १्व्झ
1110 (९१ 1
वै1> , 3फे. का
२४१३ ऑग &षण त्रा
गु ॥600: आ०पात ७6 ए(लएवा त्त ला ठा )लजिए फोल तद्चा( 188 ॥3न९्त ल
गु॥८
गोविन्द केशव भट .
ऊरुभडुः आणि इतर नाटकं
मॉडने बुकडेपो प्रकाशन
प्रकाशक ! श्री. कमलाबाई भिडे मालक मॉडन बुकडेपो, बाजीराव रस्ता, पुणे २.
ज्र
सवे हक्क लेखकाचे स्वाधीन,
प्रयोगासंबंधींचे हक सो. सुषमा भट यांच्याकडे आहेत. कुठल्याहि एकांकिकेच्या एका प्रयोगाचे मानधन रुपये दहा पाठवून, लेखी परवानगी अगोदर घेतल्यावांचून नाऱ्यप्रयोग करतां येणार नाहीं, पत्रब्यबहार प्रकाशकांमार्फत करावा,
प्रथमात्रात्ति : विजयाद्रामी, ११ ऑक्टोबर, १९५९
किंमत दीड रुपथा
मुद्रक! चिं.ग. वज्ले
साधना प्रेस
४२३०/२१ रशानवबार, पुर्णे २.
आमुख
महाभारतांतील कथानकांवर भासानं सहा नाटकें लिहिलेली आहित, त्यांपैकीं ' पज्चरात्र ) सोडलें तर बाकीची पांचहि एकांकी नाटके आहित.
प्राचीन कवींच्या पद्धतीप्रमाणे भासाने आपलीं कथानके इतिहास, पुराण, आख्यायिका यांच्यामधून निवडलेली असली तरी, त्यांना नास्यरूप देतांना जी स्वतंत्र प्रज्ञा प्रकट झालेली दिसते, ते भासाचे एक खास वेशिष्ट्य म्हणावें लागेल, ही स्वतंत्र प्रज्ञा केवळ नाऱ्यरऱवनंतच दिसते असे नसून, मूळ आधारावर नव्या कथावस्तूचा डोलारा उभारण्याच्या भासाच्या कल्पकतेतहि आहे. याचा प्रत्यय, ' पज्चरात्र), ' मध्यमव्यायोग आणि ' दूतघटोत्कच ' या नाटकांत आढळेल.
हिडम्ब राक्षसांचा वंघ, हिडिम्या आणि भीम यांचा विवाह आणि धघटोत्कचाचा जन्म या घटना महाभारतामध्ये आहेत, परंतु अज्ञातवासाच्या कालांत एका विलक्षण योगायोगाने भीम आणि हिडिम्बा यांचे पुनर्मीलन होते, ही 'मध्यमव्या योग! नाटकांतील कल्पना केवळ भासाऱचीच. या पुनर्मीलनाचा घाट जमविण्यासाठी एका ब्राह्मणकुटुंबाचे उपकथानक भासाने जोडलें आहे; आणि त्याचा नाट्य दृष्टया उपयोग भीम आणि घटोत्कच यांची भेट, दंद्व- युद्ध आणि शेवटीं भीम आणि हिढडिम्बा यांचे मीलन होण्यांत केला आहे, उपकथानकाऱची कल्पना ऐतरेय ब्राह्मणांतील शुनःशेपाच्या कथेवरून किंबा महाभारतांतील बकवघधाच्या प्रसंगावरून सुःचलेली असणे दाक्य आहे, परंतु या उपकथानकानची रचना आणि
(४)
विदोषतः भीमघटोत्कच यांची भेट साध्य करण्यासाठीं त्याची जी योजना येथे केली आहे त्यांत नावीन्य आहे यांत शंकाच नाहीं. याशिवाय, घटोत्कच आणि हिदडिम्या यांच्या स्वभाव- लेखनांतील बदल कथावस्तूच्या दृष्टीनें जितका ओचित्यपूरण तितकाच नास्यदृष्ट्याहि परिणामकारक म्हटला पाहिजे.
: व्यायोग ? म्हणजे प्रख्यात नायक असलेलें, अनेक पुरुष- पात्रे ब अल्प स्त्रीपात्रे असलेल, युद्ध आणि द्दवदयुद्ध यांनीं भरलेलं, वीररसात्मक एकांकी नाटक. ' मध्यमव्यायोग हे एकांकी नाटक अनेक दृष्टींनी वे शिष्टयपूर्ण आहे. इतर एकांकिकां- मध्ये कुठ भरतबाकक््य नाहीं म्हणून, तर कुठं दूतनाटकांतील कथावस्तूप्रमाणं कथानक अपुरे वाटते म्हणून, या स्वयंपूर्ण एकांकिका. नाहींत, असे मत कांहीं विद्वानांनी प्रतिपादिळे आहे, परंतु * मध्यमव्यायोग ' ही स्वयंपूर्ण एकांकिका पाहिली म्हणजे, महाभारताच्या आधारे अदी स्वतंत्र एकांको नाटके रचण्यासची भासानची कल्पना असली पाहिजे असे स्पष्ट दिसत, तेव्हां, दूत-नाटकांत सकृद्दर्शनी दिसणारा अपुरपणा रचनेचा नसून कथावस्तूचाच्च आहे, आणि त्यामुळें, किंवा भरतवाक््यासारखी तांत्रिक बाब नसल्यामुळं, एकांकिकेंच्या स्वयंपूर्णतेला बाध येण्यासारख्या नाहीं, असेंच मानणें योग्य होईल,
६ मध्यमव्यायोग ' नाटकांत मुख्य वीररस असला तरी, त्राह्मण कुटुंबाच्या दयनीय अवस्थंत करुण ब भयानक आणि भीम- घटोत्कचांच्या द्वंद्रांत वीर, रोद्र, अद्भुत या रसांच्ाहि परिपोष झालेला आहे, दिवाय, भीम-घटोत्कचांच्या प्रवशांत जे नाट्य- छलित ( ताः3113112 1701४ ) आहे, त्यांत जशी अद्भुताची तशी हास्याचीहि छटा आहे. या. एकांकिकेतीळ उपकथानक
(५)
आणि मुख्य कथानक यांचा सांधा बिनचूक जुळलेला आहे. सर्व प्रसंग जवळ-जवळ एकाच पाश्वभूमीवर घडलेले आहेत. आणि कथानकाचा काळ सकाळपासून मध्याह्यमापयेत सुमारें दोन-तीन तासांचाचच आहे. स्हणजे कथावस्तु, स्थल आणि काल यांची एकताहि या स्वतंत्र, स्वयंपूण एकांकिकेत भासाने साघली आहे हें दिसून येईल.
७ ७6 ५
द्रूतप्रसंगाने द्रोपदीची भर राजसर्भेत विटंबना झाली, त्या अपमानांतून पुढ भारतीय युद्धाचा वणवा पेटला, अज्ञातवासाची अट पुरी केल्यावर पांडवांनी आपल्या वांटणीच्या राज्यासाठी दुर्यांधनाकडे मागणी केली, दुर्योधनाने तिचा अव्हर केला आणि त्यामुळें युद्ध अटळ झालं, या वेळीं पांडवांची मागणी सादर करण्यासाठी आणि आपले वैयक्तिक वजन खर्च करून सुद्धापायीं होणारा संहार टाळावा, ह्या उद्देशांने स्वतः श्रीकृप्णांन दूताची भूमिका धेऊन रदिष्टाई, केली. ह्या सुपरिचित प्रसंगावर : दूतवाक््थ ' ही एकांकिका भासांने रचलेली आहे,
कथानकाला नाऱ्याचा साज ववढवितांना कांहीं फेरफार अवबद्य असतातच, परंतु एक निदिष्ट नास््यपरिणाम साधण्या- साठीच भासान कांहीं विशष बदल केलेले आहेत. नाटकाचा गाभा, दुर्योधन आणि श्रीकृष्ण यांच्या चढ्या संवादाने भरलेला आहे, या दोन पात्रांवरच सर्व नास्यवस्तु केंद्रित करण्यासाठी इतर अनेक पात्रांची उपस्थिति केवळ निदेंदा करून सुचचाविली आहे. धृतराष्ट्र राजसभेत सुरुवातीला हजर नसल्याचे दाखवून सभेचे नेतेपद अनायासे दुर्योधनाकडे दिळें आहे. त्यामुळं
(६)
श्रीकृष्णाला साक्षात् दुर्यांधनाशींच सर्व बोलणें करावे लागते, या संवादांतूनच सर्व नाट्य आकारास येतें.
या रचनेमुळें दुर्योधन आणि श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्वाचे घारदार आणि तेजस्वी पेळू उत्कटपणे प्रत्ययाला येतात. दुर्योधन हा मानी, हेकट, जिद्दी आणि दुष्टहि आहे. पण त्याचबरोबर त्याची जी क्षात्र-वृत्ति दिसून येते तिचे तेजदेस्त्रील अपूर्व आहे. सर्व राजसभेला आपल्या शाब्दाप्रमागे नाचवून दुर्यांधन प्रत्यक्ष *शत्रीकूुष्णासमोर आपला गर्वोद्धत दाबा चालवा- यला मुळींसुद्धां कचरत नाहीं, त्याच्या अहंकारांत सम्राटाचा तोरा आहे, आत्मीवश्वासाचा बेडरपणा आहे. त्याने पांडवांचा आणि श्रीकृष्णाचा केळेला उपहास आणि विशेषतः ' राजपदाऱची प्राति म्हणजे भिकेची मागणी नव्हे ' हे त्याचे ठाशीव उद्गार अविस्मरणीय आहेत,
श्रीकृष्णाने दूताची भामिका करतांना राजकारणाचे आणि माणुसकीच्या व्यवहाराचे सवे पवित्रे दाखविळे आहेत. शेवटी मात्र स्व उपाय हरल्यावर दैवी शक्तीचा चमत्कार दाखविला आहे, विश्वरू्पांच दर्रान आणि सुददीनादि दैवी आयुांचे आगमन हा अद्भुत भाग या एकांकिकेच्या रचनेचा एक महत्त्वाचा विशेष आहि. या अद्भुताच्या दशनाने कुरुवंशाच्या नाशाची सूचना स्पष्ट करण्याचा उद्देश साधलेला आहे, श्रीकृष्णाने दुर्योधनाला प्रत्यक्ष बोलून जं सांगितले त्याचें, म्हणजे दूतवाक्याचे, आगामी अनथौचे, दृश्यात्मक प्रत्यंतर नाटकाच्या शेवटच्या भागांतील अद्भ॒ताच्या योजनेने घडविळें आहे. भारतीय युद्धाला निमित्त- भूत झालेला द्यूतप्रसंग नाटकाच्या सुरुवातीला चित्रपटाची योजना करून पाश्वभूमीदाखळ जसा रंगविला आहे, त्या'च-
(७)
प्रमाण आगामी संहाळराचे चित्र अद्भुत हृद्य्याच्या रूपानं उभे केलें आहे.
या एकांकिकेच्या रच्चनंत दृश्यात्मकतेचा वांटा ( 55८०६३- ०0183 35९० ) फार मोठा आहि, वास्तविक, येथील रंगस्थल म्हणजे दुर्योधनाची मंत्रशाळा, कौरवपक्षीय वीर आणि राजे येथे उपस्थित आहेत. परंतु या रचनेची कल्पना देण्यापुरता : कांचयुकीय ' या पात्राचा उपयोग केला आहे; बाकी मंत्रणेचे सारे काम दुर्योधनाच्या भाषणांतूनच केवळ साधळें आहे. शेवटींहि एकस्या सुद्दनाच्या भाषणानेंच आयुधांच्या आगमन- निर्गमनाचे हृइ्य सूचित केळे आहे. असंख्य पात्रें रंगभूमीवर असूनहि बोलणारी पात्रे मात्र दोन-चारच आहेत. रचनेची ही विशिष्टता लक्षणीय आहे. साहजिकच, एवढ्यासाठी दीघ एक- मुसत्री भाषणांची योजना जरी भासाला कराबी लागली, तेरी दृश्यात्मक परिणासाच्या भव्य कोंदर्णांत चमकणाऱ्या संवादाचे तेज प्रकषीने प्रकट झालें आहे, असे दिसून येईल,
भारतीय युद्धाचा वणवा पेटण्यापूर्वी कोरव-पांडवांच्या मघल वैर सामोपचचारानं मिटलें तर पाहावें म्हणून भ्रीकृप्णाने मनः- पूर्वक प्रयत्न केला. कृष्णशिष्टाईचा हा भाग “दूतवाक्य ' या एकांकी नाटकांत आला आहे. युद्धाला सुरुवात झाल्यानंतर मात्र अंत येईपयंत युद्ध चाळू होतं. मध्यंतरी शिष्टाईचे बोलणे करण्याचचा कुठें प्रश्नच आलेला नव्हता. परंतु भासाने असा प्रसंग आपल्या कल्पनेने उभा केला आहे. युद्धांत अभिमन्यु पडला; पुत्रनिधनाने शोकाकुल होऊन सूर्यास्ताच्या आंत जय-
(८)
द्रथाचा वध करण्याची भीषण प्रतिश्ा ,अर्जुनार्न केळी. था अवधींत दुःखभराने आणि अनथोची अनिवार्य परंपरा आतां तरी थांबवावी या बुद्धीने, श्रीकृष्णाने घटोत्कचाबरोबर संदेश देऊन त्याला धृतराष्ट्राकडे पाठविलें अशी कल्पना भासाने करून त्यावर ' दूतघटोत्कच ? या एकांकिकेची उभारणी केली आहे. “या दोन दूतनाटकांची पार्श्वयूमि जशी मिन आहे, तशी ल्यांच्या स्वरूपांतहि साहजिकच मिनता. आहे. ' दूतवाक्य ! नाटकाचा प्रसंग कौरवांच्या मंत्रशाळेंत घडतो, या वेळीं द्रोणाचार्य, भीष्मपितामह इत्यादि वयोवृद्ध माणसं आणि कौरबपक्षीय राजे सभास्थानी हजर आहित. प्रसंगांतील उत्कटता साधण्यासाठी सर्व व्यक्तींना पार्श्वभूमींतनचच ठेवून भासानं दुयोधनाच्या स्वभाव- रेखेवर मुख्य लक्ष केंद्रित केळं आहे; आणि द्रौपदीवस्त्रहरणाचा प्रसंग चित्रपटाच्या रूपाने सुरुवातीला योजून एकीकडे उत्कटतेला धार आणली आहे, तर दुसरीकडे भावी अनर्थ अटळ असल्यान्ची गंभीर सूचना दिलेली आहे. शिवाय, दूताच्या भूमिकेत श्रीकृष्णच असल्याने व श्रीकृष्णांचे देवपण ग्र्हीत धरल्याने या नाटकांत अद्भुताचा अंशहि फार मोठ्या प्रमाणा- वर आलेला आहे. या अद्भुताच्या दर्शनाने कोरवांच्या मुजार- पणानची विफलता पटून, शेवट काय होणार आहे याचे सूच्चक चित्रह्ि नजरेसमोर उभे रहाते. दुर्योधन, श्रीकृष्ण आणि पुढे सुद्रीन एवढ्याच व्यक्तिरेखा ठळकपणें.रंगवून भासाने संवादां- तील संघर्ष आणि त्याची अटळ अस्तेर, एवढ्यांवर नाट्यपरिणाम साधला आहे.
उलट, अभिममन्यूचे निधन आणि पुढील जयद्रथाचा वध या दोन टोंकांत “ दूतघटोत्कच ? या नाटकाचा प्रसंग कल्पिळेला
(९)
असल्यामुळें कारुण्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव दरीनाचे चित्र खुलून उठले आहे. अभिमन्यूच्या वधाची शोकात्मक प्रतिक्रिया अर्जुनाच्या दु:खांतच नव्हे, तर श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला पाठ- विलेल्या संदेश्ांतहि प्रकट झाली आहे. कौरवांच्या बाबतींत निदान धतराष्ट्रापुरती तरी ही प्रतिक्रिया शोकाची आहे आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या भयाची आहे. उत्तरेला वेधव्य आणणा- ऱ्याने स्वतःच्या बायकोवरहि वैधव्याचा प्रसंग ओढवून घेतला आहे, असं दुःशला सहजी बोळून जाते. या उद्गारांतील भीषण सत्य त्या क्षणीं कळले नाहीं तरी ते कळायला वेळ लागत नाहीं. धृतराष्ट्राच्या हृदयांत घोर अंधार भरून जातो. दारुण निरादोने त्याला पुढचा अनर्थ नुसता अटळ वाटतो एवढेंच नसून त्या अनर्थांचे स्पष्ट न्वित्र त्याच्या आंधळ्या डोळ्यांसमोरहि स्पष्ट उभे रहाते. अभिमन्यूच्या उत्तरक्रिय बरोबर आपल्या पुत्रांची उत्तरक्रिया उरकून घ्यावी असें वबाटण्याइतका अगातेिक शोक त्याला झालेला आहि, ज्ञाति- कुलांत माजलेळें हे वेर पोराबाळांपयेत येऊन पोंचलें, या दाहक जाणिवेचे भय वृतराष्ट्राच्या उरांत दाटलेळें आहे, श्रीकृष्णाच्या संदेशांत या भयाचें सूचन आहे. पण धृतराष्ट्र अगतिक आहे; ज्या खंब्नीरपणाची अपेक्षा त्याच्याकडून श्रीकृष्णाने केळी आहे तो खंबीरपणा दुर्योधनासमोर दाखविण्याइतकी शक्ति धत- राष्ट्राच्या अंगी नाहीं.
या करुण विफलतेचे रंग सुरुवातीला आल्याने दुर्योधनाचा उद्दामपणा विरोधानं अधिकच खुळून दिसतो, दुर्योधन उद्दाम आहे, हृद्टी आहे; परंतु क्षात्रवत्तीचा निर्भयपणाहि .त्याच्या अंगीं प्रेपूर आहे, अभिमन्यूच्या वधान पांडवांच्या मर्मावरच
( १०)
आघात केल्याचे समाधान त्याला आहे. अर्जुनाच्या प्रतिशेने त्याला आनंद होतो. कारण, जयद्रथानचे संरक्षण सहजीं करू असा त्याला आत्मविश्वास आहे; आणि त्यामुळे विफलप्रतिज्ञ अर्जुनाने चितारोहण केल्याचे च्वित्र मनासमोर उभे करून तो हर्षाने नाचतो. श्रीकृष्णाच्या संदेशाचे ब त्यांतील धमकीचेहि त्याला हंसू येते ! दुर्योधनाच्या या प्रतिक्रियेत उद्दाम बेछूटपणा असला तरी त्यामागे स्वतःच्या सामथ्यीचा प्रत्यय आहे, कौरव- पक्षीय वीरांच्या पराक्रमाचा विश्वास आहे. म्हणूनःच घटोल्कचाला उत्तर देतांना तो त्याला तुच्छतेने रवाना करतो आणि श्रीकृष्णाला, युद्धभूमीवर तुला बाणांनीं उत्तर देईन, असा वीराला शोभणारा निर्भय संदेश पाठवतो.
घटोल्कचाचची भ्रूमिका श्रीकृप्णापेक्षां वेगळी आहे. तो एक पोर आहे; बोलण्याचे डाबपेंच त्याला अवगत नाहींत; श्रीकृष्णा- प्रमाणें देवी शाक्तिहि त्याच्या पाठीशी नाहीं. परंतु त्यामुळें त्याच्या स्वाभाविक दरत्तींचे रंग जिवंतपणे प्रकट झाळे आहेत, घटोत्कचाऱचं बेडर घेय, स्पष्टवक्तेपणा आणि सरळ, निष्कपटी स्वभाव यांना तोड नाहीं. श्रीकृष्णाविषयीर्ची त्याची क्ति जशी निर्विवाद आहे, तसा असुनकाकांच्या पराक्रमाबद्दल त्याला वाटणारा विश्वासटि संशयातीत आटे. अंगांत राक्षसांच रक्त असले तरी तो सहूदयंतेंला आणि सभ्यतेला पारखा नाहीं. धृतराष्ट्राचा मान राखून त्रे त्याला उपचारपूर्वक 'अभिवादन करतो. 'धृतराष्ट्रान अभिमन्यूब्द्दळ दुःख - प्रकट कॅरतांच त्याचे अंतःकरण विरघळते, आणि धृतराष्ट्र किती चांगला आहे, असें तो बोलून दाखवतो. श्रीकृष्णाच्या संदेशांत अर्जनाच्या शोकाने वर्णन आहे; तं ऐकून दुर्योधन वगेरे हंसू लागतात; तै पाहून
(११)
किंचित् वरमून तो पांडवांची तरफदारी करतो आणि शोका- घातांन पराक्रमी पुरुषांचे हृदयहि खचून जांते असे सुचवितो. अथौत् कौरव दुष्ट आहेत, त्यांना रात्र म्हणूनच वागविले पाहिजे, याविषयीं घटोत्कचाच्या मनांत मुळींच दोका नाहीं. श्रीकृष्णांनी पाठवणी केली नसती तर त्याने कोरवांचें तोंड युद्धभूमीवरच पाहिले असतं ! म्हणूनच शब्दानं शब्द वाढतांचच घटोत्कचाचा निभय स्पष्टवक्तेपणा एकदम प्रकट होतो, शकुनीला त्यानं दिलेला टोमणा आणि, प्रत्यक्ष भावांशीं क्रूरपणानें वागणारे कौरव राक्षसांनाहि लाजवतील, अद्या आशयाचे दुर्योधनाला त्याने सुनावलेळे उद्गार जितके तेजस्वी तितकेच अविस्मरणीय आहेत.
या एकांकिकेत 'वृतराष्ट्र, दुःशला, दुर्यांधन, घटोत्कच अशा अनेक व्यक्तिरेखा भासाने जिवंत केल्या आहेत, आणि करुणरसाऱ्ची बीररसाशीं सांगड घाडून खळबळ उडवून देणारे नाट्य निर्माण केळे आहे. या चित्रांतील वास्तवतेचे रंग, आणि हा सवे प्रसंग भासानं केवळ आपल्या कल्पकतेने उभा केला आहे ही वस्तुस्थिति “र्या सवे गोष्टी लक्षांत घेतल्या म्हणजे भासाच्या नाठ्यसामर्थ्यांचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाहीं.
संस्कृत नाट्यवाडूमयांत शोकांतिका हा नाट्यप्रकार नाहीं, संस्कृत नाटकांत शोकरस अर्थात् भरपूर प्रमाणांत आढळून येतो, किंबहुना, वाचक-प्रेक्षकांच्या भावना गदगदून हल- विण्याचे एक हुकमी साधन म्हणून शोकरसाची योजना संस्कृत नाटककारांनी साक्षपानं केलेली आहे, परंतु सबंध नाटकाला शोकांतिकेचे रूप यावे यासाठीं ज्या विशिष्ट तऱ्हेची
(१२
नाट्यरचचना, कथावस्तूची मांडणी आणि पात्रालेखन इत्यादि गोष्टी पाहिजे असतात, त्या मात्र त्यांनीं योजिलेल्या नाहींत. या वस्तुस्थितीला अपबादरूप अक्या भासाच्या ' कणभार ' आणि “* ऊरुभडूग ' या दोन एकांकिका काय त्या दाखविण्या- सारख्या आहेत,
: ऊरभडगा ' ची रचना भासाने हेतुपुरस्सर केलेली दिसते. संस्कृत नाटकांत लढाई, दृंदर्युद्ध यांसारखे भीषण प्रसंग प्रत्यक्ष दाखविण्याची मनाई आहे. भास ही वज्योवज्यता पाळीत नाहीं. असे असूर्नाहे भीम-दुर्यीधनांच्या गदायुद्धाचा प्रसंग त्याने तीन सैनिकांच्या निवेदनाद्वारे रंगाविला आहे. याचें कारण ' ऊरुभडूगा ? च्या प्रत्यक्ष प्रसंगांतील थरारक प्रक्षोभक नाट्यापेक्षां दुर्योधनाच्या जीवनांतील करुण नाट्यचच त्याला मुख्यतः चित्रित करावयाचे होतें, हेच असावे. ऊरुभड्गाचे बाह्य जड दृश्य सजविण्यापेक्षां दुर्यांधनाच्या जिवंत अंतरंगावर प्रकाश पाडण्याने मानव्याचे दरोन अधिक गाढपणे प्रतीत होईल, यांत रोका नाहीं, म्हणून भासाने सर्वे कथावस्तूची मांडणी दुर्योंधनाभोंबतीं केली. गदायुद्धाचें निवेदन संपून प्रत्यक्ष मुख्य हृदयाला सुरुवात होते तेव्हां मांड्या चिरडून रक्ताने माखठेला घायाळ दुर्योधन खुरडत खुरडत रंगभूमीवर प्रवेश करतांना दिसतो, प्रेक्षकांचे लक्ष दुर्याघनाबर खिळते आणि नाटकाचा शेवट होईपर्यत ते तसंच रहाते. दुर्योधना- विषयीं सहानुभूतीचा उमाळा येतो, आणि ही सहानुभूति शेवटपयंत अज्लीच टिकून रहाते.
कारण, भासाचा दुर्योधन वेगळा आहे. महाभारतांतल्या दुर्योधनाप्रमार्णे तो दुष्ट, कपटी, मग्रूर आणि मदांध असा नाही.
(१३)
म्हणूनच गदायुद्धांत दुर्योधनाचे पतन झाल्यावर एका दुर्टाचे निर्दालन झाल्याचे सात्त्विक समाधान जे महाभारतांत मिळण्याचा संभव आहे, ते “ ऊरुभड्गांत ' मिळणे शक्य नाहीं. भीम अधिक बलवान् असला तरी दुर्योधनाचें युद्ठकोरल्य निर्विवाद आहे; आणि याच्चा प्रत्यय द्वंद्दयुद्धांत आल्यावांचून रहात नाही. इतर्केन्च नव्हे तर, कृष्णाच्या प्रेरणेने भीमाने कपटाचा आश्रय केला नसता तर दुर्योधनासारख्या निष्णात योद्धथाला सरळ जिंकणे अशक्यच होते, असें आपल्याला पटतं. दुर्यांघनाविषर्यी जी गाढ सहानुभूति आपल्याला वाटते, त्याचं मूळ इथं आहे. या ' वेगळ्या ) दुर्योधनाच्या जीवनाचे अंतिम क्षण हा : ऊरुभड्गा ? चा खरा नाटव्यविषय, हे क्षण अतिशय बोलके आहेत. त्यांत दुर्यांधनाच्या जीवनांतील कारुण्याबरोञरच त्याच्या स्वभावांतील उदात्तताहि भराला आली आहे. गुरुजनांविषयीं नितान्त आदर बाळगणारा; मांड्या गेल्याच्या शारीरिक दुःखापेक्षां पा्यांदये लवून वंदन करण्याची रक्कयता आतां उरली नाहीं या 'जाणिवेने बिह्ृळ झालेला; आणि पुढील जन्मीं त्याचच मातेच्या कुश्ींत जन्म घेण्याचा हळवा आग्रह धरणारा पुत्र.... आपल्या असू्येपश्या अद्या स्त्रिया रणांगणावर उघड्या माथ्याने येऊन आपल्यासाठी शोक करीत असलेल्या पाहून ज्याच्या हृदयाला चरका बसला असा मानी पति....आणि पुत्रवात्सल्यांने ज्याचे हृदय अक्षरशः विरघळले आणि पुत्राचे हक्काने बसण्याचे आसन अशा मांड्या नाहीशा झाल्यामुळे रणभूमीवरच्या जख- मांची वेदना ज्याच्या हृदयांत सहसघारांनी उफाळून आली असा प्रेमळ पिता. ..हें दुर्याधनाचे दर्शन नर्वे आहे. त्यांतील कारुण्याच्या अश्रबिंदूंवर उदात्ततेचें इंद्रधनुष्य चमकत आहि.
(१४)
या अंतिम क्षणीं दुर्योधनाचे मन आरशासारखे स्वच्छ झालें आहे, आपल्या घातक कृतींचा अर्थ त्याला समजून आला ओहे. वैराची आणि युद्धाची निष्फळता त्याला जाणवली आहे. बलरामाला आणि अश्वत्थाम्यालासुद्धां आपल्या मृत्यूचा बदला घेण्याच्या इच्छेपासून तो प्रामाणिकपण परावूत्त करीत आहे. दुजयाला त्याने केलेल्या उपदेशांत वेर नाहीं, सूडाची भावना नाहीं, अप्रामाणिकपणाहि नाहीं, उलट, एक विशाल जाणीव आहे.
दुर्योधनाला खरोखरीचा पश्चात्ताप झालेला आहे. मात्र हा पश्चाताप निष्फळतेतून, रितेपणामधून जन्माला आलेला नाहीं, है ध्यानांत ठेवलें पाहिजे, तसा असता तर, दुर्योधनाचे चारित्र्य आणि एखाद्या सामान्य माणसाचे जीवन यांत कांहीं भेद उरला नसता. जीवनाऱचा विशाल अर्थ उमजून मानवी नियतीची प्रचंड शक्ति जाणवली म्हणजे वेर, मत्सर, सूड इत्यादि मानवी विकार कसे भुसभुशीत, निरथक आहेत, हें कळायला लागते. जीवनाच्या उंचसखल प्रांगणांत ज्या गोष्टींचा अर्थ कधीं लागठेला नसतो त्या गोष्टी मृत्यूच्या द्रींत शिरतांना समजायला लागतात ! दुर्योधनाचा पश्चात्ताप या जाणिवेतून अवतरला आहि, या नव्या जाणिवेने दुर्योघनाचे मन धुवून निघारळे आहे. म्हणूनच आपल्याला मरण आले ते भीमाच्या हातून आलें, हा लौकिक समअञ त्याला उथळ वाटतो. आपला मृत्यु ही जगनियंत्यानची घटना ! त्यांत बदला कक्याचा घ्यायचा : शोक कशाचा करायचा? मात्र या साऱ्या अनथोचे मूळ जो अभिमान, तो दुर्योधनाचा प्राकृतिक अटळ धर्म आहे, ' राजे मुळीं अभिमानानच घडवले आहेत ' असे तो अश्वचत्याम्याला सांगतो. या अभिमानाने ओढवलेल्या अनर्थपरंपरेची जाणीव त्याला या अंतिम क्षणीं
(१५)
झालेली आहे. अर्थात्, ज॑ झालें त्याला इलाज नाहीं. ते अपरिहाये आहि, म्हणूनच दुर्योधनासारखा मानी राजा ज्या अभिमानाने मान ताठ ठेवून जगला त्याच अभिमानाने मन शांत आणि स्वन्छ करून तो स्वगीला जात आहे. या अपरिहार्यतेंत दुर्या- घनाच्या जीवनाची शोकान्त्का सामावळेळी आहे. नव्या जाणिवेने उजळलेल्या त्याच्या मनोद्रीनांत जीवनाचा उदात्त अर्थ आहे. म्हणूनच * ऊरुभड्ग!' या एकांकिकेला करुणोदात्त नाऱ्याचचें, स्वयंपूर्ण शोकान्तिकेचे रूप प्रात झाळें आहे,
: कर्णभार ' ही आकाराने सवीत छोटी एकांकिका, परंतु तिचा दर्जा मोठा आहे, येथेहि भासांन कर्णाच्या व्याक्तेचित्रणा- भोबतीं नाट्यरचनेचे सारे रंग गोळा केळे आहित, वस्तुतः कवचच-कुंडल-ह्रणाऱचा प्रसंग आणि कर्णौर्जुनांचें युद्ध हे दोन्ही स्वतंत्र प्रसंग असून, महाभारताच्या कथेप्रमाणे त्यांच्यांत काल- दृष्ट्याहि मोठें अन्तर आहे. परंतु भासाने ऐन युद्धभूमीवर, कर्ण अजुनाशी युद्ध करायला रथांत बसून निघालेला असतांना, कवऱच-कुंडल-हरणाचचा प्रसंग मध्यवर्ति दृश्यासारखा रंगविला आहे, आणि असें करण्यांत कणाच्या स्वमावांतील जो महान् गुण, आणि महान् दोषहि, म्हणजे त्याचे अमयीद दातृत्व, त्यावर नेमकें बोट ठेवळें आहे, कर्णाच्या नाशाला अर्झुन निमित्त झालेला असला तरी कर्णाच्या या अजोड दातृत्वानेंच खरोखर त्याचा विनिपात घडवून आणलेला आहि, ब्राह्मणवेषधारी शक्राला संतुष्ट करण्याच्या प्रयत्नांत कर्णाच्या औदार्याला कसली मयादा म्हणून उरलेली नाहीं. कव*च-कुंडलांच्या दानाने आपण आपल्या
(१६)
प्राणांचे दान करतो आहो या जाणिवेपेक्षां, देवेन्द्राला कृतार्थ केल्याचा उन्मादी आनंदच कर्णाच्या हृदयांतून ओसंडत आहे! कर्णाच्या औओदार्यांचे हे दर्शन उदात्त आणि भव्य आहि. त्यानची भव्यता आणखी वाढायची म्हणूनच कीं काय, भासाने रक्राला प्राकृतांत बोलायला लावून यान्वकाच्या हिणकस मनोवृत्तीच्या समोर कणाच्या उदार दातृत्वाचे लखलखणारे सुवर्ण मांडून ठेवलें आहे.
कणीच्या अतुलनीय व्यक्तिमत्वाचा हा गाभा म्हणजे शोकान्तिकेंतीळ नायकाचा उदात्ततेचा, भव्यंतेचा गुण होय, या गुणाच्या चित्रणांत शोकान्तिकेचे सारे रग भरलेले आहेत. या रंगांना वेगळा उजळा देण्यासाठीं, या छोट्या एकांकिकेंतहि रचनेने कांही विशेष भासानं हेतुपूवक गुंफलेले आहेत, वित्रण्ण- तेने भरलेल्या मनाने युद्धभूमीवर पडणार कणांचे पाऊल ही या शोकान्तिकेनी पूर्वसूचना परशुरामांच्या शापाचा प्रसंग उच्चळून त्याचा सांधा येथील कथावस्तूशी जोडण्यांत मुळांतील कारुण्याला बिलक्षण घार आलेली आहे, परंतु कारुण्याचे रंग केवळ खुलवून कर्णाच्या शोकान्त जीवनाचे भव्यत्ब संपूर्णतया प्रकट झालें नसतं, त्याला सहानुभूतीच्ची जोड अवश्य होती, भासान शल्याची व्यक्तिरेखा बदलली आहे; आणि त्याच्या अपार सहानुभूतीने कर्णाच्या दुर्दैवालळा आणि दुर्दैवी औदार्याला तोठून घरले आहे, इतकेंच्च नव्हे तर इंद्रालाहे पश्चात्ताप झाल्याच दाखवून कर्णाच्या जीवनांतील कारुण्याला स्निग्धतेची जोड मिळवून दिली आहे,
: कर्णभारां 'तील कारुण्य, सहानुभूति आणि उदात्तता यांचे रंग पाहिले म्हणजे, * जिथे तो अजुन असेल तिथे माझा रथ
(१७)
घेऊन जा ' या तीन ऐन मोक्याच्या वेळी उच्चारलेल्या वाक्यांतील शोकान्त सूच्चकते-चें मर्म ध्यानीं येतें : युद्धभूमीवरील कणीचा हा रथांतील प्रवास म्हणजे जीवनाची अंतिम यात्रा होय ! या विनाक्लाच्या साऱ्या खुणा अगोदरच प्रकट झालेल्या आहेत आणि त्यांत जी कलात्मक सून्वकता आहे ती ध्यानांत घेतली म्हणज, अर्जुनाच्या बाणांनी कणाचा प्रत्यक्ष अन्त दाख- विण्याने या नाजूक चित्रणाचा चुराडा झाला असता, असें बाटल्याबांचून रहाणार नाहों. म्हणूनच, जिथे तो अर्जुन असेल तिथे कर्णाचा रथ चालला आहे, या सून्वनेवरऱच भासाने कर्णाच्या जीवनावर पडदा पाडलेला आहे. “ ऊरुभड्ग ' या एकांकिके- प्रमाणे, येर्थाह कर्णाच्या जीवनाचे भव्य आणि उदात्त अन्तिम क्षण भासाने साकार केळे आहेत. ' ऊरुभडूगां 'तळें बोलके नाट्य येथे नाहो; परंतु यांतील कलात्मक सूचकता इतकी नाजूक आहे की ती जाणवायला हृदयाचेच कान आणि डोळे केले पाहिजेत,
भासाच्या या पांच एकांकिका सारख्या तोलाच्या आणि दर्जाच्या नाहींत, हे सांगावयास नकोर्च. परंतु त्या सबोमध्ये भासाच्या स्वतंत्र प्रशञेचा, तंत्रकुरालतेचचा आणि प्रभावी, जिवंत नाटय निर्माण करणाऱ्या नाट्यप्रतिभेचा साक्षात्कार वेगवेगळ्या रूपांमध्ये झाल्यावांचून रहाणार नाहीं.
अनुक्रम
१, मध्यमव्यायोग ० 4 २, दूतवाक्य .. २३ ३. दूतघटोत्कच .... डॅरे ४. ऊरुभडूग नी ६१ ५, कर्णभार व ८० व्हू पूर्वप्रसादि !
म'ध्यमव्यायोग : ( चित्रमयजगत् , डिसेंबर, १९५६ ) दूतवाकय १ ( साधना, दिवाळी अंक, १९५७ ) दूतघडटोत्कच : ( सत्यकथा, जानेवारी, १९५८ ) ऊरुभडूग ५ ( साधना, दिवाळी अंक, १९५६ ) कर्णभार : ( सत्यकथा, जून, १९५६)
श्र
प्रस्तुत अनुवादांत मूळ नाटकांमधील नान्दी, भरतवाक्य आणि प्रस्तावनेचा बहुतेक भाग गाळलेला आहे, ' ऊरुभड्ग ' या एकांकिकेत मात्र सुरुवातीच्या विष्कंभकांतील आवश्यक तेवढा निवेदनाज्या भाग हेतुपूर्वक ठेविला आहे,
संस्कृत नाटकांची शैळी गद्रपद्ममिश्रित असते. अनुवादांत सरळ गद्यच योजिले आहे. अनुवाद करतांना, मूळ संस्कृतांतील सामासिक रचना आणि विदोषणांचे वाक्यखंड मराठी भाषेच्या प्रकृतीला शोभण्यासारखे नसल्यामुळे ते सरळ करून धेतले आहित. एरव्ही मूळ नाटकाचचा आधार कोठेंहि सोडला नाही; मुळांत पदरची भर घातलेली नाहीं; फक्त प्रसंग, कल्पना, संवादाचा ओघ इत्यादींचा अर्थबोध सुलभ व्हावा म्हणून अनेक रंगसूचना तेवढ्या स्वतःच्या घातल्या आहेत; त्या कंसांत दिल्या आहेत.
भासाच्या नाटकांना अनुवादाचा पेहराव चढवितांना मराठीन्ची भाषिक प्रकृति सांभाळण्याचा मनःपूवक प्रयत्न केला आहे.
श्र
मध्यमव्यायोग
3 पात्र ( प्रवेश्शानुक्रमानं )
केशबदास-एक वृद्ध ब्राह्मण
मोठा
मधला ( मध्यम ) | केरवदासानचे तीन पुत्र धाकटा
ब्राह्मणी-केशवदासाची पत्नी
घटोत्कच
भीम
हिडिम्बा
-< भासाच्या एकांकिका
[ केशवदास, त्याची पत्नी ब्राह्मणी व त्याचे तीन पुत्र प्रवेश करतात. पाठोपाठ धीम्या गतीर्ने घटोत्कच प्रवेश करतो. वाघाने पाठलाग केल्यावर गायीची जश्ली त्रेधा उडेल, त्स सारं त्राह्मण- कुटुंब भयग्रस्त झालेले आहे. सुरुवातीची त्यांची भाषणे दबलेल्या आवाजांत चालतात. ]
केशवबदास : कोण बरें असावा हा? प्रभातीच्या सूर्य- किरणांप्रमांण असलेले ह्याचने' लाल-पिवळे केस वाऱ्याने विखुरले आहेत, भुवया चढवल्यामुळे ह्याचे पिंगट मोठे डोळे ऱवमकत आहेत, गळ्यांत सोन्याची साखळी घातल्याने विजेने लकाकणाऱ्या नीलमेघासारखा हा दिसतो आहे. युग- विल्याच्या वेळीं प्रकटणाऱ्या रुद्रशिवाप्रमाणे हुबेहूब ह्याची मूर्ति भासते आहे !
मोठा पुत्र : बाबा, हा कोण हो ! दोन ग्रहगोलासारस्त्र दिसणारे ह्याचे डोळे, पुष्ट आणि विशाल छाती, सोन्यासारखे पिवळेधमक केस, नेसलेला पीतांबर, अंधाराच्या ढिगाऱ्यासारस्त्री कांति, आणि पुढे आलेले सफेत दांत---पोटांत चंद्राची कोर लपविणाऱ्या निळ्या जल्मेघाप्रमाणे दिसतो आहे हा !
मधला : बाबा, कोण हो हा ! हत्तीच्या सुळक्य़ासारखे ह्यांचे दांत, नांगरासारखें नाक, हत्तीच्या सोंडेसारख्रे बाहू, नील- मेघाचा वर्ण आणि आहुतींनीं प्रज्वलित झालेल्या अग्नीची दीति -ःदा समोर उभा राहिला म्हणजे त्रिपुरासुराच्या नगरांच दहन करतांना उफाळलेला भगवान् दुकराचा भयंकर क्रोघधच साकार झाल्यासारस्त्रे वाटते !
धाकटा : बाबा, हा कोण आमचा छळ करतो आहे : महान
मध्यमध्यायोग ३
पर्वतावर होणारा वज़पात, सर्व पक्ष्यांना हेराण करणारा ससाणा, पशूंच्या झुंडींना छळणारा सिंह,,..कां पुस्षाचे रूप घेतलेला मृत्यूच :
ब्राह्मणी : आर्य, हा कोण आम्हांला सतावतो आहे १
घटोत्कच : ( पुढें होऊन ) ए ब्राह्मणा, उभा रहा, उभा राहा ! घाबरलेल्या बरायकोपोरांचे रक्षण करण्याची शक्ति उरली नाहीं म्हणून माझ्या भीतीने तुझे सारे घेयच गळालेलें दिसते आहे. गरुडाच्या पंखांच्या टोकाचा बारा लागून भडकलेल्या क्रोधाग्मीची झळ लागलेला विव्हळ साप सापिणीला घेऊन जसा पळ काढील तसा तूं कां पळतो आहेस : ए ब्राह्मणा, जाऊं नकोस, खरेच जाऊं नकोस !
केशबदास । त्राह्मणी, मिऊं नकोस. मुलांनो, मिऊं नका ! याच्या वार्णीत अविचार दिसत नाहीं.
घटोत्कच : ( स्वतःशी बोलल्यासारखे ) अहो, केवढी दुःखाची गोष्ट ! ह्या पृथ्वीवर सर्व ठिकाणी, सर्व काळी महान् ब्राह्मणांचा अत्यंत आद्र केला पाहिजे हे मला ठाऊक कां नाहीं ! परंतु आईची आज्ञा म्हणून हे अकाये आज मला निःदंकपणे करायला हवे !
केशवदास : ( बाजूस ) ब्राह्मणी, त्या पूजनीय जलाक्वेन कषीचे राब्द आठवतात ना ६ ते म्हणाले होते कीं, “या वनांत राक्षस आहेत, तेब्हां जरा सावधगिरीनेच प्रवास करा, ते हँ भय आपल्यासमोर आलें आहे !
ब्राह्मणी : आर्य, कशाचेंच कांहीं नाहीं असे बोलतां आहांत आपण !
४ भासाच्या एकांकिका
केशबदास : नशीब माझे ! काय करूं मी £ ब्राह्मणी : आपण आरडाओरडा केला तर?
मोठा : आई, आरडाओरडीने कोण येणार आपल्या मद- तीला ! हे निजन वन आहे. अंधाराच्या ढिगाऱ्याप्रमाणें भास- णाऱ्या पर्वतांच्या विविध रांगांनी येथ दशदिदश्ांमधील अंतर अवरुद्ध झालेलें आहे, वनमध्य पक्ष्यांनी आणि श्वापदांनीं गज- बजून गेलेला आहे. मनस्वी तापसांनाचच फार तर तेथे राहायला आवडेल,
केशवबदास : ( आठवून, धीराने ) ब्राह्मणी, आतां भ्यायन्ने कांहीं कारण उरल नाहीं, मनस्वी तापसाना राहायळा आवडेल असे हें वन आहे, हें ऐकून माझी भीति जणू नाहींशी झाली आहि. माझी कल्पना आहे कीं, पांडवांचा आश्रम येथून फार दूर नसला पाहिजे, आणि पांडव म्हणजे-त्यांना युद्धाचे प्रेमच आहे, दारण आलेल्यांना ममता दाखाषेणे हा त्यांचा स्वभाव आहे, दीनदुबळ्यांची कड ते नेहमीं घेतात, ते साहसी आहित.... आणि ( घटोत्कचाकडे दृष्टिपात करीत ) आकृति आणि कृति यांनीं भय उत्पन्न करणाऱ्या अद्षासारख्याचे योग्य पारिपत्य करण्याची राक्ति पण त्यांच्याजवळ भरपूर आहि,
मोठा : पण बाबा, पांडव सध्यां इथे नाहींत असं मला वाटते, केशवदास : तुला काय ठाऊक?
मोठा : वनांतून आलेल्या एका त्राह्मणाकडून मी ऐकले की दातकुंभ नांवाच्या यज्ञाचा सोहळा पाहण्यासाठी ते धोम्य महर्षींच्या आश्रमाकडे गेळे आहेत,
मध्यमग्यायाग ८
केशवबदास : अरेरे! घात झाला!
मोठा : पण बाबा, सगळे पांडव कांहीं गेळे नाहींत. आश्रमाचे रक्षण करण्यासाठीं मध्यम पांडवाला त्यांनीं इथेंच ठेवलें आहे.
केशवदास : ( सुटकेचा निःश्वास टाकून ) असे असेल तर सारे पांडव इथेच आहेत असें म्हणायलाहि हरकत नाहीं.
मोठा : पण सकाळचा व्यायाम घेण्यासाटीं तो ह्या वेळी इथून बराच दूर गेला आहे असे मी ऐकले,
केशबदास : अरेरे! पुन्हां निराशा ! ! ( किंचित् थांबून ) असो ! मुला, ह्याचीच विनवणी करून पाहातो.
मोठा : कशाला तसदी घेतां
केशवदास : मुला, विनवणीला निराशेची पर्वा नसते! पाहूं या तर खरे. ( घटोत्कचास ) अहो महावीर, आमच्या सटकेचा कांही आशा....!
घटोत्कच : सुटका एका अटीवर---
केशवदास : कोणती अट?
घटोत्कच : माझी परमपूज्य आई आहे. तिनें मला आज्ञा केली कीं, ' मुला, माझ्या उपवासाचे पारणे फेडण्यासाठी या बनांतून एखादा माणूस पकडून घेऊन ये ', असा शोध घेत असतांना तुम्ही माझ्या हाती पडलांत, आपली चारित्र्यबान् धर्मपत्मी आणि दोन मुलें यांच्यासकट स्वतःची सुटका व्हावी अशी तुझी इच्छा असेळ तर तुझी शाक्ति आणि माझी शाक्ति यांचा नीट विचार कर आणि एक मुलगा माझ्या ताब्यांत दे.
द भासाच्या एकांकिका
केशबदास ! ( उसळून ) राक्षसाधमा ! या ब्राह्मणाला तूं इतका नीच समजतोस : मी वृद्ध आहे, पण वेदाध्ययन केलेला ब्राह्मण आहे. शीलगुणसंपत्न पुत्राला तुझ्या नरभक्ष- काच्या हातीं देऊन मी कोणते सुख मिळविणार आहे
घटोत्कच : हे द्विजश्रेठ्ठा ! माझ्या सांगण्याप्रमागे एका पुत्राला सोडून द्यायला तूं तयार नसशीळ तर एका क्षणांत तुझ्यासकट सर्व कुटुंबाचा नाश झालाच म्हणून समज,
केशवदास : माझा निश्चय अढळ आहे. माझे हें शारीर म्हातारपणाने जजर झालें आहे, ह्या शरीराने होण्यासारखे सारें झालें आहे, माझ्या पुत्राचा प्राण वाचविण्यासाठी राक्षसरूपी अम्नींत, यज्ञाविधीने शुद्ध करून, त्याची आहुति द्यायला मी तयार आहे.
ब्राह्मणी : ( आवेगाने ) नाहीं आर्य, आपण असें कर्से करू शकाल ?£ पत्नीच्या निष्ठेची सांगता केवळ पतीविषयींचा धस पाळण्यानेंच होत असते ! माझ्या शरीराने आयोचे आणि कुलाचे रक्षण करण्याची माझी इच्छा आहे. ह्यांतच त्याचच साफल्य आहि.
घटोत्कच : ( मध्येंच ) बाई, माझ्या आईला स्त्री चालणार नाहीं,
केशवबदास : मी येतों तुमच्याबरोबर,
घटोत्कच : ( किंनित् रागाने ) तूं म्हातारा आहेस. ऱवेल हट !
सोठा : बाबा, बोलू का !
केशवबदास : बोल, लवकर बोल,
मध्यमव्यायांग' ७
मोठा :! माझे प्राण देऊन वडिलांचे प्राण वांचवावेत अशी माझी इच्छा आहे. आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तुम्ही मला सोडावे,
मधला : दादा, असे नादी ! ज्येष्ठ मुलगा हा कुलांत आणि जगांतहि श्रेष्ठ समजला जातो. आपल्या आईवडिलांना तो अत्यंत प्रिय असतो, तेब्दां माझे गुरुजनाविषयांचे कर्तव्य स्मरून मीच जाईन म्हणतो.
धाकटा : दादा, अण्णा ! असे कसं बोलतां तुम्ही ? मोठा भाऊ म्हणजे वडिलांसारस्त्रा असे ब्रह्मवादीच सांगतात. तेव्हां गुरुजनांचे प्राणरक्षण करायला मीच काय तो योग्य आहे.
मोठा : बाळ, तूं म्हणतोस ते खरें नाहीं. पिता संकटांत सांपडला असतां ज्येष्ठ पुत्राने त्याला तारळें पाहिजे. तेव्हां आई- वडिलांचे प्राण वांचविण्यासाठीं मलाच गेलें पाहिजे.
केशवबदास : मोठा मुलगा म्हणजे प्राणांचा ठेवा. त्याला करस सोडूं मी १
ब्राह्मणी : आयांना मोठा हवा आहे, तसा मला धाकटा हवा आहे.
मधला : ( अधबट स्वतांशीं ) मी आईला नको आहे, बाबांना नको आहे ! मी कोणाला हवा आहे १
घटोत्कच : ( मध्येच ) मला चालेल ! ( मधल्यास ) चल लवकर माझ्याबरोबर,
मधला : स्वतःचे प्राण देऊन मी गुरुजनांचे प्राण बांच- विले-धन्य झालो मी ! थोर लोकांच्या ठायीं एक वेळ बंधुप्रेम
ट भासाच्या एकाँकिका
आढळेल, पण स्वतःच्या हरीराची आसक्ति कधीच दिसून येणार नाहीं !
घटोत्कच : ( कोतुकाने ) आपल्या आतप्तांविषयीं केवढा
जिव्हाळा या ब्राह्मणपुत्राला आहे ! त
मधला : ( केशवदासाजवळ जाऊन ) बात्रा, नमस्कार करतो.
केशबदास : ( गहिवरून ) ग्रे, आमच्यावर अलोट प्रेम करणाऱ्या मुला, ये ! स्वतःच्या प्राणांचा बदला देऊन तूं आपल्या माता-पित्यांचे प्राण वांचविळेंस तर अपवित्र आत्म्यांना कधींहि न मिळणाऱ्या त्या त्रह्मलाकाची तुला प्राप्ति होवो !
मधला : धन्य झालो ! ( आईकडे वळून ) आई, नमस्कार,
ब्राह्मणी : ( रुद्ध कंठाने ) बाळ, चिरंजीव हो,
मधला : तुझा कृपा ! ( मोठ्या भावास ) दादा. नमस्कार.
मोठा : ( मिठी मारून, साश्र स्वराने ) ये, ग्रे, मला घट्ट मिठी मार ! पवित्र गुणांनी तुला मिठी दिली आहे. तुझी कीर्ति सर्व परथ्वीला मिठी घालील !
मधला : मेहेरबानी !
धाकटा : अण्णा, मी नमस्कार करतो.
मधला : कल्याण असो !
धाकटा : अश्याच कृपा असूं दे.
मधला :£ ( घटोत्कचास ) अहो महाराज ! मी कांही विचारू का! |
घटोत्कच ! विचार, लवकर विचार,
मध्यमव्यायोग ९
मधला ः या वनाच्या मध्ये जलादाय आहे असे वाटतें, मी परलोकाच्या प्रवासाला निघालो आहे. तर तेथें तहान भागवीन म्हणतो,
घटोत्कच : हदढनिश्वयी मुला, जा. मात्र माझ्या आईची न्याहारीची वळ होऊन गेली आहे, तेव्हां लवकर परत ये.
मधला : बाबा, जातां मी, ( जातो. )
केशबदास : ( शोकावेगाने ) अरेरे ! आम्हांला टले, सर्वेस्वी लुटले ! माझ्या वंदरूपी पर्वताला तीन शिखरं होतीं आणि त्यांनीं तो सुंदर दिसत होता, परंतु आतां मधले शिखर कोसळून पडल्याने माझ्या मनाला वेदना होत आहित ! ( ओरडून ) बाळा ! ( पाहून ) गेलानच्च का हा ! माझ्या तरुण मुला |! तारुण्याला शोभेल अक्षी तुझी कांति होती,... बुद्धीला शिस्त होती आणि वेदाध्ययनानच्ची आसक्ति होती.... अरेरे ! फुलांनी बहरलेळें झाड हत्तीच्या सुळ्यांनं मोडून पडावें तसा तूं आतां नाद पावशील ना!
घटोत्कच : ( चुळबुळत ) ह्या ब्राह्मणबटूला उश्यीर होतो आहे. आईच्या न्याहारीची वेळ निघून चालली आहे. काय बरें करूं ? हां.... ठीक. ( केशवदासाकडे पाहून ) ए ब्राह्मणा तुझ्या मुलाला हाक मार,
केशवदास : ( उसळून ) तुझे रशाब्द राक्षसाच्या सुद्ध तोंडीं शोभणार नाहींत !
घटोत्कच : ( स्वतांशीं ) रागावला वाटते? (उघड ) क्षमा करा महाराज, क्षमा करा, हा माझ्या प्रकतीचाच दोष
१० भासाच्या एकांकिका
आहे. ( दक्य तितक्या सोम्यपणे ) बरे, आतां असे सांगा: आपल्या मुलाचे नांब काय ९ केशबदासं : तं सुद्धां तुला ऐकविणे हक्य नाहीं. घटोत्कच : बरोबर आहे, ( मुलाकडे वळून ) ब्राह्मणकुमारा, तुझ्या भावानचे नांब काय बरे ६
मोठा : ( अर्धवट स्वतांशीं ) गरीब बिचारा मधला--- मध्यम !
घटोत्कच : ( एकून ) मधला १ मध्यम १ योग्य नांव आहे ! मीच हांका मारता, ए मध्यमा, मध्यमा ! लवकर ये !
| रंगभूमीच्या एका कोपऱ्याला, अगदीं मार्गे, वनमध्यांत भीमाची आकृति दिसते, ]
भीम : ( स्वतांीं ) हा कोणाऱचा बर॑ आवाज १ वृक्षांनी दाटलेल्या घनगर्द अश्या या वनांत शेकडा पक्ष्यांच्या गज- बजाटाच्या वर हा तारस्वर उमटत आहे! ह्या ख्वरांने माझ्या मनाला ताप चढत आहे, अजुनाच्या किती सारखा आहे हा स्वर !
- घटोत्कच : ह्या त्राह्मणबटूला उद्यीर होतो आहे. आईच्या न्याहारीची वेळ निघून चालली आहे, काय बरें करूं ! हां.... समजलें, मोठ्यांन हांका मारतो, ( मोठ्यांन ) ए मध्यम ! लवकर ये,
भीम : अरे, या वनाच्यामध्ये माझ्या व्यायामांत अडथळा उत्पन्न करून कोण बरें मला ' मध्यम ' म्हणून बोलावत आहे १ जाऊन पाहूं या तर खरे, ( पुढें येतो. घटोत्कचाकडे पाहून
मध्यमव्यायोग ११
विस्मयांनं, स्वतांशीं ) अहाहा ! किती आकषक आहे हा तरुण ! सिंहासारखं मुख, सिंहासारखे दांत, मद्यासारखे डोळे, स्निग्ध आणि गंभार आवाज पिंगट भुवया, ससाण्यासारखे नाक, गजेद्रा- सारखी हनुवटी, विस्कटलेले चमकदार केस, रुंद छाती, वज्रा- सारखी भक्कम कमर, गजश्रेष्ठासारखी चालण्याची ऐट, लांब बाहू, पुट खांदे....हें सारे पाहून निश्चित वाटते कीं हा एखाद्या लोकवीराचा राक्षसी स्त्रापासून झालेला अत्यत बलशाली पुत्र असला पाहिजे !
घटोत्कच : ह्या ब्राह्मणकुमाराला पुर उद्यीर झाला आहे, मोठ्याने हांक मारली पाहिजे, ( ओरडून ) ओ ५५ मध्यमा ! लवकर ये.
भीम : ( समोर येत ) आलो आहि काँ!
घटोत्कच : ( पाहून ) हा कांही ब्राह्मणाचा मुलगा नाहीं ( स्वतःशी ) अहाहा ! किती देखणा आहे हा पुरुष ! ह्याची आकृति सिंहासारखी आहे. सोन्याच्या तालवृक्षासारखे याने बाहू आहेत. कमर बारीक आहे. शारीराच्या दोन्ही बाजू गरुडाच्या पंखासारख्या मूदु आहेत. विकसित कमलाच्या पाकळ्याप्रमाणे याचे डोळे आहेत. हा विष्णूच असावा! एसत्रादा जवळचा आप्त याबा त्याप्रमाणे हा माझी दृष्टि वेधून घेत आहे, (उघड) ए, मी मध्यमाला हांका भारता आहे.
भीम : म्हणून तर मी आलों. घटोत्कच : काय ! तुमचेंहि नांब ' मध्यम ' आहे (
१२ भासाच्या एकांकिका
भीम : अथात् ! ज्यांचा कोणाहि बध करूं दहाकणार नाहीं अशांच्यांतला मी मध्यम आहे. जे गर्वशाली आहेत त्यांच्यातला मी मध्यम आहे. या परथ्वोवरील मी मध्यम आहे. भल्या माणसा ! भावांच्या मध्ये देखील मी मध्यमच आहे !
घटोत्कच : असाल !
भीम । आणखी असें पाहा ! पंच्च महाभतांतळा मी मध्यम आहे. पार्थिवांच्यात मी मध्यम' आहे या जगांत भयाच्या बाबतींत मी मध्यम आहे. आणि सर्व कायीमध्यें मी मध्यम आहे !
केशवदास : ( स्वृतःशीं ) आपण ' मध्यम ' असल्याचे हा सांगतो म्हणज हा नक्की पांडबांच्यांतला मधला असला पाहिजे, मृत्यूच्या अरेरावीपासून आमची सुटका करण्यासाठीं हा येथे येऊन उभा राहिला आहे अस वाटते,
[ मधला पुत्र प्रवेश करतो. ]
मधला : ( स्वतःशी ) कमलांनीं भरलेल्या जलाठायांत आचमन करून, कमलाच्या पाकळ्यांनी उज्ज्वळ झालेल्या पाण्याची तिलांजळि मीं आपल्या हातानें स्वतःला दिली! परलोकांत गेल्यावर मळा कोण पाणी देणार £ ( पुढें येऊन घटोत्कचाच्या जवळ जात ) अहो महाराज ! मी आलो आहे.
घटोत्कच : ( पाहून ) हां....तू खरा मध्यम ! मध्यमा, चल माझ्या मागून,
केशबदास : ( आवेगाने भीमाजवळ जाऊन ) मध्यमा ! ह्या त्राझणकुलाला वांचचव !
१ श्रष्ठ, सुख्य, अग्रगण्य. २ मध्यबिदुसारखा. ३ प्राणभूत, ७ बेद्रकार, ५ मधला मार्ग स्वीकारणारा, समतोल वृत्तीचा.
मध्यमध्या योग १२
भीम : मिऊं नका, मिऊं नका! मी मध्यम आपल्याला अभिवादन करतो,
केशबदास : वायूसारखा दीर्घायु हो ! भीम : आपला अनुग्रह! महाराज;,आपल्या भीतीचे कारण!
केशबदास : ऐक. मी ब्राह्मण आहे, माझें नांव केशवदास, माझे गोत्र माठर, मी कल्पश्वाखेचा अध्वर्य आहे, मी यूप नांवाच्या गांबी राहता. हँ गांब कुरुराज युधिष्ठिराच्या एके- काळीं आधिपत्याखालीं असलेल्या कुरुजाडूगल प्रदेशांत आहे उत्तर दिशेला उद्यामक नांवाच्या गांबीं माझे मामा कौशिकगोत्री यजञबंधु म्हणून असतात. त्यांच्या मुलांचे उपनयन आहि. त्यासाठीं मी सहकुटुंब निघाला होतो--
भीम : आपला प्रवास निर्विघ्न होवो | बरे, मग काय झाले !
केशवदास ! तर तेवढ्यांत हा- नील मेघांप्रमाणे शरीर असलेला, कमलाच्या पाकळ्यांप्रमाणे रंद डोळ्यांचा, सिंहाच्या गतीची ऐट मिरबिणारा आणि भयानक दांत असलेला राक्षस- जगांत कश्याचीहि भयभीति न बाळगतां, तुमच्यासारख्यांच्या देखत, मला माझ्या बरायकोमुलांसकट मारून टाकण्याच्या इरा- द्याने अंगावर धावून आला आहे !
भोम : अस्स ! याने ब्राह्मणाच्या मागोत संकट उत्पन केलें आहे काय ! ठीक, याला आवरलेंच पाहिजे. ( घटोत्कचास ) ए प्राण्या ! थांब, उभा राहा,
घटोत्कच : ( तुच्छतेने ) उभाच आहि काँ! भीम : त्राह्मणांना कां त्रास देत आहेस तूं * हा वृद्ध ब्राह्मण
१४ भासाच्या एकांकिका
चंद्रासारखा आहि. त्याची मुळें नक्षत्रांसारखीं त्याच्याभोवती आहेत. त्याची पत्नी सौम्य चांदण्यासारखी आहे. तूं मात्र राहू- सारखा उपटला आहेस !
घटोत्कच : हो, हो ! राहूच !
भीम : काय ( किंचित् थांबून, अजूनहि शांतपणे ) हा श्रेष्ठ ब्राह्मण लोकिक व्यबहारापासून निवृत्त झालेला आहे. त्याचे अपराध कांहीहि असले तरी त्याचा प्राण घेणे अनुन्वित आहे. पत्नी आणि मुलें यांच्यासकट सोडून दे त्याला !
घटोत्कच : नाहीं सोडणार !
भीम : ( स्वतःशी ) अरे, हा कोणाऱचा पुत्र असावा बेर ! माझ्या सव भावांचे गुण चोरून घेणारा हा कोण ? या मुलाची ही गर्वोद्धत वृत्ति पाहून मला तर अमिमन्यूचची आठवण येते आहे ! ( उघड ) हे पाहा प्राण्या ! सोडून दे त्यांना,
घटोत्कच : ( ठांसून ) नाहीं सोडणार ! ' सोडून दे ' म्हणून खुद्द माझ्या पित्याने जरी मला दरडावून सांगितलें तरी मी सोडणार नाहीं. कारण मी ह्याला माझ्या आईच्या आज्ञेने पकडले आहे.
भीम : ( स्वतःशी ) काय म्हणाला हा आईची आज्ञा ६ बिचारा मोठा आज्ञाधारक दिसतो आहे ! आई म्हणजे केवळ मनुष्यार्चेंच नव्हे तर देवांचैहि देवत होय ! आईची आज्ञा पाळायची म्हणून तर आमची ही दद्या झाली! (उघड) ए प्राण्या, तुला एक प्रश्न विचारायचा आहे.
घटोत्कच £ बोल, लवकर बोल,
मध्यमव्यायोग १५
भीम : तुह्या आईचे नांब काय १
घटोत्कच : ऐक. कोरवबकुलाचा दीप जो महान् पांडब तो पति लाभल्यामुळें जिचे भाग्य, पूर्णचंद्रान आकार उजळावें तरस, उजळले आहे. ती हिडिंबा नांवाची राक्षसी ---
भीम : ( अत्यानंदाने, स्वतःशी ) अस्से ! हा हिडिंबेचा मुलगा काय ? मग याचा गर्व अगदीं योग्य आहे ! ( विचार करीत ) यानचे रूप, वैय, शाक्ति या सर्व गोष्टी पांडवांशीं जुळण्यासारख्या आहेत, पण भूतमाताच्या बाबतींत दयेला पारखे झालेळें याचे मन कोणासारखं आहे १ ( उघड ) हे पाहा प्राण्या, सोडून दे ह्यांना !
घटोत्कच : नाहीं सोडीत !
भीम : त्राह्षणमहाशय, आपल्या मुळाला घेऊन चला, मी जातो याच्याबरोबर,
मधला: वा ! वा! असे कसे कराल ! गरुजनांच्या प्राणांच्या अपक्षने माझे प्राण मी देऊन बसला आहे. तुम्ही तरुण आहांत, रूपवान् आहांत, गुणवान आहांत ! तुम्हा या पृथ्वातलावर राहणेच योग्य,
भीम : ( मधल्यास ) उदार मुला, तुझे बोलणें बरोबर नाहीं. माझा जन्म क्षज्ियकुलांत झाला आहे, ब्राह्मणजाति ही अत्यंत आदराला पात्र आहे. म्हणून माझं शरीर देऊन ब्राह्मणाचे शरीर वांचविण्याची माझी इच्छा आहे,
घटोत्कच : ( स्वतःशी ) अस्सं, हा क्षत्रिय आहे काय? म्हणूनच एवढा गर्व करतो आहे, ठीक,... यालाच मारून घेऊन जातो मी! ( उघड) या ब्राझःणाच्या आड कोण येतें आहे,पाहूं !
१६ भासाच्या एकांकिका
भीम : मी---
घटोत्कच : काय, तुम्ही !
भीम ! हो.
घटोत्कच : मग तुम्हाच चला माझ्याबरोबर्,
भौम ! मी शक्तीने आणि पराक्रमाने श्रेष्ठ आहे ! मी असा येणार नाहीं, ताकद असली तर बळजबरीने घेऊन जा मला,
घटोत्कच £ मी कोण आहे हें माहीत आहे कां तुम्हांला !
भीम : माहीत आहे.... माझा मुलगा !
घटोत्कच : ( उसळून ) कसं, करस म्हणतां मळा आपला मुलगा म्हणून :
भीम : ( स्वतःशीं ) अरे, खवळला वाटतें! (उघड ) क्षमा करा ! सर्व प्रजाजनांना क्षत्रिय ' पुत्र ) म्हणून संबोधतात. म्हणून मी तुला पुत्र म्हटले,
घटोत्कच : आणि भ्याडाचे हत्यार उचलठेत !
भीम ! मी रापथेवर सत्य तेचच सांगता भय ही काय चीज आहे हें मला ठाऊक नाहीं. तुझ्यापासून ती जाणून ब्यावी अक्षी मात्र इच्छा आहे, भल्या माणसा ! हें भय कसे असते ते सांग, म्हणज त्याचे गुणदोष समजावून घेऊन मला वागायला बरें पडेल,
घटोत्कच : भय म्हणज काय ते शिकवतोंच तुम्हांला, ध्या दास्त्र--
भीम : शास्त्र? घेतलें आहे कीं!
घटोत्कच : (.विस्मयानें ) म्हणजे काय :
श्र मध्यमव्यायाग १७
भीम : शत्रूंना दडपण्यांत आनंद मानणारा, सोन्याच्या खांबा- सारखा दिसणारा हा माझा उजवा बाहु हॅंच माझें स्वाभाविक दास्त्र!
घटोत्कच : हें बोलणे माझे पिताजी भीम यांनाच शोभ- ण्यासारखे आहे !
भीम : हा कोण बुवा भीम १ ( खोट्या उपहासाने ) विश्व- कतो ब्रह्मा, शिव, विष्णु, कृष्ण, इंद्र, शक्तिशाली कार्तिकेय, य॒म.... यांच्यापैकी कोणासारखा तुझा पिता आहे तै सांग तरी, भल्या माणसा !
घटोत्कच : सवोच्या सारखा. भीम : हट् ! खोटी गोष्ट !
घटोत्कच : (रागाने उसळून ) खोटं म्हणून म्हणतो काय १ माझ्या वडिलांचा अधिक्षेप करतोस बरें आहे, हा मोठा वृक्ष उपटून हाणतो, ( वृक्ष उपटून फेकतो. ) काय £ यानं हा मरत नाहीं ! काय करू बरें? हां....असेंच ! या पर्वताचे शिखर उखडून प्रहार करता ! ( पर्वेतरिखर उपटून कफेकण्याच्या पवित्र्यांत ) मी फेकलेलें हे पर्वेतशिखर तुझे प्राण घेऊनच खालीं पडेल---
भीम : ( हंसत ) जंगली हत्ती चवताळला तरी कांहीं वाघा- वर मात करूं दकत नाहीं !
घटोत्कच : ( पर्वेतशिखराचचा प्रहार करून, स्वतःशीं, विस्म- याने ) काय ! याने पण हा मरत नाहीं ! काय करूं बरें ! ठीक, समजलें, ( उघड ) मी भीमसेनांचा मुलगा आणि वायूचा नातू
२]
१८ भासाच्या एकांकिका
आहे ! राहा आतां तयारीत. बाहुयुद्धांत माझी कोणी बरोबरी करूं शकत नाहीं, [ दोघे बाहुयुद्ध करतात. |]
घटोत्कच : ( भीमसेनाला पेंचांत पकडून ) बळकट पाशांनीं हत्तीला पकडावें त्से माझ्या बाहूंनीं मी तुला बांधून ठेवलें आहे. माझ्या बाहूंची ताकद झुगारून तूं आतां कसा सुटतोस तेच पाहूं!
भीम : ( स्वतःशीं ) खरेच यानें मळा बांधून टाकलें आहे ! ( आनंदाने ) सुसोधना ! तुझा दात्रपक्ष फोफावतो आहे! सांभाळून राहा ! ( उघड ) ए प्राण्या, नीट अवधान ठेब,
घटोत्कच : आहे माझं अबधान.
भीम : (पेंच सोडवून ) आपल्या ताकदीचा गवे सोडून दे, तुझें पाणी जोखलें मी, वीरा ! बाहुयुद्धांत मला कर्धींच थकवा याय'चा नाहीं.
घटोत्कच : ( स्वतःशी ) अरे, यान सुद्धां हा मरत नाहीं! काय बरें करू ! हां....समजलें, आईच्या कृपेने मला मायापाश लाभला आहे, त्यांने बांधून याळा घेऊन जावे. पाणी कुठें मिळेल बरें £ ( विच्चार करून ) अरे पर्वता, पाणी हवे आहे! ,...छाबरास ! लागला झरायला ! ( आचमन करून, मंत्र जपून, उघड ) मायापाशाने मी तुला बांधलें आहे. आतां असहायपणे माझ्या मागून येशील, ( मायापाशांनीं भीमाला बांधून टाकतो. ) उत्सवाच्या प्रसंगीं दोऱ्यांनीं बांघठेला इंद्र्बज जसा शोभतो तसा शोभतो आहेस | ( हंसतो, )
भीम : ( स्वतःशी ) अरे, खरेच मायापाशांनीं मला बांधून टाकलें आहे ! काय बरें करावे : हं....असेच ! मायापाश सोड-
मध्यमव्यायोग १९
विण्याचा मंत्र मला होकराच्या कृपेने मिळाला आहे. त्याचा जप करतो. पण पाणी कूठून मिळणार ! (उघड) अरे ब्राह्मणकुमारा, कमण्डळूंतळें पाणी जरा आण बोरे,
केशवदास : ( पुढें होऊन ) हें पाणी,
[ भीम पाणी घेतो; आचमन करून मंत्र जपतो आणि माया नाहींशी करतो. ]
घटोत्कच : (पाहून, स्वतःशीं ) अर, पाह सुटला ! आतां काय करावें £ ठीक....असेंच केळें पाहिजे, ( उघड ) हे पुरुषा ! पूर्वीच्या वचनाची आठवण ठेव,
भीम : वचन हं....आठवलें. हो पुढे,
[ घटोत्कच पुढें आणि भीम मार्गे असे हिडिंबेच्या निवासा- कडे जाऊं लागतात, ]
केशबदास : मुलांनो, आतां आपण काय करायचे £ भीम तर चालला ---दाहक आणि उग्र रूप असलेल्या, बाहूबळ आणि पराक्रम या उप्र गुणांनीं युक्त असलेल्या ह्या राक्षसावर मात करून हा भीम; एखादा मस्त बेळ पावसाचा मारा झटक्याने चुकवून जसा जाईल तसा डोलानें आणि सावकाश चालला आहे. [ भीम आणि घटोत्कच हिडिंबेच्या निवासाच्या दाराजवळ येतात. ]
घटोत्कच : उभा राहा इथं. तूं आल्याची बातमी मी आईला सांगतो.
भीम : ठीक आहे. जा.
[ घटोल्कच आंत जाऊन लगेच हिडिंबेबरोबर परत येतो. भीम जरा मागल्या बाजूस उभा आहे. केशवदास वगेरे रंग- भूमीच्या अगदीं मार्गे आहेत. ]
२० भासाच्या एकांकिका
घटोत्कच १ (वांकून ) आई, नमस्कार करतों. तुला भोजना- साठीं मनुष्य हवा होता ना कधीपासून ? तो आणला आहे.
हिडिंबा : बाळ, चिरंजीव हो.
कळ जीडी
घटोत्कच : तुझा कृपा
हिर्डिबा : बाळ, कक्षा प्रकारचा मनुष्य आणला आहेस!
घटोत्कच : आई, केवळ आकारानं माणूस आहे; पराक्रम पाहिला तर मात्र नाहीं!
हिडिंबा : ब्राह्मण आहे?
घटोत्कच : ब्राह्मण नाही.
हिडिंबा : मग म्हातारा !
घटोत्कच : म्हाताराहि नाहीं.
हिडिंबा : मग बाळ आहे!
घटोत्कच : छे!
हिडिंबा : असे असेल तर मला पाहिलेंच पाहिजे,
[ दो9हि पुढे सरून वळून पाहातात. भीम किंचित् पुढे येतो, ]
हिरडिंबा : ( भीमाला पाहून, घटोत्कचाकडे पाहात ) काय, ह्य मनुष्य आणलास १
घटोत्कच £ (न उमजल्यामुळें, बुचचकळ्यांत पडून ) कोण आहे हा, आई :
हिडिंबा : ( हंसत ) माथेफिरू पोरा! हें तर आपलें देवत!
घटोत्कच : ऐ.! कोणाचे देवत!
हिडिंबा : तुझे आणि माझे
मध्यमव्यायोग २९
घटोत्कच : ( अविश्वासाने ) कशावरून !
हिडिंबा : (हंसून ) याच्यावरून ! ( भीमाजबळ जाऊन, बंदन करीत ) महाराजांचा विजय असो !
भीम : (पाहून ) ही कोण बरें : ( ओळख पटून, आनंदान ) अरे, ही तर माझी पत्नी हिडिंबा ! ( तिच्याकडे वळून ) देवी, आमचे राज्य नष्ट होऊन आम्ही गहन अरण्यांत भटकत असतांना तूं सहानुभूति दाखविळीस आणि आमचें दुःख नाहीसे केलेस ! ( किंचित् थांबून ) पण हिडिंबे, या प्रकाराचा अर्थ काय ९
हिडिंबा : (कानांत सांगत ) महाराज !....हा याचा अर्थ,
भीम ! ( हंसून ) जन्मानं राक्षसी आहस....तुझी वागणूक मात्र तशी नाहीं,
हिडिंबा : (आनंदांत) ए माथेफिरू ! आपल्या वडिलांना नमस्कार कर,
घटोत्कच : बाबा ! अज्ञानामुळे मी तुम्हांला अगोदर वंदन केलें नाहीं. आपल्या पुत्वांचा हा अपराध पोटांत घ्याल अश्शी आज्या आहे, ( त्याच्या पायांशी वांकून ) कोरवबनाला दावामी- प्रमाणे असणारा हा घटोत्कच वंदन करीत आहे, पुत्राच्या हूड- पणाऱची क्षमा असावी.
भीम : ( आनंदानं ) ये, ये पुत्रा! तुझ्या अपराधाची क्षमा यापूर्वीच केली आहे. ( आडेंगन देऊन ) हा कौरववनाचा दावाभ्ि ! पित्याच्या हृदयाला पुत्राची ओढ असणारच ! मुला, शक्तीने. आणि पराक्रमाने सवांवर मात कर !
घटोत्कच ! तुमचा आशीर्वाद ! [ केशवदास ब त्याचे कुटुंब पुढे येतात. ]
२२ भासाच्या एकांकिका
केशवदास : अस्से ! हा भीमसेनांचा पुत्र घटोत्कच काय ! भीम : मुला, ह्या माननीय केशवदासांना नमस्कार कर, घटोत्कच : महाराज, नमस्कार करतो. केशवदास ! गुणांनी आणि कीतीनिं आपल्या पित्यासारखा हो, घटोत्कच : आपली कृपा! केशबदास : ( आनंदाने ) दृकोदरा ! आमच्या कुलाचे रक्षण झालें, स्वकुलाचा मान चढला ! जातो आम्ही आतां. भीम : ( विनयपूवैक ) आपल्या आदीर्वांदानेंच या सर्व गोष्टींचा शोवट शुभ झाला. आमचा आश्रम इथून फार दूर नाही, तेथ विश्रांति ध्यावी आणि मग निघावे, केशबदास : आमचा जीव वांचाविलास यांत सगळा पाहुण- ऱचार झाला, आम्ही आतां निघावे हेंच ठीक, भीम : निघतां £ तर सहकुडुंब पुन्हां आपलें दशन न्हार्वे अशी विनंति आहे. केशवबदास : हां....हे ठीक आहे. : पत्नी व तिन्ही मुलें यांच्यासह केशवदास जाऊं लागतो, ] भीम ! हिडिंबे, इकडे ये. बाळ घटोत्कचा, इकडे ये. पूज्य केशवदासांना आश्रमाच्या दारापर्यंत तरी पोचवू या, [ सर्व जातात. ]
श॑. शे जर
दूतवाक्य पात्रे
( प्रवेशानुक्रमानं ) कांचुकीय दुर्योधन बासुदेव सुदर्शन 'वृतराष्ट्र [ दुर्योधनाचे सेवक मंत्रशालेचची रचना करण्यांत आणि सभेची सिद्धता करण्यांत गुंतलेले आहेत. सभासदांची भासनें मांडून झालीं आहेत. एवढ्यांत दुर्याघनाचा कांचुकीय प्रवेश करतो. ]
२४ मासाच्या एकांकिका
कांचुकीय : अहो द्वाररक्षकहो ! महाराज दुर्योधनांची आज्ञा आहे. त्यांना आज सवे राजवर्गा्शी मंत्रणा करावयाची आहे, तेव्हां सर्व राजांना बोळावून आणा, ( वळून पाहात ) अर, हे महाराज दुर्याोंधन इकडेच येत आहेत; इयामल वर्णाचे, तरुण, आुभ्र रेशमाचे उत्तरीय घेतलेले, छत्र आणि मनोहर -वामर बरोबर असलेळे आणि राजलक्ष्मीने युक्त; अंगराग लाविळलेला आहे; खास अलकाराच्या, रत्नांच्या प्रभेने अंगावर रंगच्छटा पसरली आहे; नक्षत्रांमध्ये पूर्णचन्द्र तसे हे शोभत आहित !
[ निदॅरा केल्याप्रमाणे दुर्योधन प्रवेश करतो, ]
दुर्योधन : चाळून आलेल्या या रणोत्सवाचा विचार एकदम मनांत आला म्हणजे रोष गळून माझं हृदय हर्षाने भरून येते ! माझी इच्छा आढे काँ, पांडअसभेंतीळ मदोन्मत्त हत्तीच्या तोंडांतून त्यांचे मुसळासारखे दांत उपट्टून टाकावेत !
कांचुकीय : महाराजांचा जय असो ! महाराजांच्या आरि- प्रमाणे सर्ब राजमंडळाला पाचारण केलें आहे.
दुर्योधन : छान केलेस, जा आतां अंतःपुरांत,
कांचुकीय : जशी महाराजांची आज्ञा, ( जातो, )
दुर्योधन $ ( वळून ) वैकणे, वर्षदेव ! बोला- अकरा अक्षोहिणींचा माझ्या सैन्याचा व्याप आहे, या सेन्याचा सेनापति कोणाला करावें ? काय म्हणालांत तुम्ही ? “ हा गंभीर प्रश्न आहे, सल्लामसलत करून बोलणेंच योग्य होईल.,' बरोबर आहे. तर मंत्रशाठेकडेच जाऊं या.
[ सर्वजण मंत्रशाळेजवळ येतात, ]
दूतवाकय २५
दुर्योधन : ( स्वागत करीत ) आचार्य, अभिवादन करतो. यावें मंतशालेंत. पितामह, अभिवादन करतो, आपणहि मंत्र- शाठंत यावे, मामा, अभिवादन, तुम्हीहि या ना मंत्रशाळेत ! वेकर्ण, वर्षदेव ! तुम्हीहि दोथरे चला आंत, अहो सर्व क्षजियहो ! मोकळ्या मनाने आंत या, मित्रा कर्णा, आपणहि चलूं या.
[ सर्वजण मंत्रशाठेंत प्रवेश करतात, ]
आचार्य, हे कूर्मासन, बसावे. पितामह, हे सिंहासन, बसावे. मामा, हें चर्मासन, बसा, वैकरण, वर्षदेव, तुम्हीहि बसा कीं. अहो, सर्व क्षत्रिययो ! आपण मोकळ्या मनाने आसनस्थ व्हा. काय, काय म्हणतां ! “ महाराज अजून बसले नाहींत--- ( हंसून ) सेवाधर्म पडला ना! बरं, बरं....हा मी बसतो. मित्रा कर्णा तूंहि बैस ना, ( बसून ) वैकण, वर्षेदेव ! आतां बोला ! माझी अकरा अक्षोहिणींची प्रचंड सेना आहे. तिनचा सेनापति ब्हायळा कोण योग्य आहे काय म्हणतां तुम्ही ! : हे गांधारराज सांगतील ? £ हरकत नाहीं, मामांना सांगूं देत. काय म्हणाळांत मामा £ ' हे सन्मान्य गांगेय येथे असतांना सेनापति व्हायला दुसरा कोण लायक असणार ' योग्य बोललांत, मामा ! छान, छान ! पितामहचच सनापति होऊं देत. आमऱ्ची पण हीच उत्कट इच्छा आहि, प्रचंड वाऱ्याने सोपकून काढलेल्या महासागराच्या गर्जनप्रमाणे सेन्यांचा गजबजणारा आवाज, दुंदु्भींचा ध्वनि आणि शंखनाद दुमदुमत असतांना, एकीकडे गांगेयांच्या मस्तकावर अभिबकाच्या जलघारा पडूं देत---आणि त्याच वेळी दुसरीकडे शत्रराजांची हृदर्ये पड खाऊं देत !
[ कांचुकीय येतो. ]
२८ मासाच्या एकांकिका
कांचुकीय : महाराजांचा जय असो ! पांडवांच्या शिबिरा- हून हे पुरुषोत्तम नारायण दूतसंदेरा धऊन आले आहेत,
दुर्योधन : पुन्हां बोळ पाहूं, बादरायणा ! काय! तो कंसाचा याकर दामोदर तुझा पुरुषोत्तम काय £ तो गवळ्याचा पोर तुझा पुरुषोत्तम काय ? बाहद्रथाने राज्याच्या आणि कीर्तीच्या रूपानें ज्याचा राजभोग हिरावून नेला तो तुझा पुरुषोत्तम : अरे ! सम्नाटाच्या सानिध्यांत वावरणाऱ्या सवकाला रीतिरिवाज कळू नयेत म्हणजे काय ! किती उद्धटपणानची ह्याची ही भाषा ! जा, काळें कर तोंड !
कांचुकीय ! क्षमा, महाराज ! मी गोंधळलो....अन् त्यामुळे उपचार विसरलो. ( दुर्योधनाच्या पायांशीं वांकतो. )
दुर्योधन : ' गोंधळलो ' म्हणालास ! हं........ सासान्य माणसांचा गोंधळ होतो खरा! ऊठ, ऊठ.
कांचुकीय : कृपा झाली.
दुर्योधन : आतां मी शांत झालो. सांग, हा कोण दूत आला आहे |
कांचुकीय : केशव वूत म्हणून आला आहे.
दुर्योधन : केशव ना! अशी इच्छा ठेवावी....हीच रीत योग्य होय ! अहो राजेहो ! दूताची भूमिका घेऊन आलेल्या केशवाच्या बाबतींत काय करणें उच्िति होईल £ काय म्हणतां तुम्ही ! : अर्ध्यप्रदान करून केराबाची पूजा करावी !! मला नाहीं पसंत ! आज त्याला पकडण्यांतच हित आहे, असें माझे मत आहे. द्दा वासुभद्र बंदिवासांत पडला तर डोळे गेल्यासारखे पांडव होतील !
दूतवाकय २७
आणि मग पांडवांची गति आणि मति नाहींशी झाली म्हणजे प्रतिस्पंधोविरहित ही सारी पृथ्वी पण माझी होईल !....सांगून ठेवतो! जो कोणी आतां उभा राहून केशवाचें स्वागत करील त्याला माझ्याकडून बारा सुवर्ण दंड होईल ! तेव्हां, डोकें नीट ठिकाणीं ठेवून असा !....( स्वतःशीं बोलत ) मला उत्थापन द्यायला लागू नये म्हणून काय युक्ति करावी बरें ५: शाबास, सापडला उपाय! ( कांचुकीयाकडे वळून ) बादरायण, तो आपला चित्रपट घेऊन ये बरं ! अरे, ज्यावर द्रौपदीचे केस आणि वस्त्र खेन्वण्यान्चा प्रसंग चित्रित केला आहे तो ! ( तोंड वळवून, गुपित बोलल्याप्रमाणे ) त्याच्यावर दृष्टि खिळवून राहतो म्हणजे केशव आल्यावर उठण्याची वेळच येणार नाहीं मला !
कांचुकीय ! जशी महाराजांची आज्ञा,
[ जाऊन चित्रपट धेऊन येतो, ] दु्यीधन : पसर माझ्यासमोर. कांचुकीय : आज्ञा, महाराज ! [ चित्रपटाची गुंडाळी उलगडून चित्रपट पसरतो, ]
दुर्योधन : (पाहात ) वाः ! सुंदर आहे. चित्रपट! हँ पाहा, दुःशासनाने द्रोपदींचे विपुल केस पकडले आहेत.... आणि ही द्रौपदी दुःशासनाच्या तावडींत सांपडल्यावर भीतीने गौघळून हिचे डोळे विस्फारले आहेत.... राहूच्या जबड्यांत सांपडलेल्या चंद्रलेखेप्रमाणे दिसते आहे ही !
हा दुष्ट भीम--- सर्व राजांच्या समक्ष द्रोपदींचा अपमान झाल्याचे पाहून त्याचा राग उसळला आहे आणि तो सभा- मंडपांतील खांब उचलू पाहातो आहे !
२८ मासाच्या एकांकिका
हा युधिष्ठिर-- याच्याजवळ सत्याचा गुण आहे; मात्र द्यूतामुळें याची बुद्धि भ्रष्ट झाली आहे, तिरपी नजर करून वृकोदराचा क्रोध तो शांत करूं पाहात आहे!
आणि हा इकडे असुन--- ह्याच्या डोळ्यांत राग मावत नाहीं, खालचा ओठ कांपतो आहे, सर्व दात्रमंडळाला पाचोळा समजून, सर्वे राजांना समूळ नष्ट करण्याच्या इराद्यांनेच कीं काय, हळू हळू गांडीबाचची दोरी खेचतो आहे !
हा पाहा युविष्ठिर अ्जुनाला थोपवून धरीत आहे.
हे नकुल-सहदेव--- त्यांच्या चेहऱ्याचा रंग रागाने लाल- भडक झाला आहे; ते जोरजोराने खालचा ओठ चावीत आहेत. कमर घट्ट कसून, 'चर्मांचे अंगुलित्राण चढवून, तलवार घेऊन, मृत्यूची भीति न बाळगतां, दोन मृगबाळांनीं सिंहावर ऱचाळ करावी तसे, उतावाळपरणे, आवेशाने ते माझ्या भावावर घावून गेळे आहेत !
हा युविष्ठिर बघा--- दोघां कुमारांच्या जवळ जाऊन त्यांना अडवीत आहे, म्हणतो आहे : ' मी नीच आहे, माझी बुद्धि फिरकी आहे. आणखी कर्से £ तुम्ही नीति-अनीति जाणतां. ह्या वेळीं राग सोडून द्या, द्य्ताच्या अधिकारांत हा अपमान झाला आहि, आपण तो सहन केला नाहीं तर तत्त्व- शील पुरुषांच्यामध्ये आपल्या पराक्रमावरहि दितोडे उडतील !'
हे गांधारराज--- धूतेपणाने फासे फेकून गर्वभराने मुक्त हास्य करीत यांनीं आपल्या कीर्तीनं शत्रूचा आनंद जणूं कोमे- जवून टाकला आहे ! आतां आसनमांडी इकडे तिकडे हृलबीत,
दूतवाक्य २९
रडणाऱ्या द्रौपदीकडे तिरप्या नजरेने पाहात........ द्यूताची नीति जाणून, ते जमिनीवर खुणेच्या रेघा करीत आहित !
"२ १] हे द्रोणाचार्य आणि भीष्मपितामह--द्रोपदीला पाहून लाज वाटून वस्त्राने तोड झाकून घेऊन बसले आहेत !
बा! |! काय सुंदर रंग वापरले आहेत ! भाव तरी किती योग्य प्रकारे दर्शविले आहेत ! चित्रांच्या रेषा किठी योग्य आहेत ! सुस्पष्ट चितारला आहे हा चित्रपट! खूष झालो मी ! ( वळून ) कोण आहे रे १
कांचुकीय : ( पुढे होऊन ) जय महाराज !
दुर्योधन : बादरायण, जा; आणि केवळ गरुडाच्या वाहना- मुळेंच चढून गेलेल्या त्या दूताला घेऊन ये,
कांचुकीय : जशी महाराजांची आशा. ( जातो. )
दुर्योधन : मित्रा कर्णा, पांडवांच्या राब्दासाठीं दूतानची भूमिका घेऊन एखाद्या चाकरासारखा तो कृष्णमति कृष्ण आतां आला आहे--- असा निरोप आहे, मित्रा कर्णा, कान सज्ञ कर तूं सुद्धां....... युधिष्ठिराने बायकांसारखे गुल- गुळीत शब्द ऐकण्यासाठी ! ( हंसत सुटतो, )
[ येवब्यांत वासुदेव ब कांचुकीय प्रवेश करतात. |]
बासुदेव : (स्वतःशी ) खरोखर, घमराजाच्या शब्दासाठी, घनंजयाच्या अकृत्रिम मेत्रीखातर, मला न शोभणारी दूताची भूमिका घेऊन, युद्धाचा माज चढलेल्या या जिद्दी दुर्योधनाकडे मी आलो आहें. तरस म्हटळें तर, दात्रसेन्यांतील हत्तींनी रंद गंडस्थळें फोडणाऱ्या, तीक्ष्ण गदा धारण करणाऱ्या भीमाच्या-
३० मासाच्या एकांकिका
कृष्णेच्या अपमानांतून उद्भवलेल्या-क्रोघाय्नीने, आणि पार्थांच्या बाणांच्या बादळवाऱ्यांनीं, हा कुरुवंश बांबूच्या वनासारखा जळून णेल्याशिवाय राहणार नाही !....( पाहून ) हे दुर्योधनाचे शिबिर, इथे तर देवांच्या नगराप्रमाणे दिसणारे राजेलोकांचे हे डेरे स्वच्छंदाने रचलेले आहेत. शास्त्रागार विस्तीणे असून नाना प्रकारच्या उपकरणांनी आणि आयुधांनीं खच्चून भरलेली आहेत, तंबेल्यांतळे जातिवंत घोडे खिंकाळत आहेत, तर हत्ती गर्जना करीत आहेत. फांकलें आहे हे ऐश्वर्य ! मात्र स्वजनांच्या अवमानामुळे त्याचा नादा जवळ येऊन ठेपला आहे! ....अहो ! हा दुर्योधन दुष्ट बोलणारा आहे; सद्गुणांचा द्वेषी आहे; दाठ आहे; स्वजनांचची त्याला कणव नाहीं. माझी भेट घेतल्यावरह्ि जे करायला हवे ते तो करील असे मुळींच नाहीं. ( वळून, उघड ) बादरायण ! काय, जायचे का आंत १
कांचुकीय : ( घांदलीनं ) अर्थात् अर्थात् ! पद्मनाभांनीं चलावें आंत.
[ बासुदेव मंत्रशाळेंत पाऊल टाकतो. ]
बासुदेब : अरे, अरे ! मला पाहून सर्व क्षत्रियांची घांदल उडाली आहि ! कश्याला, कशाला उगीच धांदल करतां ! बसा आपण शांत मनाने,
दुर्यीधन : ( स्वतःशी ) अं ! केशवाला पाहून सर्व क्षत्रिय बावरून गेले अं £ ( उघड ) असं बाबचळल्यासारस्त्र काय करतां! मघा मीं दंड सुनावला होता, त्याची आठवण राहूं द्या ! इथे माझा हुकूम चालतो आहे म्हटलें !
बासुदेव £ काय सुयोधना, बसला आहेस !
दूतवाक््य ३१
दुर्याधन : ( बिचकून आसनावरून घसरतो. स्वतःशी ) केशव आला, यांत शेकाच नाहीं ! उत्साहभराने बेत योजून मी चांगला मांडी ठोकून बसलो होतो....परंतु केशवाच्या प्रभावा- मुळें धसरलांच शेवटीं आसनावरून ! अहो, महाकपटी आहे हा दूत ! ( उघड ) अरे दूता ! हें आसन, बैस,
वासुदेव : आचाये, बसा ना. गांगेयप्रभ्रति नपातिहो ! बसा ना आपण मोकळ्या मनान. आम्हीहि बसतो. ( बसतो, लक्ष जाऊन ) अरे वा! सुंदर आहे चित्रपट हा ! पण हे काय? द्रौपदीच्या केशाकषैणाचचे चित्र रंगविळें आहे यांत ! ( रागीट स्वराने ) मी म्हणतो---हा सुयोधन बालिश आहि, स्वजनांचा अवमान त्याला पराक्रम वाटता ! पण या सभासदांमध्ये कोण असा आहे की ज्याला घृणा उरली नाहीं, आणि जो आपण होऊन आपल्या अपराधाचे प्रदरीन करायला निघाला आहे १ उच्चला, उचला तो चित्रपट !
दुर्यीधन : ( नरम पडून ) म्हणतो आहे कीं धेऊन जा चित्रपट, बादरायणा !
कांचुकीय : जशी महाराजांची आज्ञा, [ चित्रपट घेऊन जातो. ]
दुर्योधन : अरे दूता ! धर्मात्मज, वायुसुत भीम, देवेंद्राचा पुत्र माझा भाऊ अजुन, ते विनीत जुळे बंधु अशिनीकुमार, सर्वजण आपापल्या परिवारांसह कुशल आहेत ना!
बासुदेव : गांधारीपुत्राला शोभेळ असें आतां बोललास ! अथांत् , अर्थांतू ! सर्व कुदळ आहेत. तुझ्याहि राज्यांत, त्याच-
३२९ मासाच्या एकांकिका
प्रमाणे तुझ्या प्रकतींत आणि अंतःकरणांत कुठें रोगराई नाहीं ना £ कुदाल आहे ना ! युघिष्ठिरादि पांडबांनीं ही पच्छा केली आहे. आणि त्यांची विनेति आहे कीं, ' आम्हीं फार संकटे सोसली ! घातलेली अट आतां पूर्ण झाली आहे, पैतृक संपत्तीचा आमचा म्हणून जो न्याय्य बांटा आहे तो आतां विभागून देऊन टाकावा,
दुर्योधन : काय ! पैतृक संपत्तीचा वांटा ! तो कसा :.... आमचे चुलते वनांत गेले असतां मृगयेच्या प्रसंगाने त्यांच्या हातून अपराध घडला आणि त्यांना कर्षींचा शाप मिळाला, त्या वेळेपासून आपल्या पत्नीशी त्यांचा संबंध उरला नाही. दुसऱ्यांच्या मुलांचे पितृत्व त्यांच्याकडे कसे येईल !
बासुदेब : वंशाच्या इतिहासाचा तुमचा फार अभ्यास दिसतो आहे! तुम्हांलाच वि'चारता : विचित्रवीर्य आत्यंतिक विषयोप- भोगाने क्षय लागून मरण पावले, त्यानंतर अंबिकेच्या पोटीं व्यासांच्यामुळें हे धृतराष्ट्र जन्माला आले. ते तुमचे जन्मदाते असले तरी राज्यावर त्यांचा काय हक्क आहे: (थांबून) ह्या गोष्टी बोळू नयेत ! अ्षा रीतीने आपापसांतील विरोध वाढीला लागला तर राजा, कुरुकुल क्षणाधोत नामशेष होईल. तेव्हां राग टाकून दे ! युधिष्ठिरादि पांडव स्नेहभराने तुला जे म्हणत आहित त्याप्रमाणे बागणें हेंच तुला उच्ति ठरेल,
दुर्योधन : अहो दूतमहारय ! राज्यव्यवहार म्हणजे काय हे आपल्याला कळत नाहींसे वाटते ! राजाच्या पोटीं आलेल्या घाडशी पुांनीं शत्रूंना जिंकून जिन्चा उपयोग ध्यावा अक्षी राज्य ही चीज आहे ! या दुनि्यंत राज्याची भीक मागायची
दूतवाष्य ३३
नसते ! आणि भीक मागणाराला ते मिळतहि नसते ! झटपट राजपद मिळविण्याची त्यांना आकांक्षा असेल तर त्यांनीं पराक्रम करून दाखवावा, नाहींतर मनःशांतीसाठीं श्ांतमति ज्यानचा आसरा घेतात त्या आश्रमांत प्रवेश करायला ते मोकळे आहेतच !
वासुदेव : सुयोधना, बंधूंविषयीं असें कठोर बोलणें बरें
नव्हे. पुण्यसंचयाने प्राप्त होणारी राजलक्ष्मी हातीं आली असतां
जो आपल्या मित्रांची ब बांधवांची वंचना करील त्याचा खटाटोप वायां जाईल.
दुर्याधन : राजा कंस हा तुझ्या बडिलांचा मेव्हणा-त्याची तुला दया आली नाहीं. मग आमचे नेहमीं आहित करणाऱ्यांची आम्ही कशी दया करावी :
बासुदेब : माझ्यावर त्या घटनेचा दोष लादू नकोस, माझ्या मातेला अपत्यवियोग करवून त्याने अनेक वेळां दुःखांत लोटले, स्वतःच्या वृद्ध पित्याला ब्रंदिवासांत टाकलें....स्वतः मृत्यूनेच येऊन त्याचा नाश केला, असेच म्हटलें पाहिजे,
दुर्योधन : फसबिलेस, पुरतं फसविलेंस तूं कंसाला ! स्वतःची बढाई गाऊं नकोस ! हे कांहीं शौय नव्हे. अस बघ : जांबयाच्या नाशाच्या आपत्तीने पोळून मगधेश्वर जेब्हां रागाने नेभान झाला तेव्हां भीतीने घाबरगुंडी उडून पळ काढतांना तुझे ते शोर्य कुठें गेठें होते १
बासुदेब : सुयोधना, राजनीतीचा माग पत्करणारांना आपल्या शौयीला देश-काळ आणि परिस्थिति यांच्या मर्यादा घालाव्या लागतात. परंतु, माझी थट्टा करणें राहूं दे बाजूला,
३] |
३४ भासाच्या एकांकिका
स्वतः जै करायला हवे त्याकडे वळलास तर बरें. आपल्या बंधूंशी स्नेदह्द बाळगावा, दोष विसरून जावेत. बंधुंशीं स्नेहाचा संब्रंध उभय लोकांत श्रेयस्कर ठरेल.
दुर्योधन : ( उपहासाने ) ते तर देवांचे पुत्र ! त्यांचे ब आम्हां मनुष्याचे बंधुत्वाचे नाते करस जुळणार ? ( एकदम उसळून ) झालें हे पिष्टपेषण पुरें झालें ! सोडा गोष्टी !
बासुदेव : ( स्वतःशीं ) सामोपचाराने याचें मन वळ- विण्याचा यत्न केला तरी हा आपला स्वभाव सोडणार नाहीं. ठीक, आतां कठोर दाब्दांनी आणि बोलण्यानं याला भडकवतो. ( उघड ) अरे सुयोधना, अर्जुनाचे सामर्थ्य आणि पराक्रम तूं जाणत नाहींस :
दुयोंधन : नाहीं जाणत !
बासुदेव : अस्स ! ऐक ,मग, किराताचें रूप घेतलेल्या पश्युपतीला त्याने युद्धामध्ये संतुष्ट केळं, अभि खांडववनाचचे भक्षण करीत असतांना कोसळलेला मुसळधार पाऊस त्याने बाणांनी अडवून धरला, देवेंद्राला उपद्रव देणाऱ्या निवातकवनचांना त्यानं लीलेने नष्ट केलें, आणि, तुला आठवत असेल, त्यांने एकस्यान 'बिराटनगरींत त्या वेळीं भीष्मादिकांचा पण पराभब केला होता !....शिवाय तुझ्या डोळ्यांदेखत घडेलली दुसरी एक गोष्ट सांगतों. चितसेन तुला आकारामार्गौने घेऊन जात असतां जेव्हां तूं आरोळ्या मारल्यास तेव्हां, घोषयात्रेच्या प्रसंगीं, अर्थुनानेंच तुझी सुटका केली होती ! आठवते कां ६....पण जाऊंदे ! धृतराष्ट्रजा, माझ्या शब्दासाठी तूं अर्धे राज्य द्यावेस, नाही तर,...आसागर पृथ्वीचे पांडव हरण करतील !
दूतवाक््य ३५
दुर्योधन : काय, काय पांडव हरण करतील काय! टोंचून बोलण्याचची तुझी हुद्यारी समजली बरें !....भीमाच्या ख्पाने, मारूतीने जरी येऊन युद्धामध्ये प्रहार केला, पार्थाच्या रूपाने प्रत्यक्ष इंद्राने जरी प्रहार केला, तरी पराक्रमाने रक्षिलेल्या या माझ्या वडिर्ल्याजित राज्यांतील एक गवतान्ची काडीदेखील तुझ्या. सांगण्यास्रातर मी देणार नाहीं !
बासुदेव : अरे कुरुकुलकलंका ! दुष्कीर्तीचा लोम सुटला आहे तुला. आमच्यापाशी गवतान्वी भाषा बोलतोस काय
दुर्याधन : गवळी तूं-ऱतुमच्याशीं गवता'चीच भाषा बोलायला पाहिजे ! अवध्य अशा स्त्रीला मारून, हयाचा, दृषभाचा. आणि मल्लांचा वघ करूनहि, तुला एवढीदेखील लज्जा वाटत नाहीं कीं तूं सजनाशीं बोळ इच्छितोस !
बासुदेब । सुयोधना ! मला अपराब्द बोलतोस !
दुर्याधन ! भीति आहे काय? बोलण्याच्या लायकीचाहि नाहींस तूं ! द्विजवरांनीं आपल्या हातांनीं माझ्या मस्तकावर अभिषेकजलाऱचे सिंचन केळे आहे. 'वबल राजछत्र माझ्या शिरावर धरलेले आहे, राजमंडळ मस्तक नमवून माझ्यामागून थेत आहे. तो मी सांगतो आंहे कीं तुमच्यासारख्यांशीं मी बोलत नसतां !
बासुदेव । (रागाने ) सुयोधन माझ्याशीं बोलत नाहीं.... असं काय बांधवांशीं निःस्नेह झालेल्या अर शठा, तिरप्या डोळ्याच्या कावळ्या, सर्पा ! तुझ्यामुळे या कुरवेश्याचा निःपात हां हां म्हणतां होणार आहे! ( एकदम ) राजेहो ! चाललो आम्ही ! ( जाऊं लागतो. )
- 3 भासाच्या एकांकिका
दुयॉधन : ( स्वतःशी ) अरे, खरेच निघाला हा केळवंव ! (उघड, ओरडून ) दुःशासन, दुर्मुख, दुर्बाडर, दुटेश्वर ! अरे, दूताच्या शिष्टाचाराचा भंग केला आहे ह्या केशवबारने, पकडा त्याला ! काय, नाहीं ताकद :.... दुःशासना, तुझ्यांतहि सामथ्य नाहीं :....हत्ती-बोडे ठार करणारा, कंसाचा बध करणारा हा कृष्ण, पश्युपालांच्या कुळांत बाढळेला असल्याने सम्राटापुढे कसे वागावे हे त्याला कळत नाहीं! आपल्याच बोलांनीं तो दोषाचा अनी क्षालठा आहे. सर्व राजांच्या देखत त्याच्या बाहुबलारचे आणि पराक्रमाचे हरण करून बांधा त्याला लोकर ....यांच्यांत ताकद नाहीं !....मामा, बांधा ह्या केशवबाला, काय, तांड फिरवून हेहि कोसळले ! ठौक, मीच पाश घेतो अन् बांधतो.
(कृष्णाजवळ जांतो, )
बासुदेव : ( स्वतःशीं ) काय! मला पकडण्याचा सुयोधनांचा
बेत आहे काय ! ठीक........पाहतांच सुयोधनाचें सामथ्ये ! [ विश्वरूपाचा आविष्कार करतो. ]
दुर्यीधन : अरे दूता ! तूं जरी देवांची माया किंवा स्वतःची माया आसमंतांत निर्माण केलीस, ज्यांचे वार चुक- विणणे मुष्कील अशा देवांच्या अस्त्रांनीं जरी तूं प्रहार केलास, हय, हत्ती, वृषभ यांच्या बंधान तूं चढून गेळेंडा असलास, तरी हा राजगण भोंबतीं असतांना तुला बांधल्याक्षिवाय मी आज रहात नाहीं ! थांब आतां ! अं ! केरब दिसत कसा नाहीं ! अर हा केशव ! किती लहान दिसतो आंहे केशव ! उभा राहा आतां. अं केशव दिसेनासा झाला ! हा पाहा केशव ! बापरे, केवढा मोठा झाला आहे केशव ! दिसत कसा नाहीं केशव ? हा केशव
दूृतवाक्य ३७
पाहा ! मंलयालेंत सगळीकडे केशवच केशव झाले आहेत!
आतां काय करू मी :........ असंच, अहो रजिहो ! तुम्ही एकेका केशवाला पकडा, ह॑ काय १ स्वतःच पाशांनीं बांधले जाऊन कोसळताहेत हे ! शाबास चेटक्या, शाबास ! ........
माझ्या धनुष्याच्या उदरांतून बाहेर पडलेल्या असंख्य बाणांनी जखमी होऊन गळणाऱ्या रक्ताने स्बोग रंगून निघाल्यावर तुला जेव्हां शिबिराकडे घेऊन जातील तेव्हां अश्रभरल्या डोळ्यांनीं दीथे उसासे टाकीत पांडवांना तुला पाहूंच देत !
[ अविगाने निघून जातो. ] बासुदेव : मला वाटते, पांडवांचे कार्य मीच पुरें करून टाकावे, ( अंतराळांत पाहात ) सुदशना, इकडे ये बरें, [ सुदशैन प्रवेश करतो. ]
सुदर्शन : अहो, हा मी भगवंतांची वाणी ऐकून, आड येणाऱ्या मेघांचा ओघ त्यांच्या अलोट प्रसादामुळें बाजूला सारीत घावत येऊन ठेपलो आहे! कमलनयनांचा कोणावर एवढा कोप झाला आहे बरें : कोणाच्या मस्तकावर मी माझी दाक्ति प्रकट कराबयाचची आहे ! ( इकडे तिकडे पाहात ) अव्यक्त प्रकतीचे मूळ कारण, ज्यांचे स्वरूप अचिंत्य आहे, जगताच्या संरक्षणासाठी जे तत्पर आहेत, एक असूनहि ज्यांनीं अनेक रूपं घारण केलीं आहेत, आणि वेैऱ्यांच्या सामथ्यांचा ज्यांनी चुराडा केला आहे ते लक्ष्मीसहित भगवान् नारायण कुठें असतील बरें £ ( पाहून ) अरे, हे भगवंत हस्तिनापुराच्या द्वाराजवळ दूताची भूमिका घेऊन आले आहेत ! ( घांदलीनें ) पाणी कुठें आहे ? पाणी कुठें आहे ! स्वर्गीय आकादगंगे, पाणी---लौकर !
२८ भासाच्या एकांकिका
धन्य, खवूं लागली ! ( आचमन करून, वासुदेवाजवळ भक्ति- भावाने जात ) जय भगवान् नारायण !
( लवून वंदन करतो. ) बासुदेव : सुदर्शीना, तुझा पराक्रम अप्रतिह्त असो ! सुदर्शन : अनुग्रह झाला माझ्यावर,
बासुदेव : कामाच्या वेळीं हजर झालास याचा मला आनंद आहि,
सुदशन : कामाच्या वेळीं म्हणालांत ! ते कर्से ! आज्ञा करा भगवंता, आज्ञा करा !........ मेरुमंदारादि समस्त पर्वतांना गरगरा फिरवू £ कां महासागर खवळवूं £ सर्व नक्षत्रांची माळ पृथ्वीवर पाडूं : देवा, तुमची कृपा असल्यावर मला अडाक्य कांहीच नाहीं.
वासुदेव : सुदर्शना, इकडे ये. ( अवकाशांत पाहात ) अरे सुयोधना ! सागरांत, पर्वताच्या गुहेमध्ये, अथवा ग्रह्गण ज्यांतून भ्रमण करतात त्या वायुमागौत जरी तूं दडून बसलास तरी हे पळपुट्या, माझ्या बाहुबलाचा संपर्क लाभून वेगवान बनलेले हे चक्र कालचक्राप्रमाणे तुला गांठील !
सुदर्शन : अरे क्षुद्रा सुयोधना-( थांबून, पुन्हां विचार करून ) प्रसन व्हा, भगवान् नारायणा ! पृथ्वीचा भार दूर करण्यासाठीं तुम्ही भूतलावर अवतार घेतलात. हा जर असाच मेळा तर अवतार घेण्याचे श्रम व्यथे म्हणावे लागतील, देवा !
बासुदेव : सुदशना, रागाच्या मरांत ही उचित गोष्ट मला सुचली नाहीं, बरं, जा तूं आपल्या निवासस्थानी,
दूतवाकय २९
सुदर्शन : जशी भगवान नारायणांची आज्ञा ! ( जाण्याच्या तयारींत........खालीं कौरवसमुदायाकडे पाहात ) काय, काय म्हणालांत £ गोपाळ ! तीन पावलांत तिन्ही लोक व्यापून टाक- णारे वंदनीय नारायण आहेत हे ! तुम्ही शरण जाणेंच उच्चित होईल ! बरें, निघतो मी.
( थबकून पाहात ) अरे, भगवंताचे श्रे्ठ आयुध हें शा्डंग- घनुष्य येऊन ठेपले--बारीक, लवलवणाऱ्या आणि बांकदार काठीमुळें स्त्रास्यमावाशीं मिळणाऱ्या ह्या धनुष्याचा मध्य हरीने हातांत धरला म्हणजे हें दालुसेन्याचा साक्षात् काळ बनतें ! ह्याचा पृष्ठमाग सुवणारनि मढविलेला असल्याने कृष्णाच्या पाठीशी हे उभे असलें म्हणजे पावसाळ्यांतील नवमेघाच्या पाठीशी सुंदर विद्मलता उभी असल्यासारखे दिसते !....अरे अरे ! भगवान नारायणाचा क्रोध शांत झाला, आपल्या निवासाकडेच्च परत फीर, छान, निघाले, मीहि निघतो....
अरे, ही कोमोदकी गदा आली ! रत्नांच्या व सुववणांच्या विविध रंगांत रगठेली, रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेली ही गदा सुररात्रूंच्या गात्रांचा चुराडा करायला आसुसलेली असते ! महान् पर्वताच्या कड्याप्रमाणे दिसणारी, अल्यंत श£क्तिशाली आणि दुर्निवार अशी ही, मेघांचे पुंज पाठीशीं ओढीत आका- शांदून वेगाने निघाली आहे. कोमोदकी, भगवान नारायणांचा क्रोच शांत झाला आहे ! बरें झालें, ही परतली. मीहि चलतों....
अरे वा ! जो पूरणचंद्र, कुन्द, श्वतकमलाचा गाभा आणि मौक्तिक यांच्याप्रमाणे गौर असून, नारायणांच्या मुस्रकमलाऱचा प्रसाद ज्याला मिळतो, ज्याचा प्रलयसागराच्या गजजेनेप्रमाणें
४० भासाच्या एकांकिका
असणारा नाद ऐकून असुरस्त्रियांचें ग्भपतन होतं--तो हा पांचजन्य दाखल झाला आहे ! पांचचजन्या, भगवंतांच्चा क्रोध शुमला आहे, जा. ठीक,... निघाला ।....
अरे, ही नंदक तलवार येऊन ठेपली ! स्त्रीसारस्त्री बाकदार आकृति असलेली ही तलवार युद्धांमध्ये प्रचड असुरांनाहि भय उत्पन्न करते, आकाशांतून ही वेगाने निघाली आहे. आणि प्रचंड उल्केप्रमाणे तळपते आहे. नंदक, भगवंताचा राग मावळला आहे, जा, छान, परतली ! आतां मीहि निघावें,....
अरे, ही भगवंतांची आयुधे---ही ती नंदक नांवाची तलवार---जिच्या अंगच्या किरणांनी प्रस्रर रवीने तेजहि फिके पडते ! सुरडात्रेची चिवट, रंद, वक्षःस्थळें फोडण्यांत दक्ष असलेली ही ती कोमोदकी गदा ! हें ते शार्डंग नांवाचें बाकदार 'चाप---ज्याच्या दोरीचा आवाज प्रलयभेघांच्या कड- कडाटासारखा आहे ! आणि हा तो गंभीर घोष करणारा, चेद्रकिरणाप्रमाणे धवल, शांखराज पांचजन्य ! .... हें शा्ईगा, कोमोदकी, पांचजन्या ! दैत्यांचा अंत करणाऱ्या, वैऱ्यांना प्रत्यक्ष अम्नि वाटणाऱ्या नंदका ! भगवान मुरारींचा क्रोध शांत झाला आहे, तेव्हां आपापल्या स्थानींच चलावे, छान---गेले सगळे ! मीहि जातो आतां.....
अ? हा प्रचंड वारा सुटला आहे.... जाळणाऱ्या तेजाने सूर्य तळपू लागला आहे....पर्वत हादरले....सागर खवळले....वृक्ष मोडून पडले....मेघ सेरावेरा धावू लागले....वासुकीप्रभरति महाभुजंग तोंड लपवू लागले ! ! अरे, हे॑आहे तरी काय १ वा ! हा गरुड-भगवंतांचे वाहन-येऊन ठेपला आहे ! ज्याने देवदानवांच्या परिश्रमाने हाती आलेलें अमृत आपल्या
दूतवाक्य - 4
मातेच्या सुटकेसाठीं शत्रूंच्या हातून हिसकून घेतळें आणि ' मी तुला वाहन करीन ' असा वबरहि मुरारीपासून ज्यानें मिळवून घेतळा---तो हा ! काऱ्यपाच्या प्रिय पुत्रा, गरुडा ! देवदेवेश भगवंताचा क्रोध शांत झाला आहे बरें ! आपल्या निवासस्थानी जा कसा ! बरें झालें, परतला, आतां मी जातों. ....
ही देव-सिद्ध-यक्ष-किनरादि मंडळी अच्युतांचा कोप . झाल्या-चें कळतांचच बावरून गेली होती; त्यांच्या मस्तकावरचचे मुकुट सरकले होते; तेज मावळले होतें. आतां शांत झाल्याचे ऐकून त्यांचा ताप ओसरला आहे आणि ते आपापल्या निवास- स्थानीं गेळे आहेत. तेव्हां मीहि मेरुपर्वताच्या रम्य गुहेत जातो,
[ सुदशन जातो. ] वासुदेब : मीहि आतां पांडवांच्या शिबिराकडे जातों. [ पडद्याआड |
जाऊं नका ! जाऊं नका !
वासुदेव : अरे, दृद्ध राजाचा तर हा स्वर नव्हे ! राजन्, हा मी थांबला आहे पाहा.
[ धृतराष्ट्र प्रवेश करतो, ]
धृतराष्ट्र : कुठें आहेत भगवान नारायण £ पांडवांचे श्रेय संपादणारे, विप्रजनांना प्रिय, देवकीनंदन भगवान कुठें आहेत, कुठें आहेत, कुठें आहेत शार्डंगधरा, त्रिदशाध्यक्षा ! माझ्या पुत्राच्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी माझें हें मस्तक तुझ्या पायाशी लबळें आहे!
बासुदेब ! ( गडबडीने ) अरे ! हें काय! बांकलांत आपण! उठा, उठा !
४२ भासाच्या एकांकिका धृतराष्ट्र $ अनुग्रह झाला, ( उठून ) भगवंता, हा अर्व्य,... हृ पादोदक. यांचा स्वीकार करावा.
वासुदेव : सर्व स्वीकारतो. मळा आणखी कांहीं प्रिय करतां येईल का!
धृतराष्ट्र : भगवंत माझ्यावर प्रसन असले तर मला आणखी काय हवे ९
बासुदेव : ठीक आहे. आपण पुन्हां भेटू. 'घृतराषट्र : जशी भगवान नारायणांची आज्ञा.
[ धृतराष्ट्र जातो. बासदेवहि जातो. हळुहळू सर्वे दृश्य विलीन होतें, |
दूतघटोत्कच पात्र
( प्रवेशानुक्रमानं ) सेनिक ( जयत्रात ) प्रतीहारी धृतराष्ट गांधारी दुःशला दुयाधिन दुःशासन दाकुनि
घटोत्कच
४४ भासाच्या एकांकिका
[ हस्तिनापुरांतील कोरवांच्या अंत:पुराजबळचा महाळ, एक सैनिक प्रवेश करतो आणि प्रवेशद्वाराजवळ मोठ्याने हाक मारून बोलतो. ]
सेनिक : अहोहो ! इंभर पुत्रांच्यामुळे ज्यांचा आप्तपरि- वार. गौरवाला चढला आहे, ज्ञानीपणामुळें ज्यांचा विनयशील आचार वृद्धिंगत झाला असून जे दूरदृष्टि आहेत, त्या महाराज धृतराष्ट्रांना एवढा निरोप कळवा ! ' योद्धे, रथ, घोडे आणि हत्ती ठार करून ज्याने राजसेन्यामध्ये खळबळाट माजविला, समरांग'गणावर खेळ खेळावा तद्वत् ज्याने बाल असूनहि अर्जे- नाला शोभणारा पराक्रम केळा, त्या सोभद्राला-सर्व बाजूनी वेगाने धांवून आलेल्या राजांनी युद्धभूमीवर वेढले आणि क्षणाधौत स्वगत त्याच्या आजोबाच्या-इंद्राच्या मांडीवर त्याला नेऊन बसविले !
[ प्रतीहारी--द्वारपालिका---येऊन दार उघडते, महाला'चे दृब्य, 'बृतराष्ट्र, गांधारी ब दुःशाला यांचा प्रवेश, प्रतीहारी सैनिकाला घेऊन येते व निरोप देते. ]
धृतराष्ट्र : अरे, याचा अर्थ काय : कोणीं माझे कान किटवले ! प्रियानिवेदनाचे निमित्त करून कोण मला हें आप्रिय सांगत आहे! शिश्ुवबधाच्या पातकाने लडबडलेल्या आमच्या वंशाच्या क्षयाची घोषणा कोण करीत आहे १ त्याला भीति वाटली नाहीं!
गांधारी । महाराज, कुलांचे वैर माजवून पुत्रविनाश होईल अशी परिस्थिति आहे, कीं आपला तक आहे! |
धृतराष्ट्र : गांधारी, सध्यां तरी तक म्हणूं या,
गांधारी । महाराज, खरा अर्थ केव्हां कळेल !
दृतघटोत्कच ४५
घृतराष्ट्र : ऐक गांघारी ! अभिमन्यूच्या निधनानं उसळलेल्या रागामुळे, आपल्या उग्र घनुष्याचे साहाय्य घेऊन, चिडलेल्या कृष्णाने लगाम व चाबूक हातीं घेतल्यावर, पार्थाच्या हातून तें कृत्य घडेल---ज्यामुळे था जगाचा विनाह ओढवून सगळें सामसूम होईल !
गांधारी £ हाय रे बाळ अभिमन्यु! परुषांचा नाश करणारा हा भयंकर कुलसंग्राम एकीकडे चाळू असतांना आम्हांला बालका- प्रमाणे रडवीत ठेवून तू आणखी कुठें निघून गेला आहेस, बाळ अर्से कसे आमचें दुर्भाग्य !
दुःशला : ज्यानं आज सोभाग्यसंपन्न उत्तरेला वेधव्य आणले त्याने आपल्या सोभाग्यवतीसाठीं वेधव्याला पाचारण केलें असें म्हटलें पाहिजे !
घृतराष्ट्र : मला हे सांगा, या संकटाच्या सागराला कोणीं सेतु बांधला :
सैनिक : महाराज, मी जयत्रात नव्हे का!
धृतराष्ट्र : जयत्रात, अभिमन्यूला कोणीं मारळें : कोणाला आपल्या जीविताचचा कंटाळा आला आहे ६ पांडबांच्या पंचायरी- मध्ये कोणीं स्वतःचे जळण केलें आहे १
सैनिक ! महाराज बातमी अश्शी आहे कीं, अनेक राजांनीं एकत्र येऊन अभिमन्यूला मारले. परंतु जयद्रथ निमित्त झाले असावेत !
धृतराष्ट्र : दुर्दैवा ! काय, जयद्रथ निमित्त झाला !
सैनिक : महाराज, असे म्हणायला हरकत नाहीं.
४६ भासाच्या एकाकेका
धृतराष्ट्र : अरेरे ! जयद्रथ ठार झाला! [ ते ऐकून दुःराला रड्डूं लागते. ]
धृतराष्ट्र : कोण ही रडते आहे !
प्रतीहारी : महाराज, राजकुमारी दुःशला.
धृतराष्ट्र : बाळे, उगी ! रडूं नको ! मला असे दिसते आहे कीं, तुला चिरकाल सोभाग्यद्शा असावी हें तुझ्या पतीला रुचत नाहीं ! म्हणून त्याने आपण होऊन स्वतःला अर्जुनाच्या बाणांचें लक्ष्य करून घेतलें !
दुःशळला : असे असेल बाबा, तर मला परवानगी द्या. मीहि उत्तरेच्याकडे जाते,
धृतराष्ट्र : जाऊन तूं काय म्हणणार तिला :
दुःशला ! बाबा, मी तिला म्हणेन को, ' तूं जो वेष आज धारण केला आहेस तो मी पण अंगावर चढविते, '
गांधारी : ( आंवगांने ) मुली ! कसे, करस अमंगळ बोलते आहेस ! तुझा नवरा जिवंत आहे म्हटलें,
दुःशला : ( निराशेन ) आई, माझें एवढें भाग्य कुटून असणार ? ज्यांना जनार्दनांचे साहाय्य आहे त्या अर्जुनांना दुखविल्यावर कोण जिवंत राहूं हकणार आहे !
धृतराष्ट्र : दुर्दैवी दुःराळा बोलली तै खरे आहे. कारण, अष्टभुजांच्या उत्या करून कृष्णाने आपल्या मांडीवर ज्याला दीघकाल वाढविळें, वारुणींचा मद चढलेल्या बलरामाला प्रीती- मुळें जो दुसरा मद झाला, देवांच्या पराक्रमाची बरोबरी करणाऱ्या पांडवांच्या प्रेमाचे जो एकनिधान, त्याला ठार केल्यावर, स्वतः दुष्कृत्याचा ढीग रचल्यावर, कोण या पृथ्वीवर
दूतघटोत्कच ४७
जिवंत राहू शकणार आहे : ( निःश्वास टाकून ) जयत्रात, पुत्राची मरणावस्था पाहून अजुनां्न काय केलें !
सोनेक ! महाराज, अर्जुन जवळ असतांना हें कृत्य घडे असे तुम्हांला वाटते !
धृतराष्ट्र : काय, अजुन त्या वेळीं जवळ नव्हता !
सेनिक : नव्हते, महाराज,
धृतराष्ट्र : मग हा जनाव घडला तरी कसा !
सैनिक : ऐकावे. संरप्तकाच्या सेन्याशीं लढण्यासाठी जनादैनासमवेत धनंजय निघून गेल्यावर कुमार अभिमन्यूर्न समरांगणांत उडी घेतली---बालवयामुळें तर्से करतांना त्याला शंकासुद्धां आली नाहीं.
धृतराष्ट्र : ( निसासून ) हं....त्याचा बघ झाला यांत नवल नाहीं ! ( थांबून ) सिंह गुहेत असतांना हलला करायला कोण घजावेल ! बरे, असे सांग, बाकीचे पांडड काय करीत आहेत १
सेनिक : ऐकावें महाराज ! अर्जुनाला दर्शन घेतां यावें म्हणून त्याचा देह त्यांनीं हातांनी उचळून अजून चितेवर ठेवला नाहीं. ज्या ज्या राजांनीं त्याच्या ररीरावर प्रहार केले त्या राजांची नांवें घेत ते बसले आहित,'
'वृतराष्ट्र : ( एकदम ) गांधारी, चल, गंगेच्या तीरावर जाऊं या.
गांधारी : महाराज, तिथें जाऊन स्नान करायचे ना!
धृतराष्ट्र : ऐक गांधारी ! स्वतःच्या अपराधांनीं मृत्युमुखी पडलेल्या तुझ्या मुलांना पाणी देऊन मी आजन्च मोकळा होतो!
४८ भासाच्या एकांकिका
अथात् तिलांजली देऊनहि राजांच्या युद्धशिब्रिराला अटकाव करण्याचची शक्ति मला येईल, असें मात्र नाहीं! [ सर्व निघण्याच्या तयारींत आहेत, तेवढ्यांत दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि प्रवेश करतात. ]
दुर्योधन : प्रिय दुःशासना ! अभिमन्यूच्या निधनाने विरोध स्थिरावला आहे. आपल्याला जय मिळून शत्रू हादरले आहेत, परास्त झाले आहेत. ह्या मधुसूदनाचा गर्व समूळ उखडून गेला आहे. उत्कर्षाबरोबर कीर्तिहि आज माझ्या वांग्याला आली आहे !
दुःशासन :£ आणि दुसरें हे नाहीं कां ! जयद्रथाच्या सेन्याने शत्रसेनवर आक्रमण करून दुसरा अजुनच अक्षा सौभद्राला शेकडा बाणांच्या फेकींनीं स्रालीं पाडले त्या वेळीं पांडब अडकलेले राहिले. भीष्म पडल्यामुळे आज युद्धामध्ये आमच्यावर संकटाची परंपरा कोसळली होती,...पण याचच वेळीं पुत्राच्या वधाने आम्हीं त्यांच्या अंतःकरणांत शोकाचे तीक्ष्ण बाण घुसवले आहेत !
शकुनि । जयद्रथानं आज रण गाजवले ! त्याच्या अंगीं एवढा पराक्रम असेल अशी राजेलोकांना कल्पनाहि झाली नसेल ! जोराचा हला चढवून त्यांने ऐन लढाईत पांडवांचा पुत्र नेला आणि त्याचबरोबर त्यांचे अप्रतिम यशहि हिरावून नेलें,
दुर्याधन : मामा, चला, दुःशासन, चल, बाबांच्याकडे जाऊं आणि त्यांना अभिवादन करूं,
शकुनि ! प्रिय दुर्योधना ! मला वाटते, नको. हँ कुल्युद्ध त्यांना पसंत नाहीं हें कबूल केळेंच पाहिजे, शिवाय, पांडवां- विषयी त्यांना ममत्व आहे; त्यामुळें ते आपल्याला ठपका देत
दूतघटोत्कच ४९
असतातच. तेव्हां जय मिळाविल्यामुळे प्रफुल्लित चेहरे करून युद्धभूमीवरून उठून सरळ त्यांच्याकडे जाणें उचित होईल का दुर्योधन : मामा, असें कां म्हणतां ! जं व्हायचे असेल ते होईल, आपण आपले जाऊन बाबांना अभिबादन करूं, दोघे । ठीक आहे. [ तिघे धघृतराष्ट्राजवळ येतात. ] दयांधन $ बाबा, हा दयांबन अभिवादन करीत आहे
दुःशासन : बाबा, हा दुःशासन अमिवादन करीत आहि.
ठाकाने : मी शकुनि अभिवादन करतो,
सर्वजण : हें काय ? आदीर्वचन कसे उच्चारीत नाही १
धृतराष्ट्र : मुला, कसें उच्चारू आशीर्वचन £ अर्जुनाचा आणि कृष्णाचा प्राण अद्या बाळ सोभद्राळा मारल्यावर आम्ही जीविताची आश्या कशी धरावी ! आणि आशीवबोद तरी कसा उमटाबा
दुर्योधन : असें भय वाटण्याचे कारण, बाबा
धृतराष्ट्र : हे भय वाटण्याचे कारण विचारतोस ! अनेक पुत्रांनी सनाथ झालेल्या या कुलामध्ये एकच मुलगी जन्माला आली होती....आणि म्हणून शंभर पुत्रापेक्षां ती प्रिय बाटत होती. तुम्हां भावांच्या कृपेमुळे अश्छाध्य असं वैधव्य तिला प्राप्त होणार--हें कारण !
दुयोधन : बाबा, जयद्रथाचा यांत काय संबंध !
घृतराष्ट्र : त्या दीडराहाण्याने पांडवांचा कोंडमारा केला असे ऐकले मी.
इ]
५० मासाच्या एकांकिका
दुर्योधन : म्हणे त्यानें कोंडमारा केला ! इतरहि पुष्कळ होते कीं!
धृतराष्ट्र : अरे, म्हणजे आणखी वाईट ! अनेक निघेण आत्मे एकत्र होऊन त्यांनीं मिळून पुत्रवत् कोवळ्या पोरावर प्रहार केले तेव्हां त्यांचे हात गळून कसे पडले नाहींत £
दुर्योधन : ( उसळून ) बाबा ! वृद्ध भीष्मांना कपटाने मारतांना त्यांचे हात गळून पडले नाहोत ! मग पराक्रमांत कोवळा पोर नसलेल्या त्याला मारतांना आमचे हात कां म्हणून गळून पडावेत £
धृतराष्ट्र : मुला, भीष्मांना मारणे आणि अभिमन्यूचा वध करणें या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत
दुर्योधन : नाहींत का सारख्या !
धृतराष्ट्र : ऐक मुला ! भीष्म स्वच्छंदमरणी होते; त्यांच्या सून्चनेप्रमाणे त्यांना मरण आलें; त्यांत त्यांना समाधान लाभले होते, परंतु हा कोंबळा पोर; कुरुवशाचा त्राता; अजुनाचा पहिला अंकुर होता,
दुःशासन : बाबा, तो पोर असला तरी पोर नव्हता. अभिमन्यूने---
धृतराष्ट्र : (मध्येंच) कोण! हा दुःशासन बोलतो आहे का!
दुःशासन : हो ! आम्हां सवोच्या डोळ्यांदेखत, आम्ही प्रत्यक्ष लढत असतां, त्यांने खेचून खेचून तापलेले धनुष्य हातांत घेतले, आणि--सूर्याने आपल्या मिडणाऱ्या किरणांनी खुणा उमटवबाव्यात तर्से--त्यांने आपल्या बाणांनीं सर्वे राजांच्या अगावर खुणा वठवल्या,
दूतघटोत्कच "५१
धृतराष्ट्र : अरेरे ! अरे, एकट्या बाळ सौभद्राने जर एवढे केलें तर पुत्रनिधनानें संतापलेला पार्थ तुमची काय द्या करील ! |
दुर्योधन £ काय दशा करील!
धृतराष्ट्र $ काय करील ते तुम्ही पाहालच---जिवंत राहिलांत तर !
दुर्योधन : ( रागाने ) बाबा ! कोण आला हा अर्जुन मोठा धृतराष्ट्र : मुला, तूं अर्जुनाला ओळखत नाहींस अजून दुर्योधन $ ( चिडून ) नाहीं ओळखत बाबा !
धृतराष्ट्र : अस्से ! मग मीहि नाहीं ओळखत! पण अर्थ- नाचे सामर्थ्य आणि पराक्रम जाणणारे लोक अनेक आहित. त्यांना विचार,
दुर्योधन $ बाबा, कोण अर्जुनाचे सामर्थ्य अन् पराक्रम जाणणारे आहेत, ज्यांना विचारू £
धृतराष्ट्र $ ऐक मुला ! मार्गे निवातकव'च देत्यांच्या प्राणांचा नजराणा देऊन ज्याला पूजिले त्या इंद्राला जाऊन विचार ! विविध अस्त्रांनी संतुष्ट केलेल्या किरातरूपी दंकराला बिचार ! सपोच्या आहुतीची लालसा असलेल्या ज्या अग्नीला खांडवदाहाच्या वेळीं संतुष्ट केलें त्याला विचार ! देवी विद्येचे संरक्षण असलेल्या ज्या चित्रांगदानं अलीकडे तुला पकडून नेलें होतं त्याला बिचार !
दुर्योधन ः अ्जुनाशीं सामना देणारे बीर आमच्या सैन्यांत नाहींत असें तुम्हांला बार्ट्ते !
५२ भासाच्या एकांकिका
धृतराष्ट्र $ मुला, कोण ते!
दुयाधन $ उदाहरणार्थ, कणे,
'घृतराष्ट॒ : बिचारा कर्ण ! स्वतःचे हसे करून घेईल !
दयोधिन $ ( चिडून ) म्हणजे काय !
धृतराष्ट्र $ ऐक : इंद्राने ज्याचे कवच हिरावून नेलें, ज्याचा अधीच रथ उरला, आणि कपट करून मिळविलेले ज्याचे अस्त्रबळ निष्फळ झालें---अद्या घोडचुका करणाऱ्या ह्या कर्णांची कींवच करायला पाहिजे, अम्नि, इंद्र आणि रूद्र यांनीं येऊन जरी अस्त्रे दिलीं तरी कणे अजुनाच्या बरोबरीला येईल काय
शकुनि £ आम्हांला टाकून बोलण्याचा आपल्याला अधि- कारच आहि!
धृतराष्ट्र $ शकुनि बोलतो आहे ना ! शकुनि, धट्टीचा जगारी तूं ! तूं जे कृत्य केलेस त्याने उद्भवलेला दोन 'कुलां- तला हा वैरामि पोरांच्यापयेत आला तरी अजून शांत होत नाही !
[ पडद्याआड ! प्रचंड आवाज |
' दुर्योधन £ अरे ! कडकड आवाज करीत हा भूकंप एका- एकीं कद्यामुळें झाला £ तुटून पडणाऱ्या उल्कांनी आकादा जणुं उजळून निघाले आहि !
धृतराष्ट॒ : मुला, मला वाटते को घडघडीत आपल्या नातवाला ठार झालेलें पाहून कासावीस हृदय झालेल्या महेन्द्राचीं हीं आसवें उल्कांच्या रूपाने पडत ।आहेत !
[ पडद्याआड ! मोठा संमिश्र आवाज |
दूतघटोत्कच ५३
दुर्याधन : जयत्रात, जा आणि पांडवांच्या शिक्िरांत इंख, दुंदाभे सिंहनाद यांच्यांत मिसळलेला हा आवाज कशामुळें होतो आहि ते पाहून य.
सैनिक : जशी आशा.
[ सैनिक जातो व क्षणभरानें परत येतो. ]
सौनिक : जय हो महाराज ! असें समजतें कीं संशप्तकाच्या सेनेने एका बाजूला नेलेला अजुन परतला, त्यानें आपल्या मृत पुत्राला मांडीवर घेतलें, त्यावर अश्रूंचा अभिषेक घरला, आणि जनादन नको नको म्हणत असतांहि प्रतिज्ञा केली--
य : काय---काय (
क : त्याच्या प्रतिशेने हृदय . संतुष्ट होऊन, त्याच्या पराक्रमाने स्फूर्ति मिळून, प्रफुल्लित वदन झालेल्या सर्व राजांनीं : आतां जय आमन्चाच ', अश्शी खात्री वाटून एकाएकीं दृर्षे- भराने गजना केली, व पृथ्वीचा तोल सांभाळणाऱ्या प्रचंड पर्वतांनी, गदगदा हलविल्यावर, पृर्थ्वयावर आडवे पडावे त्याप्रमाणे, खबळलेळे राजे चाळून जातांच, ही पृथ्वी बावर- लेल्या तरुणीप्रमाणे त्या क्षणीं थरथरा कांपली !
धृतराष्ट्र : प्रतिश्ञेच्या नुसत्या घोषानं ही पृथ्वी कंपित झाली ! मग धनुष्याला हात घातल्यावर त्रैलोक्याला हादरा बसेल हें उघड आहे !
दुर्योधन : ( चिडून, उतावीळपणें ) जयत्रात, प्रति काय केली त्यानं £
सैनिक : ' ज्यार्ने माझ्या पुत्राला मारले, तो पडल्यावर ज्यांना आनेद झाला, त्या सबीना उद्यां सूयीस्त व्हायच्या आंत मी ठार करीन!
पप मासाच्या एकांकिका
दुर्योधन : आणि प्रतिशेचा भंग झाला तर प्रायश्चित्त ! सैनिक : गांडीव धनुष्य बरोबर घेऊन चितारोहूण !
दुर्याधन : ( आनंदाने ओरडत ) मामा, चितारोहण चितारोहृण ! दुःशासना, चितारोहण चितारोहण ! ! (एकदम) त्याच्या प्रतिज्लेला अडथळा येईल असा प्रयत्न आतां आपण आपल्या परीने केला पाहिजे.
धृतराष्ट्र : मुला, काय करशील तूं !
दुर्यीधन : कां सर्व अक्षोहिर्णींचा डोंगर रचून जयद्रथाला झाकून ठेवीन ! दिवाय, द्रोणांच्या सल्ल्याप्रमाणे काय वाटेल ते करून मी असा व्यूह रचीन कीं ज्याचा भेद अशक्य होईल. म्हणजे मग इच्छा पुरी न झाल्यामुळे त्यांचे हृदय खिन्न होईल ! आणि ते, त्यांचे हत्ती, त्यांचे योद्धे---सारेच अप्नि- प्रवेश करतील !
धृतराष्ट्र : ( हसून ) जयद्रथ पृथ्वीच्या पोटांत दडून बसला किंबा आकाद्यांत जाऊन राहिला तरी जोवर कृष्णाचे डोळे अजुनाच्या साहाय्याला आहेत तोंवर अजुनाचे बाण तुझा सर्वत्र पाठलाग करतील!
. दुर्योधन खवळून उठतो, दाकुनि ब दुःशासन त्याला आवरतात, ]
सेनिक £ ( स्वतःशी ) नित्य सत्ता गाजविणाऱ्या ह्या राजाला अक्या निष्ठुरपर्णे दुसरा कोणी बोलला असता तर तो या क्षणीं जिवत कांहीं राहिला नसता !
[ आकाशा मार्गीने घटोत्कच प्रवेश करतो, ]
दूतघटोत्कच ५५
घटोत्कच : अहो सोभद्राच्या विनाशामुळें माझी पाठवणी केली आहे; रानटी मन असलेल्या दात्रूला भेटण्याच्या इच्छेन मी निघाला आड. अंकुशाची भीति मनांत बाळगून गजेन्द्रान भक्ष्याचा विचार करावा तस्ता मी चक्रवारी कृष्णांच्या हुकु- माचा विचार करता आहे! ( खालीं पाहात ) दं यांच्या निवासस्थानाचे प्रवेशद्वार दिसते. उतरान खालीं, ( खाली उतरून ) आल्याची बातमी स्वतःच सांगतो. ( घोषणा करीत ) अहो ! मी हिडिंबेचा पुत्र घटोत्कच यदुपतीचा निरोप धेऊन आलों आहे. स्वतः केलेल्या अपराधामुळें दात्रु बनठेल्या वडिलांना मला भेटावयाचे आहे.
दुर्योधन : ( पुढं होऊन) ये, ये. ह्या रात्रुभुवनांत ये ! मलाहि स्रूप उत्सुकता आहे. अगदीं धीटपणे जनादंनाचा निरोप सांग, हा मी दुर्याधन इथे उभा आहे !
घटोत्कच : ( आंत प्रवेश करून ) अरे, पूज्य धृतराष्ट्र आजोबा इर्थेच आहेत. ( स्वतःशी ) शोभर रानवटांचे जन्मदाते ! पण ख्रांची वैशिष्ट्यपूर्ण आकांत किती सुंदर अन् गंभीर आहे! केवढे आश्चर्य ! वृद्ध असूनहि कुठें सुरकुती नाहीं. खांदे भरीव अन् घट्ट आहेत, शंभर पत्रांचे घाडस पाठीशी असल्यामुळें विश्वास वाटावा, अशी यांची आकृति दिसते. मला वाटते, स्वर्गाचे रक्षण कर्से होणार अशी दोका वाटून देवांनी भीती- मुळेच यांना अंध करून जन्माला घातलें असां ! ( जवळ जाऊन, उघड ) आजोबा, मी घटोत्कच वंदन--- ( एकदम थांबून ) छे, छे! हा क्रम चुकला, ( पुन्हां नीट बोलत ) युथि- छष्ठिरादि गुरुजनांचे आपल्याला बंदन, त्यांच्यामागून मी घटोत्कच आपल्याला वंदन करीत आहे,
ष्ट भासाच्या एकांकिका
धृतराष्ट्र : ये बाळ, ये ! भावाच्या निधनामुळें तुझें हृदय व्यथित झालें आहे. तुला हें प्रिय नव्हे-- मलाहि हं दुःख आहेच ! म्हणजे ही बाब तुलाच लागू पडते असें नाहीं. माझ्या पुत्रांच्या अपराधामुळे मीहि दीन बनलो आहे !
घटोत्कच : अहो, तुम्ही किती चांगले आहांत ! मंगलांना जन्म देणाऱ्या आजोबांना भगवान श्रीकृष्णांचा निरोप आहे---
धृतराष्ट्र: ( आसनावरून उठत ) काय आज्ञा आहे भगवान श्रीकृष्णांची !
घटोत्कच : ( घाईने ) अंहं-अंहदं ! जनार्दनांचा संदेश आपण बसूनच ऐकावा,
'वुतराष्ट्र : जशी भगवान श्रीकृष्णांची आज्ञा. ( बसतो. )
घटोत्कच : आजोबा, ऐका : “* ' बाळ अभिमन्यु ! कुरु- बयाच्या प्रिय दीपका ! यदुकुलाच्या लाडक्या अंकुरा ! तुझ्या आईला, मामाला आणि मलासुद्धा सोडून आजोबांना भेटण्याच्या आडदोने स्वगौला निघून गेलास ना ! '- आजोबा, अजुनांची ही दशा झाली- एका पुत्राच्या निधनाने ! मग तुमची काय होईल ? तेव्हां, खंबीर व्हा आणि स्वतःच्या सैन्याला आवरा, म्हणजे पुत्रशोकामुळे उत्पन झालेला अभि स्वतःच्या प्राणांचा'च बळी घेऊन जळणार नाहीं ! !/--- अता त्यांचा संदेश आहे
धृतराष्ट्र : कृष्णाने रागाने आणि निश्चयाने हे उद्गार काढले आहेत, सर्वे क्षत्रियांचा वघ करण्यासाठीं अजुन 'घनुष्य घरेऊन सिद्ध झाल्यासारखा दिसतो आहे मला !
दुर्योधनादि कौरव : आम्हांला तर हे उद्गार ऐकून हसू येतें आहे!
दूतघटोत्कच ५७
घटोत्कच : यांत हसण्यासारखें काय आहे! .
दुर्याधन : हें हसण्यासारखे आहे : एकस्या पाथीच्या हातून राजमंडलाऱचा विनाश होईल असे रागाच्या भरांत कृष्ण समजत असेल तर त्यानं देवाशी संधान बांधलें आहे असे म्हणावे लागेल!
घटोत्कच : तुम्ही हसतां आहां ! मी श्रीकृष्णांचा प्रेषित म्हणून त्यांनीं सांगितलेळें बोललो, आणि पार्थकाकांचा शोक ऐकविला, पण म्हणून तुमचे वागणे बरोबर ठरत काय: खरें म्हणजे श्रीकृष्णाचा संदेश तुम्हींहि एकला पाहिजे.
दुःशासन : ( उसळून ) जीभ आवर ! क्षत्रियांचा अपमान करतोस : पृथ्वीवरील सर्वे राजे ज्याच्या हुकुमाचे ताबेदार आहेत, त्याच्यासमोर संदेश ऐकला गेलाच तर तो राजाचा, दुसरा कोणताहि नव्हे!
घटोत्कच : (चिड्टडून ) कोण! दुःशासन बोलतो आहे का? अरे दुःशासना, श्रीकृष्ण. तुमच्या दृष्टीने राजे नव्हत काय ? अरे पूर्वी जरासंधाच्या नगरीत उच्च पदाहून ढासळलेल्या राजांची ज्यांनी सुटका केली, राजमंडल प्रत्यक्ष हजर असतांना भीष्मांच्या हातून ज्यांनीं अर्घ्यंदान घेतलें, ज्यांच्या मंगल वक्षाच्या शाय्याग्रहांत लक्ष्मी रमलेली असते आणि त्यांचा आदेरा पाळायला तत्पर असते, ते राजांचे राजे, सवाना वंद्य चक्रपाणि श्रीकृष्ण तुमच्या हिरोबीं राजे नव्हत काय !
दुर्यीधन ! दुःशासना, हा वादविवाद पाहिजे कशाला १ ( घटोत्कचाकडे वळून ) तो राजा असेल तर भले असो! बलबान् असेल तर भले असो ! जास्त बोलण्याची इथे काय जरूर आहे £ काय म्हणतो आहे तुमचा प्रभु !
"टॅ भासाच्या एकांकिका
घटोत्कच : ( ओरडून ) हो हो ! भगवान श्रीकृष्ण म्हणजे प्रभूऱ्य आहेत, तिन्ही जगांचे स्वामी ! खास करून आमचे प्रभु ! सांगून ठेवतो : क्षत्रियांचा विनाश आतां पूर्ण झालाच म्हणून समजा, शेकडी राजांची प्रेते पडून पृथ्वालाहि जरा हलकें वाटूं दया ! पुत्रनिधनाचे निधनाचे दुःख झालं असलें तरी युद्धाच्या आघाडीवर उगारलेलीं उग्र अस्त्रे सोडायला अूनकाकांना कांहीं मोठा भार होणार नाहीं !
ठाकुनि :। ( उपहासाने ) केवळ बोलूनच असेल तर ही पृथ्वी जिंकली हें कबूल ! आणि एकेका वाक्याने करायचा असेल तर सर्वे क्षत्रियांचा बघ झाला हेंद्दि कबूल ! !
घटोत्कच : शकुनिमामा बोलताहेत ना £ (शकुनीकडे वळून ) मामा, अहो शरकुनिमामा! फांसे यया फेकून; आणि लढण्याच्या कामी येईल, ज्यावर बाण फेकतां येतील, असा चांगला सारीपाट तयार करा ! इथ बाई जिंकायची नाहीं, कीं राज्याचा कारभार बळकावायऱचा नाहीं! इथे प्राणांचा पण आहे.... आणि तीक्ष्ण शक्तीच्या बाणांशीं प्रेमगांठ आहे ! !
, दुर्योधन ! अरे, अरे! हा वळणावर गेला आपल्या ! ( घटोत्कचाकडे वळून, संतापाने ) तूं टोमणे मारतो आहेस.... मयोदेचें उल्लंघन करून कठोर बोलतो आहेस ! हात लांब करून बडबडतांना तुला कांहीं वाटत नाहीं £ आईच्या वळणावर जाऊन तुला एवढा उद्दाम गव झाला असेल तर लक्षांत ठेव ! आम्हीहि भयंकर आहांत आणि राक्षसांप्रमाणे आमन्चाहि स्वभाव उग्र आहे!
वूतघटोत्कच ५९
घटोत्कच : (उपरोधानं) छे, छे भलतेच ! (ठासून बोलत) राक्षसांपेक्षांहि तुम्ही अधिक क्रूर आहांत ! बघा ना--लाखेच्या घरांत झोपलेल्या आपल्या भावांना राक्षस जाळीत नाहींत! राक्षस आपल्या भावाच्या पत्नीला केस घरून ओढीत नाहोत ! युद्धामध्ये पुत्राचा वध करावा असे राक्षसांच्या कल्पनंतहि येत नाहीं ! राक्षसांची शरीरे विकृत असतील, त्यांचा व्यवहार उग्र असेल, पण ते घृणेला पारखे झालेले नसतात....!
दुर्योधन : (चिडून) तू दूत म्हणून आला आहेस---युड करण्यासाठी कांहीं आलेला नाहींस, संदेश घेऊन मुकाट्याने जा, आम्ही दूताचचा घात करीत नसतां !
घटोत्कच : (उसळून) काय ! दूत म्हणून मला खिजवतां ! बस करा! मो नाहीं दूत! (एकदम) बंद करा हा उद्योग ! सगळे मिळून या लढायला ! तुमच्यासमोर मी जो हा. उभा राहिलो आंहे तो धनुष्याची दोरी तुटल्यामुळें दुर्बळ झालेला अभिमन्यु नव्हे !....लहानपणापासून माझी ही महत्त्वाकांक्षा होती. याद राखा-ओठ चावीत, मुठी वळीत हा घटोत्कच इथे उभा आहे! ज्या पुरुषाची यमाच्या घरीं जायची इच्छा असेल त्याने उठावे ! [ दुर्योधन वगेरे चिठ्डून उठतात ब घावून जातात. धृतराष्ट्र मध्ये पडतो. ] धृतराष्ट्र : बाळ घटोत्कचा, शांत हो ! माझ्या शब्दासाठी बोललेळें मानून घे ! घटोत्कच : धरे आहे, बरें आहे ! आजोबांच्या शब्दासाठी मी स्वतःला दूत म्हणवून धेतो.तरीहि मला माझा संताप आवरणे कठीण आहि, ( दुर्योघनास ) काय विनंति आहे तुमची
६० भासाच्या एकांकिका
दुर्योधन : ( तेषांनं ) अरे जा ! म्हणे विनंति! माझे हे शब्द त्याला जाऊन सांग $ ' फुकटची बडबड कशाला करतोस १ तुझ्या कठोर बोलण्याने आमच्यावर कांहीं परिणाम व्हायचा नाहीं. चिडल्यावर तुझ्याशी बोलण्याचा प्रश्नच नाहीं- जेव्हां युद्ध चुंपेल तेव्हां बोलूं ! रोकडा राजांनीं दाटीदाटीनें माझ्यावर छत्रे घरलीं आहेत अक्या स्थितीत मी बाहेर पडायच्या तयारींतनच आहिं. तूं पांडवांच्या बराबर राहा.... तुला जो जबाब द्यायचा तो मी बाणांनी देईन ! '
घटोत्कच : ( रागांत ) आजोबा, निघाला मी,
धृतराष्ट्र : ( खेदपूर्वक ) जा बाळ, जा,
[ आकारामार्गानं घटोत्कच जाऊं लागतो, खालीं पाहात
कौरवपक्षीय राजांना उद्देशून शेवटचे शब्द बोलतो, ]
घटोत्कच । अहो राजेहो ! जनार्दनांच्या संदेशांतळे हे रोवटचे दाब्द आहेत, ऐका :£ ' धमाप्रमाणे बाग, आपल्या बांधवांची काळजी कर, मनांत आहे ते सर्व इथे आनरणांत आण, क्षत्रियजातीच्या रूपानं जणुं उपदेद करावा म्हणून पांडवांचे रूप घेऊन सूर्याच्या किरणांबरोबर प्रत्यक्ष कृतान्त तुमच्याकडे येत आहे ! '
[ घटोत्कच दिसेनासा होतो. दुर्योधन वगेरे पाहात राहातात, धृतराष्ट्र कपाळाला हात लावतो. |]
पात्रे
( प्रवेशाच्या अनुक्रमाने )
तीन सेनिक
बलदेव
दुर्योधन
धृतराष्ट्र
गांधारी
मालवी, पोरबी ( दुर्योधनाच्या राण्या ) दुजैय ( दुर्योधनाचा पुत्र )
अश्वत्थामा
६२ भासाच्या एकांकिका
[ रणभूमि, प्रचंड ध्वनि. पाठोपाठ तीन सैनिक प्रवेश करतात. ]
तीन सैनिक : बापरे ! हा आवाज कसचा £ मेघांचा गडगडाट £ का वज्रपातानं पर्वतांचा चुराडा होत आहे? का प्रलयकालच्या भीषण नादांचे प्रन्वंड प्रतिध्वानि उमटून त्यांनीं ही एथ्वी विदीर्ण होत आहे £ झेझावाताच्या सपक्याने उसळ- लेल्या क्षुब्ध लाटा मन्दरपवेताच्या दऱ्यामध्ये आणि गुहामध्यें प्रचंड वेगाने घुसताहेत आणि त्यामुळे खवळलेला सागर गजना करीत आहे का चला, पाहूं या,
[ सर्वजण पुढे सरतात. ] पहिला सौनैक : अरे, द्रौपदीच्या केशाकर्षणाने खवळ- लेल्या भीमसेनांचे आणि आपल्या शतबंधूंच्या मरणाने चवताळ- लेल्या महाराज दुर्योधनाचं गदायुद्ध सुरू झाळें आहे ! व्यास बलराम, कृष्ण, विदुर-प्रभूति कुरुकुलाचीं देवतेंहि जातीने हजर आहित !
दुसरा सेनिक : ( तन्मयतेने निहाळीत ) पाहा---एकानें गदे-चा भीषण प्रहार केला तर दुसरा ती चुकवून मोठयाने गजेना करतो. एक वचट्दिशीं हात मार्गे खेचतो तर दुसरा प्रतिपक्षाच्या बाराचा निकाल लावतो, मागेपुढे पवित्रे टाकीत दोघेहि गोळ गोल फिरून एकमेकांवर सारखे प्रहार करीत आहेत, गड्यांनो, दुर्योधनमहाराजांचें युद्धकौशल्य निर्विवाद आहे, परंतु भीमाची शाक्ति जबरदस्त आहि.
तिसरा सैनिक : युद्धांमध्ये आद्वितीय आणि पर्वतप्राय अशा ह्या भीमसेनाच्या मस्तकावर गदे'चा गाढ प्रहार झाला, त्यांवन वाहणाऱ्या रक्तार्ने त्याची गार्त्रे भरून गेलीं.
ऊरडमंग ८३
अशनिपातानं जळालेल्या हेमकूट पर्वतांतून -विरघळलेल्या घातृंचे पाट वहावेत आणि तो खालीं बसावा तसा हा भीम जमिनीबर कोसळला आहे,
पहिला सैनिक £ गाढ प्रहाराने निपचित पडलेल्या भीमाला पाहून व्यास हनुवटीला बोट लावून स्तिमित दृष्टीने उभे आहेत---
दुसरा सैनिक : युथिष्ठिराचा चेहरा काळवंडला आहे, विदुराच्या डोळ्यांत अश्र जमा झाळे आहेत--
तिसरा सैनिक : अजनाने गांडीव धनुष्याला हात घातला आहे, कृष्णांनी आकाशाकडे नजर लावली आहे---
सवजण : गदायुद्ध पाहायला उभे राहिलेले बलराम आपलस्या शिष्यावर खूष होऊन आपला नांगर हवेतल्या हवेंत फिरवीत आहेत !
पाहिला सैनिक : आपले दुर्योधनमहाराज म्हणजे वीर्याचे आगर ! विविधरत्ने जडवलेल्या किरीटाने त्यांचे मस्तक पाहा कसे शोभते आहे! अभिमान, विनय, रुबाब, साहस-सारे गुण त्यांच्या ठायीं एकवटले आहेत, भीमाचा उपहास करीत ते म्हणताहेत---“। भीमा, दौन झालेल्या प्रतिपक्षावर वीरपुरुष युद्धामध्ये बार करीत नसतात. घाबरू नकोस !
दुसरा सैनिक $ पाहिलेत ! भीमाचा चाललेला हा उप- द्वास पाहून जनार्दन कृष्ण स्वतःच्या मांडीवर चापटी मारून भीमाला कांहीं खूण करीत आहेत,
पहिला सैनिक : अरे, पुन्हां गदायुद्ध जुंपले ! भीमाने तळहात जमिनीवर घासले, आवेगाने अस्तन्या सावरल्या,
६४ मासाच्या एकांकिका
ओठ चावले, पराक्रमाच्या ष्येने चवताळून मोठी गर्जना केली. आणि....अरेरे ! धर्मांची लाज सांडून, युद्धनियमाला घाब्यावर बसवून या भीमाने कृष्णांनीं केलेल्या खुणेप्रमाणें दुर्यीधनाच्यो दोन्हो मांड्यांवर गदा घातली
सर्वजण : अरेरे ! महाराज खालीं कोसळले !
तिसरा सौनेक : दुर्योधनाविषयीच्या आपुलकीर्ने हलघर बलरामांचा राग उफाळून आला आहे! आणि हें पाहून व्यासांनी सून्वना केली त्याप्रमाणे पांडवांनी भीमाच्या भावती आपल्या हातानचा पिंजरा उभा केला आहे; आणि कृष्णांच्या बाहूवर रेललेल्या भीमाला ते रणभरूमीवरून धेऊन चालले आहेत.
पहिला सेनिक । भीमाला असे गुपचुप घेऊन जात असलेले पाहून हलायुध बलरामांचे नेत्र क्रोधाने अधिकच विस्फारले आहेत! अरे, ते इकडेच येत आहेत. येथे उभे राहण्यापेक्षा महाराजांच्या जवळ तरी जाऊं या
सर्वजण : चला, [ बलदेव प्रवेश करतो, ]
बलदेव : राजेहो, हे बरें नव्हे! शात्रसेन्याचा काळ अशा माझ्या नांगराची मर्यादा त्याने पाळली नाहीं. दंद्वयुद्धाचे नियम त्याने झुगारून दिठे, आपल्या उन्मत्तपणाने त्यांन माझीहि कद्र केली नाहीं. यंदाच्या ऐन मोक््यावर त्याने वुर्योधनाच्या मांड्यांवर आपली ती गदा घाळून त्याला खालीं पाडळें आणि त्याचबरोबर कुल, नियम आणि समृद्धि यांना पण मातीत मिळवले ! दुर्योधना, एक क्षणभर स्वतःला सावरून धर, ह्या माझ्या नांगराचे अग्र, स्वर्गीय सौभनगराच्या विध्वंसांत माखले
ऊरुभग ६५
अहि, महासुराच्या नगरीची उंच तटबंदी ह्याने अंकुशाप्रमार्णे उन्चलळली आहि. यमुनेच्या प्रवाहाला त्यानं आपल्यामागे खचून आणलें आहे. शात्रुसैन्याच्या प्राणांच्या नजराण्याने ह्याची पूजा -झाली आहे. हा माझा नांगर हातांत सावरून शेत नांगरतांना फिरवावा तसा भीमाच्या विपुल वक्षःस्थलावर मी आज सेरा- वेरा ओढतो आणि रक्ताच्या आणि घामाच्या ओल्या चिखलांत त्याला बुडवून काढतो ! [ पडद्याआड ] भगवन् हलायुध ! शांत व्हा, शांत व्हा!
बलदेव : अरे, या अवस्थेंत देखील हा बिचारा दुर्योधन मला अनुसरतो आहे! राज्यश्री भोगणारा हा दुर्योधघन--- आज ओल्या रक्तानं त्याची कांति माखली आहे. हीच समरावरली चंदनी उटी ! जमिनीवर सरपटण्याने त्याचे बाहु धुळीनं भरून लाल झाले आहेत-रांगणाऱ्या बाळाची अवस्था त्याच्यावर लादली गेली आहे ! अमृतमंथना*चे काम संपल्यावर सुरांनी आणि असुरांनी मंदरपर्वतापासून सोडलेला वासुका साप आपली कात खेचीत क्षी रसागराच्या जलांतून जसा थकलेला एकाकी सरपटत गेला असेल, तसा हा माझ्यामागे येत आहे !
[ ज्याच्या दोन्ही मांड्या भम्न झाल्या आहेत, असा दुर्योधन खुरडत येतो. ]
दुयीधन : ( स्वतःशी ) बांधलेले संकेत भीमाने मोडले.... गदाप्रहाराच्या जरूमेने माझ्या मांड्या जर्जर झाल्या आहेत.... दोन्ही हातांच्या टेक्यानं माझ्या ह्या अर्धमृत देहाला ढकलीत मी
५]
४९ भासाच्या एकांकिका
लोटता आहे ! ( बलरामाजवळ सरकत, उघड ) शांत व्हा, शांत व्हा, भगवन् हलायुघ ! जमीनदोस्त झाल्यावरहि माझे हे मस्तक कोणाच्या पायावर आधीं लवळें असेल तर ते आपल्या ! म्हणून म्हणतो, राग सोडा ! कुरकुलाचा अंत करणारे ते पांडव ---जगू देत खुशाल ! वैर, युद्धाच्या गोष्टी आणि आम्ही....सर्वच विनाशाला गेलें आहे !
बलदेव : नाही दुर्यांधना ! एक क्षणभरच स्वतःला सांवरून धर,
दुर्याघन ! आपण काय करणार आहांत !
बलदेव : अरे, ऐक ! नांगर उचलून त्याच्या टोकाने , त्यांनी शरीरें नांगरून, मुसळाच्या प्रहारांनीं त्यांच्या खांद्याचे आणि हूदयांचे तुकडे तुकडे करून ह्या पांडूच्या पोरट्यांना, रथ, घोडे, हत्ती यांच्यासकट, युद्धांत कामीं आलेल्या तुझ्या सैनिकां- अरोबर स्वर्गाच्या यात्रेत सोबत म्हणून मी पाठवणार आहे !
दुर्योधन : नका, नका, असे कांहीं करूं नका ! भीमाने आपली प्रतिज्ञा पूणे केली आहे....माझे शभर भाऊ स्वगीला गेले आहेत.... आणि माझी ही अशी अवस्था झाली आहे ! अशा वेळीं युद्धाने काय साधणार आहे, बलराम !
बलदेव : माझ्या डोळ्यांदेखत तुझी वंचना झाली म्हणून मी संतापलो आहे,
दुर्योधन : आपल्याला खरेच का वाटतें कीं माझी वंचना झाली १
बलदेव $ यांत संशय आहे!
ऊरुभंग ६७
दुर्याधन : छे, छे उलट आज मीं माझ्या प्राणांचे खरे मोल दिले आहे ! अम्नीने पेटलेल्या भयेकर लाक्षाग्रहांतून ज्याने युक्तीर्ने वाट काढली, कुबेराच्या नगरांत युद्धामध्ये ज्यानें पर्व- ताच्या फेकलेल्या शिला फोडून काढल्या आणि राक्षसपति हिडिंबाचा प्राण ज्यानं हिरावून घेतला, त्या भीमाने कपट करून आज मला जिंकले असे आपल्याला वाटत असेल तर बलराम, असा मी जिंकलो गेलेला नाहीं !
बलदेव : युद्धांमध्ये कपट' केल्यावर भीमसेनाला जिवंत राहूं द्यायचे :
दुयोधन : काय, भीमसेनाने माझ्याशी कपट केलें
बलदेब : मग कोणीं तुझी ही दशा केली £
दुर्योधन : ऐकावं !....इंद्राचा पारिजातक वृक्ष आणि त्याचा अभिमान ज्याने एकदमच हिरावून आणले, हजारो दिव्य वर्बेपयेत सागरजलावर ज्याने लीलेने निद्रा धेतली, त्या जगत्प्रिय ' हरीने, केवळ युद्धाच्या प्रेमानं, भीमाच्या तीग्न गदेंत प्रवेशा केला....आणि त्या हरीने मला मृत्यूच्या भेटीला पाठविलें !
[ पडद्याआड ] दूर व्हा, दूर व्हा, लोकहो! वाट करा!
बलदेव : ( पाहून ) अरे, महाराज धृतराष्ट्र....गांधारी.... अंतःपुरांतील गोत....! शोकांन भरलेल्या हृदयांनी, बिचकत बिचकत, दुजयाच्या पावलांवर पाऊल टाकीत, हे सारे इकडेच येत आहेत! ( अर्धवट स्वतःशी ) सुवर्णाच्या यशस्तंभाप्रमाणे लांब बाहू असलेला हा गर्वशाली पृतराष्ट्र म्हणजे शोयीचची खाण ! मात्र याची दृष्टि आपल्या शंभर पुत्रांमध्ये बिभागून गेली
दट मासाच्या एकांकिका
आहे, स्वर्गाचा बचाब कसा होईल, या काळजीने देवांनी दृष्ट अंधकाराच्या मुठी याच्या डोळ्यांवर मारल्या आणि मगच ह्याला जन्माला घातलें असलें पाहिजे, यांत दोका नाहीं! [ धृतराष्ट्र, गांधारी, दुर्योधनाच्या दोन राण्या आणि छोटा दुजय प्रवेश करतात. ]
धृतराष्ट्र : मुला, कुठे आहेस तूं १
गांधारी £ बाळ, कुठें आहेस
दोन्ही राण्या : महाराज, कुठें आहांत!
धृतराष्ट्र : ( स्वतःशी ) अरेरे! किती बाईट! युद्धामध्ये कपट करून माझ्या पुत्राला मारल्याचे आज ऐकले आणि आंतल्या आंत अश्रूंची धार लागली, त्यामुळें माझे हृ मुख अधिकच आंघळें झाले आहे! ( उघड ) गांधारी ! जिवंत आहेस ना;
गांधारी $ जिवंत आहें....करंटें नशीब मार्झे !
दोन्ही राण्या : महाराज ! महाराज ! !
दुर्याधन : ( हेलावून, स्वतःशी ) माझ्याहि स्त्रिया रडड लागल्या ! अरेरे, केवढी दुःखानची गोष्ट ! त्या वेळीं गदेच्या प्रहाराची मला संबेदनाहि जाणवली नाहीं....परतु आतां माझ्या अंतःपुरांतल्या स्त्रिया उघड्या माथ्यांनीं रणभूमीवर आलेल्या पाहून मात्र ती वेदना उफाळून आली आहि !
धृतराष्ट्र $ गांधारी, दिसतो आहे का कुठें तो ! स्वकुलाचा मोठा अभिमान आहि त्याला.... दुर्योधन त्याचं नांव---
गांधारी : नाहीं दिसत महाराज !
ऊरुभग द्र
धृतराष्ट्र : काय, नाहीं दिसत ! अहो, आज मी खरा आंधळा झालो ! कारण या आणीबाणीच्या वेळीं मी माझ्या पुत्राला पाहू शकत नाहीं ! दुष्टा यमा ! शत्रूच्या चढाईला चिरडून टाकणारे, गवो्ने आणि शोयाने झळाळणारे, अत्यंत धेयेशाली असे दोभर वीर पुत्र जन्माला घातल्याचा ज्याने अभिमान बाळगला तो हा धृतराष्ट्र, पुत्वाच्या हातन्ची जमिनीवर सांडलेली तिलांजलि स्वीकारायला एकदां सुद्धां पात्र असूं नये:
गांधारी £ बाळा सुयोधना ! माझ्याशी बोल ना ! शंभर पुत्रांच्या विनाशाने महाराज ढासळले आहित. त्यांना धीर तरी दे,
बलदेव : अरे, ही महिषी गांधारी ! पुत्रपोत्रांचे मुख पाहण्याचे कुतूह्लाढ जिम आपल्या नेत्रांना उरू दिलें नाहीं त्या गांधारीचें सारें धेय दुर्योधनाचा अस्त होतांच आज शोकाने गिळून टाकलें आहे ! पातिभक्तीरचे चिहृू म्हणून हिने डोळ्यांवर बांधलेली ही पट्टी आज अनिवार अश्रूनीं मिजून गेली आहि.
धृतराष्ट्र : पुत्रा दुर्योधना ! अठरा अक्षोहिणींच्या सम्नाटा ! कुठे आहेस तूं !
दुर्योधन : ( स्वतःशी ) वा रे सम्राट !
धृतराष्ट्र : माझ्या शंभर मुलांतील ज्येष्ठ मुला ! माझ्याशी बोल,
दुर्योधन : ( उघड ) बोलतो आहें ना! ज्या घटना घडल्या त्यांनीं मी शरामिंदा झालो आहे. घृतराष्ट्र $ थे मुला! मला वंदन कर,
७० भासाच्या एकांकिका
दुर्योधन : हा आलो पाहा, ( उठण्याचा प्रयत्न करतो, पण खालीं पडतो. स्वतःशी ) अरेरे ! हा दुसरा प्रहार ! ! दुर्दैबा ! केस ओढून गदा मिरकावून भीमाने माझ्या मांड्याच नष्ट करून टाकल्या असे नाही....गुरुजनांना पादवंदन करण्याची राक्यताहि नाहींशी करून टाकली आहे !
गांधारी : मुली, इकडे ये,
दोन्ही राण्या : आम्ही जवळच आहोत.
गांधारी : तुमच्या पतीला जोधा,
दोन्ही राण्या : जातों. . .नशीब आमच !
धृतराष्ट्र : अरे, हा कोण माझ्या वस्त्राचा सोगा खेंचून मला पुढे घेऊन जातोय !
दुर्जैय : आजोबा, मी दुर्जय,
धृतराष्ट्र : बाळं दुजेय, तुझ्या वाडिलांना शोधून काढ,
दुजैय : मी दमलो आहे, आजोबा !
घृतराष्ट्र : जा, आपल्या वडिलांच्या मांडीवर विसावा ध,
दुजेय : बरे आजोबा ! ( दुर्योधन आहे तिकडे जात) बाबा कुठें आहांत तुम्ही !
दुर्योधन : ( स्वतःशी, खदाने ) हा पण आला का! अरे, जीवनाच्या कुठल्याहि अवस्थेत हृदयांत घर करून राहणारे हू पुत्रप्रम आज मला भाजून काढीत आहे ! कारण, त्याला दुःखाची तोंडओळख देरत्रील नाहीं, माझ्या मांडीवर लोळण्याचे याचें वय आहे. या पराभूत स्थितींत मला पाहून हा दुजेय काय म्हणेल बरें :
ऊरुमंग ७१
दुजैय : ( दुर्योधनाजवळ जाऊन, मोठ्याने ) हे पाहा बाबा-- जमिनीवर बसले आहेत !
दु्यीधन £ बाळ, कश्याला आलास तूं !
दुज़य : तुम्हांला खूप उद्यीर झाला म्हणून,
दुयीधन : (स्वतःशी) अरे, या अवस्थेत देखील पुत्रप्रेमाने माझ्या हृदयाला चटके बसताहेत !
दुजैय : मला तुमच्या मांडीवर बसायचे आहे, ( त्याच्या मांडीवर चढतो. )
दुयीघन : ( दुजयाळा अडवीत, कळवळून ) दुजय ! दुजय ! ! अरेरे, अरेरे ! ! माझ्या हृदयांत प्रीतीला जन्म देणारा, माझ्या नेत्रांचा उत्सव असा जो कची तोच आज काळ फिरल्यावर अग्नि बनला आहे !
दुजैय : मी मांडीवर बसतोय तर कां बसूं देत नाहीं ! दुयीघधन : बाळ, सोड तुझी नेहमींची बसायची जागा ..जेस कुठंतरी, जा, ज्यावर तूं पूर्वी अनेक वेळां बसला
असशील ते तुज्लं आसन आजपासून खलास झालें आहे !
दर्जय : बाबा, कुठें जाणार आहांत तम्ही !
दुर्योधन । माझे शंभर भाऊ आहेत ना, त्यांच्यामागे
दुजैय : मग मलाहि तिथें न्या,
दुर्योधन ः जा बाळ, हे शब्द भीमाला सांग,
दुर्जैय : ( मान हलवीत ) इकडे या, बाबा ! तुम्हांला शोधताहेत---
दुर्योधन : कोण बरें, बाळ !
७२ मासाच्या एकांकिका
दुजैय : आजी, आजोबा, .... घरांतील सर्वे माणसें.
दुर्योधन : जा बाळ ! मला येण्याची शक्ति उरली नाहीं.
दुर्जैय : मी घेऊन जाईन तुम्हांला,
दुयोधिन : लहान आहेस तूं अजून, बाळ !
दुजैय : ( जबळ जात ) आई, आजी ! हे पाहा बाबा !
दोन्ही राण्या : हाय ! हाय ! महाराज ! !
गांधारी : कुठें आहे माझा लाडका !
दुजैय $ हे पाहा बाबा जमिनीवर बसले आहेत.
धृतराष्ट्र : काय हो, हा सम्राट का ? सोन्याच्या खांबाप्रमाणे जो भरभक्कम असून या जगांत सर्व परथ्वीपतींचा एकमेव स्वामी आहे, त्या माझ्या सम्राटाला महाद्वाराच्या तुटलेल्या अडसरा- प्रमाणं करून जमिनीवर लोळवले आहे काय :
गांधारी : जाळ सुयोधन, थकला असशील !
दुर्योधन : ( गहिंवरून ) तुझ्यासारख्या मातेचा पुत्र म्हणवून घेतांना मळा अभिमान वाटतो !
धृतराष्ट्र : कोण बोलत आहे ही £
गांधारी : महाराज, मी---निर्भय पुत्रांची साता,
दुर्योधन : आज माझा खरा जन्म झाला असें मी मानतों ! आबा, आतां दुःख करून काय उपयोग !
धृतराष्ट्र : मुला, करस दुःखाला दूर लोटूं मी £ शौयीने आणि बलाने उद्दाम रणयशाची. दीक्षा घेतलेले तुझे होभर भाऊ यापूर्वीच नष्ट झाले असले तरी तुझ्या एकस्याच्या हत्येने आज ते खरेखुरे मेळे आहेत !
[ मूर्च्छित पडतो, ]
ऊरुमग ७३
दुर्योधन : अरेरे ! ह्यांना मूच्छा आली ! बाबा, आईला धीर द्यायला हवा ना !
धृतराष्ट्र : ( शुद्धीवर येऊन ) मुला, काय बोलून धीर देऊं!
दुर्योधन : ' युद्धांत आपल्या पुत्राने पाठ न दाखवितां मरण स्वीकारले । हे सांगून ! बाबा, माझ्यावर अनुग्रह करा. शोक आवरा. माझे मस्तक केवळ तुमच्याच पायांशी लवलें आहे, ज्या अभिमानाने मी जन्म घेतला त्याच अभिमानाने जळत्या अम्नीची पर्वा न करतां मी स्वगोला जाईन.
धृतराष्ट्र ! मी म्हातारा झालो आहे. जगण्याची मला इच्छा राहिलेली नाहीं, निसर्गानेंच माझे डोळे मिटून टाकले आहेत. परंतु घेयीला आंत दडपून उसळलेला हा तीन्र पुत्र- शोक मला व्याकुळ करीत आहि,
बलदेव : ( स्वतःशी ) अरेरे, काय करू! दुर्योधनाची आशा ज्यांनीं सोडून दिली आहे, ज्यांचे डोळे कायमच मिट- लेळे आहेत, त्या धुतराष्ट्रमहाराजांसमोर जाऊन बोलायला मला शाक्तिच उरली नाहीं!
दुर्योधन : आई, तुला एक विनंती करावयाची आहे. गांधारी : बोल, बाळ !
दुर्याधन : तुझ्या चरणांवर मस्तक ठेवून मी म्हणतो कीं, माझ्या हातून जर कांदीं पुण्य घडेल असेल तर येत्या जन्मीं पण तूंच माझी आई हो!
गांधारी : तूं माझ्या मनची गोष्टच बोळून दाखविली आहिस !
७५. भासाच्या एकांकिका
दुयोधन : (पत्नीकडे वळून ) मालवी, तूं पण ऐक. दंद- युद्धाच्या वेळीं झालेल्या गदेच्या आघातांनीं माझी भुंबई दुभंगून गेली, प्रहारांनीं उसळलेल्या रक्तधारांनीं माझ्या छाती- वरील हाराची जागा वाहून नेली, हे माझे बाहू-जखमांननीं सुवर्ण-बाहुभूषर्णे लेवून किती शोभताहेत बघ ! तुझा पति सामोरासमोरां युद्धांत पडला आहे. क्षत्रियकन्ये, तुला रडायला काय झालें !
मालवी : मी अज्ञ आहे....आपली सहधमंचारिणी आहे.... म्हणून मला रडूं येतंय.
दुर्योधन : ( दुसऱ्या पत्नीस ) पोरवी, तू सुद्धां एक : वेदामध्ये सांगितलेल्या अनेक अभिमत यज्ञांचें आह्यी यजन केलें, बांधवांना आधार दिला, आमचे प्रिय दुंभर भाऊ दात्रूच्या मस्तकावर पाय देऊन उभे राहिले, अठरा सेन्यांच्या अधिपतींना आम्ही कोंडून चरफडायला लावलें. हा माझा स्वाभिमान बघ, तूंहि मानिनी आहेस, अश्या स्वाभिमानी पुरुषांच्या स्त्रिया मुळूमुळू रडत नसतात !
पोरबी : मी नाहीं रडत, आपल्याबरोबर चितेत प्रवेश करण्याचा माझा निर्धार झाला आहे,
दुर्योधन : दुर्जया, तूहि ऐक--
धृतराष्ट्र : (बाजूला) गांधारी, हा काय बरें सांगणार असेल १
गांधारी : (उत्तर देत) मी त्याचाच विचार करते आहे.
दुर्योधन $ ( दुर्जयास ) माझी केळीस तक्षी तूं पांडवांची सेवा करायला पाहिजे, आजीची आणि कुंतीमातेची आशा
ऊरुभंग ७'५
पाळली पाहिजे, अभिमन्यूची आई आणि द्रौपदी यांचा स्वमातेप्रमांगे आदर केला पाहिजे, बघ मुला-' जगानं ज्याची कीर्ति गावी, ज्याचें हृदय स्वामिमानाने उजळून निघाले होतें, असा दुर्योधन आपला पिता होता आणि तो रणांगणावर सामोरे लढतांना त्याच्या बरोबरीच्या योद्धथाकडून मारला गेला- हे ध्यानांत ठेवून तूं शोक करतां कामा नये, आणि....रेशमी उत्तरीयाने लपेटलेल्या युधिष्ठिराच्या मोठ्या हाताला हात लावून, भाझ्या नांवाचा उच्चार होईल तेव्हां, पांडवांच्या बरोबर तूं मला तिलांजली द्यावीस,
बलदेव : ( खेदाने ) अरेरे ! वैराची परिणति पश्चात्तापांत झाली !
[ पडद्याआड धनुष्यटंकार ]
( ऐकून ) हा कसचचा आवाज ? रणदुंदुभींचा नाद थांबून केव्हांची शांतता झाली आंहे....बाण-कवर्च-छत्र-चामर अस्ता- व्यस्त पडलेल आहेत....सूत आगि योद्धे मरून पडले आहित.... अद्या वेळी कोणाच्या धनुष्याचा हा टणत्कार आकाद्यांत घोघाबणाऱ्या कावळ्यांना सेरावेरा पळवून लावीत आहे १ [ पडद्याआड ] दुर्योधनाने धनुष्याची दोरी खेचली आणि युद्धरूपी यज्ञांत पाऊल टाकले तेव्हां मीहि त्याच्याबरोबर होतो, पण आतां.... अश्वमेध समाप्त झाल्यावर शून्य यज्ञमंडपांत अध्वयून प्रवेश करावा, तसा या रणांत मी पुन्हां पाऊल टाकीत आहे, : बलदेव ! अरे, हा द्रोणगुरून्चा पुत्र अश्वत्थामा इकडे येत आहे, (पाहून ) फुललेल्या कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे ह्याचे
७द भासाच्या एकांकिका
डोळे स्वच्छ आणि मोठे आहेत. सोन्याच्या खांबासारखे ह्याचे सुंदर लांब बाहू लोबत आहेत, उत्साहभरानें आपलें उग्र धनुष्य खेःचीत हा येत असतांना वाटते कीं, माथ्यावर इंद्र- घनुष्य लटकलेला जळता मेरूच इकडे येत आहे! [ अश्वत्थामा प्रवेश करतो. ]
अश्धत्थामा : (पडद्याआड बोललेलीं वाक्यें पुन्हां उच्चारून ) अहो ! युद्धाच्या धुमश्चक्रींत उभय सेन्यांचे समुद्र एकमेकांत मिसळले, त्यावेळीं उसळून वर आलेल्या शास्त्रांच्या मंगरीनीं ज्यांच्या देहाचे लवक तोडले आहेत, ज्यांचे श्वास आणि प्राण दोन्ही मंदावळे आहेत, त्या युद्धगरविष्ठ राजांनो, एका हो ऐका ! कपटानचे बळ वापरून ज्याच्या मांड्या चिरडल्या तोमी कौरवेद्र नव्हें ! ज्याची शस्त्रे ढिलीं पडून निष्फळ झालीं तो मी सूतपुत्र कर्णहि नव्हें ! मी द्रोणपुत्र आहे! आणि इथें या विजयभूमीवरील घडामोडी पाहायला उत्सुकतेने एकटा दास्त्र सरसावून उभा राहिलो आहे, ( किंचित् थांबून ) विजयासाठी माझे हात फुरफुरत असले तरी आतां कुठलाच लाभ मिळावण्याची आशा उरली नाहीं.... युद्धांत जयश्री जिंकूनहि काय उपयोग? ( विमनस्क किरतो. एकदम थांबून ) पण छे! पित्याला तिलांजालि देण्यांत मी व्यग्न असतांना, कुरुवंशाचा तिलक 'अश्टा या कुरु- राजाला कपटांन फसवण्यांत आलें, असं मीं ऐकले, ( खेदार्ने ) कोणाचा विश्वास तरी बसेल का याच्यावर १ रथांवर, हत्तींवर आरूढ झालेले अकरा अक्षाहिणी सेनेचे धनुर्धारी राज हातांची ओजळ करून ज्याच्या तोंडचे शब्द ऐकायला तिष्ठत राहिले, भीष्म आणि परझ्ुरामांच्या बाणाचे कवच वेढलेला माझा पिता हे ज्याचे रणांतील योद्धे, तो अतिरथी दुर्योधनहि जर जिंकला
ऊरुमंग ७७
गेला, तर काळानेंच त्याला जिंकले हे उघड आहे! (कीोचित् थांबून) कुठे बरें असेल तो गांधारीपुत्र £ (कांहीं पावलें चाळून, पाहून) अरे, रणसागर पार करणारा हा कुरुराज मेलेल्या हत्ती-घोडे- सेनिकांच्या आणि मोडलेल्या रथांच्या ढिगाऱ्यामध्ये वेढला आहे !....मस्तक लवल्यामुळे किरणाप्रमाणं भासणारे ह्यांच भुरभुरणारे केस,...गदाघातानं झालेल्या जखमांतून खवणाऱ्या रक्ताने माखलेर्ली ह्याचीं गांजे.... यामुळ अस्तगिरीच्या मस्तका- वरील शिलातलावर टेकलेल्या, संध्यारागांत बुडलेल्या, मावळती- कडे झुकलेल्या सूर्यांसारवा हा दिसत आहे ! (जवळ जाऊन) कुरुराज! हे काय (
दुर्योधन : ( त्याच्याकडे पाहात ) गुरुपुत्र! हे माझ्या असंतोषाचे फळ !
अश्वत्थामा : कुरराज ! यशाचं मूळच आणून तुम्हांला सादर करण्याचा विचार आहे माझा,
दुर्योधन : काय करणार आहांत तुम्ही !
अश्वत्थामा $ ऐका ! गरुडाच्या पाठीवर बसून कृष्ण युद्धाच्या तयारीला लागला आहे. त्याचे अनेक बाहू उघड भीति- दायक वाटतांहेत. त्यांन शा्ईग आणि चक्क सरसावले आहेत.... त्या कृष्णालानच, कांहींतरी चिताडलेला च्ित्रफलक जसा फेकावा, तसा माझ्या दास्त्रांच्या माऱ्याने पांडपुत्रांच्या सकट युद्धामध्ये उडवून देतो !
दुर्योधन $ नको !....असें कांहीं करूं नका, ( सावकारपर्णे बोलत ) मूर्धामिषिक्त राजांचा समूळ वंश पृथ्बीमातेच्या अंकावर आडवा झाला आहि. कर्ण स्वर्गाला गेला आहे, इंतनुसुत
७८ मासाच्या एकांकिका
भीष्मांनीं आपला देह ठेवला आहि, युद्धाच्या तोंडीं माझ्या देखत माझे दोभर भाऊ नष्ट झाले, आणि आमची ही दशा ! गुरुपुत्र, टाकून द्या ते धनुष्य !
अस्धत्थामा : कुरुराज ! दृंदयुद्धांत गदेचा आघात करतांना आणि केस ओढतांना पांडपुत्र भीमाने तुमच्या मांड्याच चुरडल्या असे नसून तुमचा ताठर अभिमानहि चुरडलेला दिसतो आहे !
. दुर्योधन ! असें कां म्हणतां ? राजांचा देहच मुळीं अभि- मानाने घडलेला आहे! या अभिमानासाठांच तर मां युद्ध पुकारले, गुरुपुत्र, असे पाहा : द्रूतामध्ये हातांनी कुरळे केस पकडून द्रौपदीला जे खचून आणलें, पुत्रासारखा अभिमन्यु बालवयी असतांहि युद्धाच्या आघाडीवर जो मारला गेला, द्मूताच्या कपटाने जिंकलेले पांडव रानपशूंच्या संगतींत वनाच्चा आसरा घेऊन जे राहिले--त्याच्यापुढे युद्धाची दीक्षा धघेऊनहि पांडवांनी माझे केलेलें गर्वहरण म्हणजे कांहींच नाही ! विचार करा--
अश्वत्थामा : ( आवेगानं ) नाइलाज आहे ! मी प्रतिज्ञा करून बसलो आहे. तुमची, माझी आणि अख्बिल बीरपुरुषांची दापथ घेऊन मी सांगतो कीं, रात्रीच्या प्रहरीं युद्धाचा वणवा पेटवून रणांगणावर मी पांडवांना भस्म करून टाकीन !
बलदेव : ( अचानक पुढें थऊन ) गुरुपुत्राने उच्चारलेले हे शब्द खरे होतील !
अश्वत्थामा : भगवान् हलायुध इथेच आहेत वाट्ते ! चृतराष्ट्र : ( खदाने ) अरेरे ! त्यांच्या साक्षीने हे कपट झाले !
ऊरुभंग ७९
अश्धत्थामा : ( एकदम ) दुजेय, इकडे ये पाहूं, ( त्याच्या खांद्याला स्पर्श करून ) बाहूबळानं जिंकलेले हें राज्य पित्याच्या पराक्रमी वारश्याने तुझ्याकडे आलें आहे. अभिषेक घडो वा न घडो; पण तूं आतां राजा आहेस ! माझे ब्राह्मणाचे शब्द आहेत हे.
दुर्योधन : शाबास ! माझ्या अंतःकरणाला पटेल असेंच झालें !.... ( विव्हळून ) माझे प्राण मला सोडून जाऊं पाहात आहेत !.... (भ्रान्त मन:स्थितीत कुठें तरी पाहात, सावकाश) शोतनुप्रशश्ति माझे माननीय पितर आणि पितामह मला दिसत आहेत....कर्णाला पुढें करून माझे दभर भाऊ उठले आहेत.... ज्याच्या केसांन्वी झुलपे कोवळी आहित असा हा अभिमन्यु इंद्राच्या हाताचा टेका धेत ऐरावताच्या मस्तकावर बसून माझ्याशी रागारागाने बोळत आहे !.... उवेशी वगैरे अप्सरा माझ्या निकट आल्या आहित.... हे महासागर माझ्यासमोर साकार झाले आहित.... ह्या पाहा गंगा वगेरे महानद्या ....वीरांना घेऊन जाणारे हजार हंस जोडलेले हे विमान काळाने मला धेऊन जाण्यासाठी पाठवले आहे...हा आलोच मीं !
[ मरून पडतो. ] [ कोणीतरी दुर्योधनाचे शरीर वस्त्राने झांकतात. ]
करणभार पात्र ( प्रवेशाच्या अनुक्रमाने )
सैनिक
शक्र देवदूत [ युद्धभूमि, एक घाबरलेला सेनिक त्वरेने थेतो. ] सैनिक : अहो, अहो ! महाराज अगेश्वरांना एवढा निरोप सांगाल काय; त्यांना म्हणावं, युद्धाची वेळ थेऊन ठेपली आहे. [ कांहीं आवाज ]
करणभार ८१
हो, युद्धाची वेळ येऊन ठेपली आहे. हत्तींवर, घोड्यांवर, रथांत बसून अनेक राजे आले आहेत. समराचचा हर्ष त्यांच्या पराक्रमी मुखावर ओसंडत आहे. पांडबांच्या ध्वजासमोर त्यांच्या गजनेचा सिंहनाद उसळला आहे. लोकवीर महाराज दुर्योधनांना शत्रुच्या या गजना ऐकवत नाहींत. आतां हा प्रागपणाचा समर आहि हे त्यांनी ओळखलं आहे, म्हणून ते स्वतःच त्वरेने युद्ध- भूमीवर निघाले आहेत. त्यांचा निरोप-( कांहीं पावलें टाकून, पाहात ) अरे ! आपल्या शिबिरांतून बाहेर पडून खुद्द अंगराजच शल्यासमवेत्त इकडे थत आहेत ! अंगावर युद्धाचा सर्व पोषास्त्रहि चढविलला आहे ! अरे, पण हें काय £ समराच्या उत्सवाचे हे प्रमुख, ह्यांचा पराक्रम या डोळ्यांनीं पाहिलेला, त्यांचं हृदय व्याकुळ झाल्यासारखं कां बरं दिसावे ! असं कधींहि झालं नव्हतं ! ज्बलंत तेजाने तळपणारी, समरांत आणि शोौयौत सबीच्या आघाडीवर असणारी ही धीरमू्ति या वेळीं शोकाने सावकार पाबलं टाकीत येत आहे ! स्वतः देदीप्यमान असणारा सूर्य ऐन उन्हाळ्यांत मेघखंडांनीं कोंडून जावा तसे हे कणेराज दिसत आहित ! ते थेत आहेतच....तर आपण जावं हे बरं.
[ सैनिक एका बाजूने निघून जातो. दुसऱ्या बाजूनं कणे ब
गाल्य येतात. ]
कणे : माझ्या बाणांच्या मागात आलेले हे राजे लक्ष्य बनतांच जिवंत सुटण्याची शक्यताच नाहीं. परंतु या युद्धाच्या आघाडीवर मला कोौरवांचं प्रिय करावयाचें आहे. तो धनंजय जर माझ्या दृष्टीस पडेल तर--- शल्यराज ! जिथं तो अर्जुन असेल तिथं घेऊन चल माझा रथ.
६]
८२ भालाच्या एकांकिका
हुल्य : ठीक आहि. [ रथ हाकारण्याचा अभिनय, ]
कणे : ( जणुं स्वतःशी ) अरे, पण हे काय? या प्रचंड युद्धांत परस्पर दास्त्रप्रहारांनीं योद्धे, घोडे, हत्ती, रथ तुटून छिन- विच्छिन होत असतांना, "चवताळलेल्या यमासारखा भीषण परा- क्रमी मी--“-त्या माझ्या मनांत ऐन युद्धाच्या वेळीं खिनतेचे काळे ढग कां बरं दाटून यावेत ! अरेरे 5 ! आज राघेय म्हणून जरी मी सगळीकडे ओळखला जात असलो तरी माझा जन्म अगोदर कुंतीपासून झालेला आहे. युविष्ठिरादि पांडव हे माझे धाकटे भाऊ लागतात !...तो हा सुंदर क्षण दोवटीं आला एकदांचा ... माझ्या गुणांचा प्रकषे दाखविणारा दिवस येऊन ठेपला....आणि नेमकी याच वेळीं मार्झी हीं अस्त्रे, मीं संपादन केलेली विद्या निष्फळ ठरावींत £ पण शिवाय, कुंतीमातेनं मला बंदी केली आहे....( एकदम, मोठ्याने ) शल्यराज, माझ्या अस्त्रांचा इृत्तान्त ठाऊक आहे तुला : .... ऐक तर.
शल्य ! तो वृत्तान्त ऐकण्याचे कुतूहल माझ्या मनांत कर्धी- पासूनच आहि.
[ दोघे रथांतून खालीं उतरतात, ]
कणे : पूर्वी मी परशुरामांच्याकडे गेलों होतो---
शल्य ! अस्सं,
कणे : विद्युलतेप्रमाणं पिंगट रंगाचा भव्य जटाकलाप त्यांच्या मस्तकीं होता. उसळणाऱ्या तेजाची बलयं फाकणारा परशु त्यांच्या हातीं होता, क्षत्रियांचा कर्दनकाळ, भगुवंशाची पताका ....अशा त्या मुनिश्रेष्ठापाशीं मी गेलो, त्यांना प्रणाम केला, आणि जबळच मुकाट्यानं उभा राहिली.
कणंभार ८३
शल्य : मग ९
कणे : परशुरामांनी मला आशीर्बांद दिला आणि विचारलं : कोण तू £ इथं कशासाठी आला आहेस? '
शल्य : तुम्ही काय उत्तर दिलंत १
कणे : मी म्हणालो, ' भगवन् ! सर्वे अस्त्रविद्या रिकून घेण्याची मला इच्छा आहे, '
दल्य : मग!
कणे : तेव्हां भगवान परशुराम मला म्हणाले, “ मी ब्राह्म - णांना उपदेश देईन, क्षत्रियांना नाहीं. '
शल्य : क्षत्रियांशीं त्यांचं पूर्वीपासूनच वैर आहे. पण पुढं काय झालं !
कणे : मीं सांगितलं कों, ' मीं क्षत्रिय नाहीं. ' आणि माझ्या अस्त्रवियरेच्या शिक्षणाला सुरुवात झाली.
शल्य ! अस्सं,
कणे : असेच कांहीं दिवस गेळे, एकदां फळ, मूळ, समिधा, कुा, फुलें आणण्यासाठी गुरुजी गेले होते. त्यांच्याबरोबर मीहि होतो.
शल्य । बरोबर आहि,
कणे : वनांत भटकण्याच्या पारिश्रमांनीं गुरुजी थकून गेले. माझ्या मांडीवर त्यांना झोप लागली,
शल्य : मग काय झालं ९
कणे ! तेव्हां--वजमुख नांवाच्या एका कीटकानं माझ्या दोन्ही मांड्या पोखरून काढल्या. दुर्दैव ! परंतु गुरुजींची झोप-
८४ मासाच्या एकांकिका
माड होऊं नये म्हणून ती सारी वेदना मीं धेर्यानं सहन केली.... गुरुजींना जाग आली तेव्हां त्यांचं शरीर रक्तानं माखून निघालं होतं ! एकाएकी त्यांच्या क्रोधाचा अभि पेटला....त्यानीं मला ओळखलं आणि शाप दिला कीं, ' ऐन वेळीं तुझी अस्त्र निष्फळ होतील ! '
शल्य : अरेरे ! केवढी दुःखदायक शापवाणी उच्चारली त्यांनी !
कर्ण : अस्त्र तपासून तर पाहूं या. ( अस्त्रे तपासून पाहून ) या उस्त्रांचं सारं वीर्य नाहींसं झाल्यासारखं दिसतं आहे! ( सखद स्मित करून) अरे, हे माझे घोडे पण पावलापावलाला ठेचाळत आहेत, त्यांचे डोळे देन्यानं झाकलेले आहेत. त्यांना स्वतःची शक्तिच राहिलेली दिसत नाहीं, ( पुढें नजर टाकून ) आणि सप्तच्छदासारखा तीन्ऩ आणि असह्य मद्ञाव करणारे हे माझ्या सैन्याचे हत्तीसुद्धा ' युद्धभूमीवरून मार्गे फीर! असाच संदेश जणुं मला देत आहेत, ( क्षणभर स्तंभित होऊन ) हँ काय: शंखदुंदुभीहि निःशब्द झाल्या आहेत !
शल्य : अरेरे ! दुर्दैब, दुदव !
कणे ! शल्यराज, असा शोक काय करतोस ! युद्धांत : निष्फळता कशी ती नाहींच, अरे, मृत्यु आला तर स्वर्गाची दारं उघडतील; जय झाला तर यशःश्री माळ घालील. दोन्ही गोष्टी या जगांत सारख्याच मानाच्या आहेत, आणि असं पाहा, हे माझे घोडे अस्सल कांत्रोज कुलांत जन्मलेले आहेत, युद्धांत त्यांनीं कधीं पिछाडीला तोंड फिरविल नाहीं. वेगांत तर ते गरुडाची बरोबरी करतील, मी सुरक्षित राहाणार असलो तर-
करणमार ८५
हे माझे घोडे माझं रक्षण केल्यावांचून रहाणार नाहींत. ( एकदम भावनावेगार्ने ) गोब्राझ्मणांचे अक्षय असो ! पतिन्रतांचं अक्षय असो ! आणि ज्याचा काल समीप आला आहि त्या माझं पण अक्षय असो! ( आनंदानं ) अर, माझं मन आतां अगदीं प्रसन झाले आहे! पांडवांच्या सनेची दुर्भद्य आघाडी फोडून, ज्याच्या अनेक गुणांची वाहवा चालली आहे त्या धमराजाला मी बंदिवान् करतो. माझ्या उत्तमोत्तम वेगवान बाणांनी अ्ुनाला भूमीवर लोळवतो. सिंह्ृ मरून पडल्यावर एखाद्या वनांत जसा सहज प्रवेश करावा तसं मी सहज समरांत शिरतो- शल्यराज ! चल, रथांत चढू या. ठाल्य £ ठोक आहि. [ रथावर चढून बसण्याचा अभिनय, ]
कणे $ दल्यराज, जिथं तो अर्जुन असेल तिथं घेऊन चल माझा रथ, [ पडद्याआड |]
५: अरे कर्णा, मजा मोठी भिक्षा पाहिजे आहे,
कणे : ( ऐकून ) अ? हा सामर्थ्यशाली शब्द कोणाचा बरं ? कोणी तरी महापुरुष दिसतो आहे, केवळ ब्राह्मण असेलसं वाटत नाहीं, म्हणूनच तर ह्या शब्दाचा एवढा मोठा प्रभाव ! हा धीरगंभोर आवाज ऐकून आम्ही चित्रवत् स्तंभित झालो आहोत, शरीरावरचा ताबा सुटल्यासारखे हे माझे घोडे- सुद्धां ताठ उभ आहेत; त्यांचे कान टवकारलेळे अहित; आदांकेनं डोळे बारीक झाले अहित; मुख वळवून त्यांनी त॑ आपल्या मानेवर टेकलं आहि....( एकदम ) बोलवा त्य,
ट्ट मासाच्या एकांकिका
बिप्राला ! नको, नको ! मीच बोलावता. भगवन् ! इकडं यावं, इकडं यावे, [ ब्राह्मणवेषधारी शाक्र प्रवेश करतो. ]
शक्र : मेघांनो ! सूर्याबरोबरचच मार्गे वळून परत जा तुम्हीं, ( कर्णाजवळ येऊन ) अरे कर्णा ! मला मोठी भिक्षा पाहिजे आहि.
कणे : भगवन् , मला अत्यानंद झाला आहे ! राजेंद्रांच्या मस्तकावरील मुकुटांच्या मण्यांनीं माझे पाय रंगून निघालेले आहेत. परंतु विप्रेन्द्राच्या पायावरील धुळीनं मस्तक पवित्र होऊन या जगांत कृतार्थतेची पदवी मिळविण्याचे भाग्य मात्र आज लाभलं आहे, हा कणे आपल्याला वंदन करीत आहे.
शक्र : ( स्वत:शी ) काय बोलूं बरं मी! ' दीघोयु हो ' असा आशीर्वाद दिला तर हा खरंच दीर्घायुषी होईल. आशीर्वाद दिला नाहीं तर मला मूर्ख समजून हा माझा अवमान करील.
दोन्ही गोष्टी टाळून बोलायचं म्हणजे पंचाईत आली ! काय
कराव बरं ! हां, ठीक---असंच. ( उघड ) अरे कर्णा, सूर्या- प्रमाणं, चंद्राप्रमाण, हिमालयाप्रमाणं, सागराप्रमाणं तुझी कीर्ति स्थिर असो !
कणे : भगवन् ! ' दीर्घायु हो! असा आशीर्वाद नव्हता द्यायचा मला £ अथवा, आहि हेंच सुंदर म्हटलं पाहिजे, कारण मनुष्यानं प्रयत्नपूर्वक धर्माचं साधन करणंच योग्य होय, राज्यश्री ही सापाच्या जिभेप्रमाणं चपल असते. तेव्हां, प्रजेचे पालन करण्याची बुद्धि केवळ मनांत बाळगून देह ठेवल्यावर शेबटीं मनुष्याचे सद्गुणच कांय ते मार्गे राहणार ! भगवन् , आपली काय इच्छा आहे! मीं आपल्याला काय द्यावं £
कणंभार ८७
शक्र : मला मोठी मिक्षा पाहिजे आहे,
कणे : मी आपल्याला मोठी मिक्षा देतो. ऐकावं माझ्या वैभवाचं वर्णन : याचक ज्यांची खूपच प्राथना करतात अशा गुणी, तरुण, पवित्र, अमृताप्रमाणं दुधाच्या घारा सोडणाऱ्या हजार गाई मी आपल्याला दान करीत आहे. त्यांचीं सतुष्ट वासरं त्यांच्या बरोबर येतील, त्यांच्या शिंगांना सोन्याचे टोप बसविलेले असतील, आपल्याला रुचेल हं दान, द्विजवर
शक्र : हजार गाई म्हणतोस £ थोडा वेळ दूध प्यायला मिळेल. नाहीं, नाहीं, कर्णा! या दानाची मला इच्छा नाहीं.
कणे 4 नको हें दान! बरं, हें ऐकावं. अनेक सहस्र घोडे मी आपल्याला या क्षणाला देतो. राज्यलक्ष्मी मिळविण्याचं एक साधन, सर्व नपतींना ज्यांच्याविषयीं आदर वाटतो, ज्यांची चमक युद्ध- भूमीवर दिसल्याशेवाय राहात नाहीं असे, वाऱ्याच्या वेगानं घावणोर, उच्च कांबोज कुलांत जन्मलेले, सूयाच्या घोड्या- सारख गुणसंपन घोडे--
शक्र : घोडे : थोडा वेळ मी बसेन त्यांच्यावर, नाहीं, नाहीं, कर्णा ! मला या दानाची इच्छा नाहीं.
कणे : नको हे दान £ बरं, दुसर सांगतो. हत्तींचे अनेक कळप मी देतो, या हत्तींच्या गंडस्थलावरून मदाच्या नद्या वाहात आहेत, भुंग्यांचे थवे इथं घोटाळत आहित; त्यांचं रूप पर्वता- प्रमाणं अजस्र आहे; मेघाप्रमाणं त्यांची गजेना गंभीर आहे; त्यांचीं नखं आणि दांत पांढरेशुभ्र आहेत, हे हत्ती म्हणजे हात्रूच्या सेनेचा कर्दनकाळच !
शक्र : काय म्हणालास, दत्ती : घटकाभर बसेन मी त्यांच्या- वर, छे, छे ! मला हे दान नको.
८८ भासाच्या एकांकिक्रा
कणे ! हेंहि नको आपल्याला £ बरं, दुसरं सांगतो. मी अपरिमित सुवर्ण देतो.
शक्र: हं...मी जाईन घेऊन ! (_कांही पावलें चाळून ) नाहीं, कर्णा ! मला याहि दानाची इच्छा, नाहीं,
कणे : मग सर्व पृथ्वी जिंकून दान करूं १
शुक्र : पृथ्वी घेऊन मी काय करूं
कणे : मग अग्निष्टाम यागाचं फळ आपल्याला अर्पण करूं १
शाक्त : अमिष्टोमाचं फल घेऊन मला काय करायचं आहे १
कण £ मग माझं मस्तक कापून देऊं ?
ठाक्र : शान्तं पापं, शान्त पापम् !
कणे : घाबरू नका, भगवन्, घाबरू नका ! प्रसन्न व्हा. मी दुसरं सांगतो. ऐकावं, हे कवच आणि हीं कुंडलं माझ्या देहाचं रक्षण म्हणून माझ्या शरीराबरोबरच उत्पन झालेलीं आहित; देव आणि असुर एकत्र झाळे आणि त्यांनीं आपापली सर्व अस्त्र बाहेर काढलीं तरी या कवचाचा भेद होणार नाहीं. असं असूरनाहिे, आपल्याला रुचत असेल तर कुंडलांसह्दित या कवर्चानचे दान मी खुषीने द्यायला तयार आहे.
वक्र : (इषारने ) दे व्दे5्दे!
कणे : ( स्वतःशीं ) अशी ह्याची इच्छा आहे तर ! अनेक कपटं करण्यांत कुहाल असलेल्या कृष्णाची तर ही युक्ति नसेल? असेना कां ! दानाचं वचन मुखांतून निघाल्यावर आतां शोक करावयाचा ! धिक्कार असो ! मीं उगाच संदाय घेतला, (उघड ) घ्यावं भगवन् !
दाल्य : अडूगराज ! कबचकुंडलं देऊं नका, देऊं नका !
कणमार ८९
कणे $ दल्यराज, कशाला अडवितोस मला £! असं पाहा, काळ फिरला म्हणजे विद्चेचा क्षय होता; जमिनींत दूरवर रुपलेले वृक्ष उमळून पडतात; पाण्यानं भरलेल्या जलादायांतील पाणीहि सुकून जातं. शेवटीं कांही रिललक राहात असेल तर....यागांतील आहुति आणि दिलेलं दान ! तेव्हां, ( याचकाकडे वळून ) घ्यावं महाराज !
[ अंगावरील कवचकुंडले उपटून काढून देतो.
शक्र । ( घेऊन, स्वतःशी ) अहाहा ! घेतलीं शेवटीं कवचच- कुंडलं ! अर्जुनाचा विजय व्हावा म्हणून सर्वे देवांनीं मिळून जी भसलत केली होती ती मीं आज तडीस नेली आहे. आतां ऐेरावतावर चढून कर्णाजुनांचं दृंद्वयुद्ध खुशाल पाहात बसतो !
[ शक्र जातो, ]
शल्य : अड्गराज, फसवलं हो तुम्हांला !
कणे । कोणी
शल्य : शक्ताने,
कणे : छे, छे ! मींच शक्राला फसवलं ! असुरसंघाचं मर्दन करणारा, उज्ज्वल किरीट धारण करणारा हा पाकशासन--- ब्राह्षणांनी अनेक यश करून, आहुति देऊन त्याला संतुष्ट कर- ण्याचा यत्न केलेला आहे, देवांच्या हत्तींची पाठ थोपटतांना त्याच्या हाताला घट्टे पडले आहेत, --त्या इंद्राला आज मीं कृतार्थ केलं आहे !
[ ब्राह्मणरूपानं देवदूत प्रवेश करतो. ]
देवदूत : अरे कर्णा ! तुझ्या कवचकुंडलांच्या ग्रहणानें
पुरंदर इंद्राला पश्चात्ताप झाला आहे, तुझ्यावर त्याचा अनुग्रह
९८ भासाच्या एकाकिका
“झाला आहे, पांडवांपेकीं एका पुरुषाचा वध करण्यासाठीं हे अमोध अस्त्र---ही विमला नांवाची शक्ति--आहे, हिचा स्वीकार कर, करण : धिक्कार असो ! दानावर प्रातैदान धेत नसतो मी ! देवदूत : अरे,ब्राह्मणाचं वचन म्हणून तरी हिचा स्वीकार कर. कणे : काय म्हणालांत १ ब्राह्मणाचे बचन? त्याचा मीं कधींच अव्हेर केला नाहीं. केव्हां मिळेल ही शाक्ति मला १ . देवदूत : जेव्हां त॑ तिची आठवण करशील तेव्हां ती तुझ्याजवळ आहे असंच समज. करण : ठीक. अनुग्रह झाला माझ्यावर, यावं आपण ! देवदूत : बरं, येतो. [ देवदूत जातो. ] कणे : शल्यराज, चल रथावर चढूं या, ठाल्य : ठीक आहि. [ रथावर चढून बसण्याचा अभिनय, ] कणे : हा कसचा बरं आवाज ऐकू येत आहे £ काय असावं बरं १ प्रलयकालच्या सागराच्या गजनेप्रमाणं हया कुणाच्या बरं दुखाचा ्वानि घुमता आहे! कृष्णाच्या छे, छे ! अजुनाच्या हुखाचा असला पाहिजे, अर्थात् ! युघिष्ठिराच्या पराजयांन चवताळून उठलेला पार्थ आपलं सारं बळ पणाला लावून आज लढणार ! हल्यराज, जिथं तो अर्जुन असेल तिथंच घेऊन चल माझा रथ, शल्य : हो. [ जातात. | १ 8 5
दीड' रुपया
मॉडने बुक डेपोची
नाट्यसंपदा
मतिविकार
श्री. कृ. कोल्हटकर ३ रु. तोतयाचें बंड
न. चिं. केळकर २ रु. देवमाणूस [ दहावी आवृत्ति]
नागेश जोशी १। रु. बातमीदार
प्र. श्री. कोल्हटकर १॥ रु. मदिरा
सौ. विमल घेसास १। रु. ऊर्मिला
जगनाथ गोखले १॥ रु. नवी जाणीव
सो. पद्मावती गोळे २१ रु. नवे पाऊल _
भ. दि. शाळिप्राम १ रु.